वडूज : सीमा सुरक्षा दलात कार्यरत असलेले धकटवाडी, ता. खटाव येथील जवान ज्ञानेश्वर चंद्रकांत जाधव जम्मू-काश्मीरमध्ये कर्तव्य बजावत असताना हुतात्मा झाले. त्यांचे पार्थिव उद्या (शनिवार) गावी येणार असल्याची माहिती येथील पोलीस पाटील नामदेव रामचंद्र माने यांनी दिली.
शहीद जवान जाधव हे 2015 मध्ये सीमा सुरक्षा दलामध्ये ( बीएसएफ ) दाखल झाले होते. दोन वर्षांपूर्वी त्यांचे लग्न होऊन त्यांना सहा महिन्यांचा मुलगा आहे. घरची परिस्थिती जेमतेम असून, ज्ञानेश्वर यांचे 12 वीपर्यंतचे शिक्षण येथील जवळच असलेल्या कुरोली येथील श्री सिद्धेश्वर विद्यालयात शिक्षण झाले होते. त्यांच्या पश्चात पत्नी, आई, वडील व दोन विवाहित बहिणी असा परिवार आहे.
काल संध्याकाळी ज्ञानेश्वर यांच्या वडिलांना जम्मू-काश्मीरमधून वरिष्ठ अधिकार्यांचा फोन आला व अतिरेक्यांशी झालेल्या चकमकीत ज्ञानेश्वर यांना वीरमरण आल्याचे कळवण्यात आले. ज्ञानेश्वर यांचे पार्थिव उद्या संध्याकाळपर्यंत गावात पोहोचेल, असे गावचे सरपंच कृष्णाजी रंगू माने यांनी दिली.
दरम्यान, जवान जाधव यांच्या वीरमरणाची बातमी समाजमाध्यमांतून दिवसभर फिरत आहे. पोलीस, महसूल विभागाच्या अधिकार्यांसह सामाजिक, राजकीय क्षेत्रांतील कार्यकर्त्यांनी धकटवाडी गावास भेट देऊन माहिती घेण्याचा प्रयत्न केला.
याबाबत प्रशासन पातळीवर उशिरापर्यंत संदेश आला नव्हता. तहसीलदार डॉ. अर्चना पाटील या न्यायालयीन कामकाजासाठी मुंबईला गेल्या असल्याने नायब तहसीलदार कमलाकर भादुले यांनी धकटवाडी येथे भेट दिली.
सराईत गुन्हेगाराने दिली तीन घरफोड्यांची कबुली |
उदयनराजे यांच्या समर्थनार्थ सातार्यात लोटला जनसागर |
शिक्षक हेच सुसंस्कृत समाजनिर्मितीचे जनक |
अजिंक्यतारा कारखान्यावर वादातून झाला गोळीबार |
जनता बँक साताराच्या तज्ज्ञ संचालकपदी सौरभ रायरीकर, राजेंद्र जाधव यांची निवड |
महिलेची गळफास घेवून आत्महत्या |
एकाच्या मृत्यूप्रकरणी कार चालकावर गुन्हा |
संशयित माल जवळ बाळगल्याप्रकरणी एकावर गुन्हा |
राहत्या घरातून युवती बेपत्ता |
वाई, जावळी परिसरात जोरदार अवकाळी पाऊस |
विरोधकांच्या रडीच्या डावाला जनता भुलणार नाही |
महायुतीचे आज सातार्यात जोरदार शक्ती प्रदर्शन |
सातारा जिल्ह्यात राम लल्लाच्या गजराने रामनवमी साजरी |
उदयनराजे यांच्या शक्तीप्रदर्शनासाठी आमदार शिवेंद्रसिंहराजे सज्ज |
सातारा जिल्ह्यात रामनवमी उत्साहात साजरी |
महिलेची गळफास घेवून आत्महत्या |
एकाच्या मृत्यूप्रकरणी कार चालकावर गुन्हा |
संशयित माल जवळ बाळगल्याप्रकरणी एकावर गुन्हा |
राहत्या घरातून युवती बेपत्ता |
वाई, जावळी परिसरात जोरदार अवकाळी पाऊस |
विरोधकांच्या रडीच्या डावाला जनता भुलणार नाही |
महायुतीचे आज सातार्यात जोरदार शक्ती प्रदर्शन |
सातारा जिल्ह्यात राम लल्लाच्या गजराने रामनवमी साजरी |
उदयनराजे यांच्या शक्तीप्रदर्शनासाठी आमदार शिवेंद्रसिंहराजे सज्ज |
सातारा जिल्ह्यात रामनवमी उत्साहात साजरी |
उष्माघातावरील उपचारासाठी सर्व शासकीय रुग्णालयांमध्ये कक्ष स्थापन |
आदर्श आचारसंहितेच्या काटेकोरपणे अंमलबजावणीस सर्वोच्च प्राधान्य : जिल्हाधिकारी डुडी |
श्रीराम नवमी निमित्त राम ध्यान मंदिरात अर्पित कथक नृत्यलयाचा कार्यक्रम |
निवृत्तीवेतनधारक/कुटुंबनिवृत्तीवेतन धारकांना आवाहन |
विविध मोबाईल अॅपच्या माध्यमातून मतदारांना सोई- सुविधा |