RNI REG.NO. MAHMAR/2014/56135

What are you looking for?

Contact Us

Address:

Email:

Tel:

Sadar Bazar, Satara, Maharashtra 415001

contact@tmnnews.com

02162 237 474

What are you looking for?

×

स्मार्ट टीव्ही हॅक करुन बनवला पती-पत्नीच्या खासगी क्षणांचा व्हिडीओ

20 July 2019 at 16:28

हॅकर्सवर कठोर कारवाई करण्याची खा. अमर साबळे यांची राज्यसभेत मागणी

नवी दिल्ली : देशात सायबर क्राईमचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत आहे. दररोज सायबर क्राईम विभागा अंतर्गत वेगवेगळ्या गुन्ह्यांची नोंद होत आहे. याबाबत महाराष्ट्रातील खासदार अमर साबळे यांनी राज्यसभेत आवाज उठवला आहे. सायबर क्राईमसाठी कारणीभूत ठरणाऱ्या हॅकर्सवर कठोर कारवाई करण्याची मागणी अमर साबळे यांनी केली आहे.

देशभरात सायबर क्राईमच्या गुन्हेगारीमध्ये वाढ होत असून हॅकर्स नेहमी वेगवेगळ्या पद्धतींचा अवलंब करत आहेत. एकीकडे आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करत लोक स्मार्ट होण्याचा प्रयत्न करत असताना हेच तंत्रज्ञान खासगी आयुष्यातही घुसखोरी करत आहे. आतापर्यंत स्मार्टफोनच्या माध्यमातून लोकांची फसवणूक झाल्याचं आपण अनेकदा पाहिलं आहे. पण गुजरातमध्ये हॅकर्सनी स्मार्ट टीव्हीच हॅक केल्याचं समोर आलं आहे.

हॅकर्सनी स्मार्ट टीव्ही हॅक करत पती-पत्नीचा खासगी व्हिडीओ तयार करत तो इंटरनेटवर अपलोड केला होता. दांपत्याने तो व्हिडीओ पाहिल्यानंतर ही घटना उघडकीस आली. खासदार अमर साबळे यांनी राज्यसभेत हा मुद्दा उपस्थित केल्याने हे प्रकरण चर्चेत आलं आहे. याप्रकरणी हॅकर्सविरोधात कडक कारवाई केली जावी अशी मागणी त्यांनी केली आहे.

 

माजी केंद्रीय अर्थमंत्री, ज्येष्ठ भाजप नेते अरुण जेटली यांचे निधन

माजी केंद्रीय अर्थमंत्री, भाजपचे ज्येष्ठ नेते, प्रसिद्ध वकील अरुण जेटली यांचे आज प्रदीर्घ आजारानं निधन झालं. ते ६६ वर्षांचे होते. दिल्लीतील एम्स रुग्णालयात त्यांनी अखेरचा श्वास घेतला. जेटली यांच्या निधनाने अत्यंत अभ्यासू आणि उत्कृष्ट संसदपटूला देश

yesterday

अखेर चिदंबरम अटकेत

आयएनएक्स मीडिया गैरव्यवहार प्रकरणात माजी केंद्रीय अर्थमंत्री आणि काँग्रेसचे ज्येष्ठ नेते पी. चिदंबरम यांना अखेर बुधवारी दिवसभराच्या नाट्यपूर्ण घडामोडींनंतर रात्री दहा वाजता सीबीआयने अटक केली. अटक टाळण्यासाठी चिदंबरम यांनी दिवसभर प्रयत्न केले.

22 August 2019 at 14:18