05:40pm | Sep 20, 2018 |
सातारा : न्यू फलटण शुगर वर्क्स, साखरवाडीचे चेअरमन, व्हाईस चेअरमन व संचालकांविरोधात अखेर शेतकर्यांची फसवणूक केल्या प्रकरणी गुन्हा नोंद झाला असून नारायण साहेबराव अभंग (वय 65) यांनी याप्रकरणी फलटण ग्रामीण पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली होती. त्या अनुषंगाने काल संध्याकाळी गुन्हा नोंद करण्यात आला आहे.
फेब्रुवारी 2018 पासून तालुक्यातील शेतकर्यांनी साखरवाडी, ता. फलटण येथील न्यू फलटण शुगर वर्क्सला ऊस दिलेला होता. तब्बल सात महिने उलटूनसुद्धा कारखाना व्यवस्थापनाने शेतकर्यांना गाळप केलेल्या उसाची दमडीही दिलेली नव्हती. त्यामुळे शेतकरी आक्रमक झाले होते. साखर आयुक्तांनी कारखान्याच्या तसेच कारखान्याच्या संचालकांच्या स्थावर जंगम मालमत्ता जप्त करुन शेतकर्यांची देणी चुकवावीत, असे स्पष्ट आदेश दिले होते. असे असतानाही जिल्हा प्रशासनाने हा चेंडू फलटण प्रांतांच्या कोर्टात टोलवला होता. प्रांतांच्या कार्यालयामध्ये शेतकरी संघटनेचे पदाधिकारी, शेतकरी तसेच फलटण तालुक्यातील एका तथाकथित उद्योगपतींच्या अनेक बैठकींच्या फैरी झडल्या. परंतू शेवटपर्यंत शेतकर्यांना कारखान्याकडून एक छदामही मिळाला नाही.
शेतकर्यांचे 51 कोटी, कारखान्यातील कामगारांचे 8 कोटी, तसेच भविष्य निर्वाह निधीचे 4 कोटी व कारखान्यावरील कर्जाची गोळाबेरीज 248 कोटींच्या घरात आहे. असे असताना कारखान्याचे चेअरमन प्रल्हाद साळुंखे-पाटील, व्हाईस चेअरमन धनंजय साळुंखे-पाटील यांनी कारखान्याची देणी चुकविण्याचा अनेक प्रकारे प्रयत्न केला. मात्र फलटण नरेशांनी लावलेल्या फिल्डिंगमुळे त्यांना अनेकदा निराशाच पदरी आली. राष्ट्रवादी सुप्रिमो शरद पवार यांनीही याप्रकरणी तोडगा काढण्याचा प्रयत्न केला. मात्र शरद पवारांनीही याबाबत सवतीच्या मुलाबाबतचे प्रेम दाखवून या विषयाला बगल दिली. अखेर फलटणमधील दाढीवाल्या बाबांसह फलटण नरेशांचेही इप्सित साध्य झाल्याची चर्चा फलटण तालुक्यात आहे. काल अखेर विडणी, ता. फलटण येथील नारायण साहेबराव अभंग (वय 65) यांनी फेब्रुवारी 2018 ते 19 सप्टेंबर 2018 पर्यंत न्यू फलटण शुगर वर्क्स या कारखान्याला माझा 28 टन ऊस गाळपास देवूनही त्या उसाची देय रक्कम 74 हजार रुपये व इतर शेतकर्यांची थकित रक्कम अंदाजे 51 कोटी रुपये उसाचे गाळप होवून सात महिने उलटूनही खात्यावर जमा केले नसल्याने अखेर काल दि. 19 रोजी न्यू फलटण शुगर वर्क्स, साखरवाडीचे चेअरमन, व्हाईस चेअरमन व संचालकांविरोधात अखेर शेतकर्यांची फसवणूक केल्या प्रकरणी तक्रार दाखल केली होती. त्या अनुषंगाने फलटण ग्रामीण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला असून अधिक तपास पोलीस निरीक्षक हंकारे करीत आहेत.
शाहूपुरी पोलिस ठाण्याच्या हद्दीत आढळला अनोळखी पुरुषाचा मृतदेह |
सातारा शहरातून दोनजणी बेपत्ता |
डॉ आंबेडकर जयंती समारोह अध्यक्षपदी संजय गाडे यांची निवड |
शरद पवारांच्या डावपेचाकडे महाराष्ट्राचे लक्ष |
कराडला रविवारी इंडिया आघाडीचा मेळावा |
पश्चिम महाराष्ट्रात दि. २९ ते ३१ पर्यंत महावितरणचे वीजबिल भरणा केंद्र सुरू |
करंजे पेठतील थकबाकीदाराची पालिकेकडून मालमत्ता केली सील |
साताऱ्यात लोकसभेबाबत शुक्रवारी शरद पवारांची बैठक |
जमिनीच्या वादातून धारदार शस्त्राने एकाचा खून |
लोकसभा सार्वत्रिक निवडणूक-2024 |
कोल्हापूरला निघालेली खासगी ट्रॅव्हल्स झाली पलटी |
पुण्यातील पीएमटीच्या बसचालकाची सोनगाव येथे आत्महत्या |
झाड मारल्याप्रकरणी सातार्यात दोन गुन्हे दाखल |
अदानी ग्रुपचा वीज प्रकल्प रद्द करण्याठी प्रकल्पग्रस्त जिल्हाधिकारी कार्यालयावर काढणार मोर्चा |
प्रतापसिंह नगरात अतिक्रमणांसह लल्लन आणि युवराजच्या दहशतीवर जिल्हा प्रशासनाचा बुलडोझर |
पश्चिम महाराष्ट्रात दि. २९ ते ३१ पर्यंत महावितरणचे वीजबिल भरणा केंद्र सुरू |
करंजे पेठतील थकबाकीदाराची पालिकेकडून मालमत्ता केली सील |
साताऱ्यात लोकसभेबाबत शुक्रवारी शरद पवारांची बैठक |
जमिनीच्या वादातून धारदार शस्त्राने एकाचा खून |
लोकसभा सार्वत्रिक निवडणूक-2024 |
कोल्हापूरला निघालेली खासगी ट्रॅव्हल्स झाली पलटी |
पुण्यातील पीएमटीच्या बसचालकाची सोनगाव येथे आत्महत्या |
झाड मारल्याप्रकरणी सातार्यात दोन गुन्हे दाखल |
अदानी ग्रुपचा वीज प्रकल्प रद्द करण्याठी प्रकल्पग्रस्त जिल्हाधिकारी कार्यालयावर काढणार मोर्चा |
प्रतापसिंह नगरात अतिक्रमणांसह लल्लन आणि युवराजच्या दहशतीवर जिल्हा प्रशासनाचा बुलडोझर |
पाच नॅशनल पुरस्कार मिळवून श्लोक घोरपडे कोल्हापूर येथील स्पर्धेत मारणार बाजी |
'आयडियल' मतदारसंघाचे 'आयडॉल' आमदार |
आचारसंहिता काळात लोकशाही दिनाचे आयोजन होणार नाही : नागेश पाटील |
पोक्सोंतर्गत एकावर गुन्हा |
कुऱ्हाडीने वार केल्या प्रकरणी एकावर गुन्हा |