06:50pm | Mar 03, 2018 |
सातारा : सातारा औद्योगिक वसाहतीतील जिंदाल नामक मालकाच्या भिमेश्वरी इस्पात या कंपनीमुळे मोठ्या प्रमाणात प्रदुषण होत आहे. गेल्या चार वर्षांपासून हा प्रश्न ऐरणीवर असून महाराष्ट्र प्रदुषण नियंत्रण मंडळाच्या अधिकार्यांकडून कोणतीही कारवाई होत नाही. इतर कंपन्यांना कायद्याचा धाक मात्र जिंदालच्या कंपनीला सुट असे का? भिमेश्वरी इस्पात कंपनीचे प्रदुषण कोणाच्या अशिर्वादाने खपवून घेतले जात आहे? असा संतप्त सवाल करत कर्तव्य सोशल ग‘ुपच्या संस्थापिका श्रीमंत छ. सौ. वेदांतिकाराजे भोसले यांनी प्रदुषण नियंत्रण मंडळाचे अधिकारी बा.म. कुकडे यांना चांगलेच धारेवर धरले. सातारा : सातारा औद्योगिक वसाहतीतील जिंदाल नामक मालकाच्या भिमेश्वरी इस्पात या कंपनीमुळे मोठ्या प्रमाणात प्रदुषण होत आहे. गेल्या चार वर्षांपासून हा प्रश्न ऐरणीवर असून महाराष्ट्र प्रदुषण नियंत्रण मंडळाच्या अधिकार्यांकडून कोणतीही कारवाई होत नाही. इतर कंपन्यांना कायद्याचा धाक मात्र जिंदालच्या कंपनीला सुट असे का? भिमेश्वरी इस्पात कंपनीचे प्रदुषण कोणाच्या अशिर्वादाने खपवून घेतले जात आहे? असा संतप्त सवाल करत कर्तव्य सोशल ग‘ुपच्या संस्थापिका श्रीमंत छ. सौ. वेदांतिकाराजे भोसले यांनी प्रदुषण नियंत्रण मंडळाचे अधिकारी बा.म. कुकडे यांना चांगलेच धारेवर धरले. गेल्या चार वर्षांपासून सातारा औद्योगिक वसाहतीत भिमेश्वरी इस्पात या कंपनीतून धुराचे लोट बाहेर पडत आहेत. सदर कंपनीच्या प्रदुषणामुळे या कंपनीसह इतर कंपन्यातील कामगारांचे आरोग्य धोक्यात सापडले आहे. परिसरातील शेतीपिकांवर या प्रदुषणामुळे दुष्परिणाम होत आहेत. याबाबत परिसरातील शेतकरी, आसपासच्या कंपन्यातील अधिकारी आणि कामगारांनी महाराष्ट्र प्रदुषण नियंत्रण मंडळाच्या सातारा विभागाकडे सातत्याने तक‘ारी केल्या आहेत. तरीही कोणतीच कारवाई होत नसल्याने सौ. वेदांतिकाराजे यांनी प्रदुषण नियंत्रण मंडळाच्या कार्यालयात जावून कुकडे यांची भेट घेतली. यावेळी मासचे अध्यक्ष राजेश कोरपे, सचिव धैर्यशील भोसले, कूपर कंपनीचे नितीन देशपांडे, महेंद्र बाचल, कामगार संघटनेचे अध्यक्ष दिगंबर सांडगे, कर्तव्य सोशल ग‘ुपचे दिपक भोसले, विजय देशमुख, विलास कासार, चंदन घोडके, महेंद्र गार्डे आदी सदस्य आणि कारंडवाडीतील शेतकरी व ग‘ामस्थ उपस्थित होते. उपस्थित सर्वांनीच भिमेश्वरी इस्पात कंपनीचे प्रदुषण आणि प्रदुषण नियंत्रण मंडळाकडून होत असलेली डोळेझाक याबाबत संताप व्यक्त केला. गेल्या चार वर्षांपासून प्रदुषण नियंत्रण मंडळाच्या अधिकार्यांनी कागदी घोडे नाचवण्यापलिकडे काहीही केले नाही. आताही तेच चालू आहे. तुम्ही सरळ सरळ कंपनीच्या मालकास पाठीशी घालत आहात, याचा अर्थ काय समजायचा? असा सवाल उपस्थित करुन सौ. वेदांतिकाराजे यांनी प्रदुषण नियंत्रण मंडळाच्या कार्यपध्दीबाबत प्रश्नचिन्ह उपस्थित केले. प्रदुषण मंडळाच्या चुकीच्या कारभाराविरोधात पर्यावरण मंत्र्यांना भेटून त्यांनाच सदर कंपनी बंद करण्याची मागणी करण्याचा निर्णय यावेळी सौ. वेदांतिकाराजे आणि उपस्थित पदाधिकार्यांनी घेतला. महाबळेश्वरमधील हॉटेल बंद होते मग कंपनी का नाही? महाबळेश्वरमध्ये ध्वनीप्रदुषण केल्यामुळे उध्वव ठाकरेंसाठी हॉटेल बंद केले जाते. परंतु गेल्या चार वर्षांपासून एमआयडीसीतल कामगारांच्या आणि शेतकर्यांच्या जीवीताशी खेळणार्या भिमेश्वरी इस्पात या कंपनीवर कोणतीही कारवाई केली जात नाही. ही बाब गंभीर आहे. सर्वसामान्य कामगार आणि शेतकर्यांच्या जीवीताशी खेळणार्या कंपनीकडून होणारे प्रदूषण बंद करा. अशी आमची मागणी आहे आणि प्रदुषण बंद होत नसेल तर, सदर कंपनी बंद करा, अशी मागणी पर्यावरण मंत्र्यांना भेटून करणार असल्याची माहिती सौ. वेदांतिकाराजे यांनी पत्रकारांशी बोलताना दिली.
पंतप्रधान मोदी यांची सभा म्हणजे उदयनराजे यांच्या विजयाची नांदी |
वाट कशाची पाहता? कामाला लागा |
साताऱ्यात आरटीई प्रवेशासाठी पालकांचा कमी प्रतिसाद |
अफवांवर नाही, हवामान खात्यावर विश्वास ठेवा : हवामान खात्याचे प्रमुख सुनील कांबळे |
घोटाळेबाजांशी कायम लढत राहणार उदयनराजे गरजले |
साताऱ्यातील सुप्रसिद्ध डॉ. रविंद्र हर्षे यांचे दुःखद निधन |
भाजप देशाचे भविष्य तर काँग्रेस भूतकाळ उदयनराजे भोसले यांचा टोला |
कृष्णाबाई यात्रा महोत्सवाचा पालखी मिरवणुकीने शुभारंभ |
गंभीर गुन्हे करणार्या चौघांच्या टोळीला तडीपारीचा दणका |
बेकायदा दारु विक्रीप्रकरणी एकावर कारवाई |
आदेशाचे उल्लंघन केल्याप्रकरणी पाचजणांवर गुन्हा |
अपघातात जखमी केल्याप्रकरणी दुचाकी चालकावर गुन्हा |
वेगवेगळ्या घटनांमध्ये दोनजणी बेपत्ता |
सातारा शहरातील लल्लन टोळीवर मोक्का कारवाई |
कृष्णा खोरे महामंडळामुळे दुष्काळी भागात पाणी : उदयनराजे भोसले |
साताऱ्यातील सुप्रसिद्ध डॉ. रविंद्र हर्षे यांचे दुःखद निधन |
भाजप देशाचे भविष्य तर काँग्रेस भूतकाळ उदयनराजे भोसले यांचा टोला |
कृष्णाबाई यात्रा महोत्सवाचा पालखी मिरवणुकीने शुभारंभ |
गंभीर गुन्हे करणार्या चौघांच्या टोळीला तडीपारीचा दणका |
बेकायदा दारु विक्रीप्रकरणी एकावर कारवाई |
आदेशाचे उल्लंघन केल्याप्रकरणी पाचजणांवर गुन्हा |
अपघातात जखमी केल्याप्रकरणी दुचाकी चालकावर गुन्हा |
वेगवेगळ्या घटनांमध्ये दोनजणी बेपत्ता |
सातारा शहरातील लल्लन टोळीवर मोक्का कारवाई |
कृष्णा खोरे महामंडळामुळे दुष्काळी भागात पाणी : उदयनराजे भोसले |
लोकसभा निवडणुकीच्या मतदानाची वेळ वाढवून मिळावी |
सूर्योदयाच्या मुहूर्तावर हनुमान जन्मोत्सव साजरा |
सणबूरच्या यात्रेत कुस्तीच्या फडात आग्या मोहोळाचा हल्ला |
उदयनराजेंच्या पत्नी दमयंतीराजेंचा काँग्रेसवर गंभीर आरोप |
वाई, जावळी तालुक्यात अवकाळी पाऊस |