09:46pm | Nov 20, 2018 |
फलटण : जो पर्यंत विधान परिषदेचे सभापती मिस्टर रामराजे नाईक-निंबाळकर यांच्यावर गुन्हा दाखल होत नाही तोवर उपोषण सोडणार नाही. तसेच २५ नोव्हेंबरपर्यंत जर गुन्हा दाखल केला गेला नाही तर, मी आत्मदहन करणार असे आज दिगंबर आगवणे यांनी जाहिर केले. जर मला पोलिसांनी जबरदस्तीने दवाखान्यात नेवून उपोषण दडपण्याचा प्रयत्न केला तर आपण आत्मदहन करू असा इशारा स्वराज संघटनेचे जिल्हाध्यक्ष दिगंबर आगवणे यांनी दिला आहे. दरम्यान आगवणे यांच्या मागणीनुसार पंचायत समिती सदस्य सचिन रणवरे यांच्यावर गुन्हा नोंद करण्यात आला असून, बनावट कागदपत्रे तयार केल्याप्रकरणी दोषी कर्मचारी आणि अधिकाऱ्यांवर कारवाईचे संकेत पोलिसांनी दिले आहेत.
लोणंद ता. खंडाळा येथील एका गुन्ह्यात जाणीवपूर्वक नाव गोवण्यासाठी पोलीस प्रशासनावर दबाव टाकणे, शासकीय कामात अडथळा करणे व पदाचा गैरवापर केल्याप्रकरणी विधानपरिषदेचे सभापती मिस्टर रामराजे नाईक-निंबाळकर यांच्यावर गुन्हा दाखल करावा या मागणीसह कामांच्या गुणवत्तेची चाचणी अहवाल बनावट सादर केल्याप्रकरणी फलटण पंचायत समिती सदस्य सचिन रणवरे यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात यावा. रिवॉल्व्हर प्रकरणी बनावट दाखले दिल्याप्रकरणी सबंधित अधिकारी व पोलीस कर्मचारी यांच्यावर गुन्हे दाखल करावेत. यामागणीसाठी स्वराज संघटनेचे अध्यक्ष दिगंबर आगवणे हे गेल्या चार दिवसांपासून फलटण येथील प्रांत कार्यालयाच्या प्रवेशद्वारा समोर आमरण उपोषणास बसले आहेत. आज उपोषणाच्या चौथ्या दिवशी आगवणे समर्थकांनी आत्मदहनाचा इशारा दिला होता. या आत्मदहनाच्या इशाऱ्यामुळे आज प्रांत व तहसीलदार परिसरात तणावाचे वातावरण होते.
पोलिसांनी आज सकाळ पासूनच या परिसरात तगडा पोलीस बंदोबस्त लावला होता. आगवणे यांची प्रकृती खालावल्याने व प्रशासनाकडून या आंदोलनाची दखल घेतली गेली नसल्याने आगवणे समर्थकांमध्ये संतापाचे वातावरण निर्माण झाले होते. आज दुपारी सातारा येथील उपविभागीय पोलीस अधिकारी तथा सहा. पोलीस अधीक्षक समीर शेख यांनी दिगंबर आगवणे यांचा येथील उपविभागीय पोलीस अधिकारी कार्यालयात या प्रकरणी जबाब घेतला तसेच बोगस टेस्ट रिपोर्ट व त्यांच्या बंदुकीच्या चुकीच्या नोंदी प्रकरणी कारवाई करण्याचे आदेश दिले. परंतु आगवणे यांनी लोणंद ता. खंडाळा येथील एका गुन्ह्यात जाणीवपूर्वक आपले नाव गोवण्यासाठी पोलीस प्रशासनावर दबाव टाकणे, शासकीय कामात अडथळा करणे व पदाचा गैरवापर केल्याप्रकरणी विधानपरिषदेचे सभापती मिस्टर रामराजे नाईक-निंबाळकर यांच्यावर गुन्हा दाखल करावा अशी मागणी केली. मात्र सहा. पोलीस अधीक्षक समीर शेख यांनी यांनी आगवणे यांच्या मागणीला बगल देत वेळ मारून नेण्याचा प्रयत्न केला. मात्र आगवणे यांनी सभापती मिस्टर रामराजे नाईक-निंबाळकर यांच्यावर गुन्हा दाखल करावा या मागणीसाठी ठाम राहिले. दरम्यान पोलिस जो पर्यत मि. रामराजेंवर गुन्हा दाखल करणार नाहीत तोपर्यंत उपोषण सोडणार नाही असा पवित्रा आगवणे यांनी घेतल्यामुळे पोलीस प्रशासनासमोर पेच वाढला आहे. आगवणे यांनी पोलिसांना २५ नोव्हेंबरचा 'अल्टीमेटम' दिला असून पोलिसांनी जबरदस्ती केल्यास आत्मदहन करणार असल्याचा इशारा दिला आहे.
समीर शेख यांची 'नो-कमेंट्स'
स्वराज संघटनेचे जिल्हाध्यक्ष दिगंबर आगवणे गेल्या चार दिवसांपासून आपल्या मागण्यांसाठी आमरण उपोषणास बसले आहेत, यापैकी दोन मागण्या पोलिसांनी आज मान्य केल्या, मात्र लोणंद ता. खंडाळा येथील एका गुन्ह्यात जाणीवपूर्वक नाव गोवण्यासाठी पोलीस प्रशासनावर दबाव टाकणे, शासकीय कामात अडथळा करणे व पदाचा गैरवापर केल्याप्रकरणी विधानपरिषदेचे सभापती मिस्टर रामराजे नाईक-निंबाळकर यांच्यावर गुन्हा दाखल करावा या मागणीला सहा. पोलीस अधीक्षक समीर शेख यांनी बगल दिली. त्यामुळे आगवणे यांनीही पोलिसांना २५ नोव्हेंबरचा 'अल्टीमेटम दिला आहे. या पार्श्वभूमीवर माध्यमांच्या प्रतिनिधींनी सहा. पोलीस अधीक्षक समीर शेख यांच्याशी संपर्क साधून माहिती घेण्याच्या प्रयत्न केला असता, त्यांनी अधिक माहिती देण्यास असमर्थता दर्शवित 'नो-कमेंट्स' असे सांगितले.
मंदार कोल्हटकर, धिरज पाटील यांचे अपघाती निधन |
ट्रकच्या धडकेत दुचाकीस्वाराचा मृत्यू |
राजवाडा परिसरातून सव्वा लाखांच्या सोन्याच्या चैनची चोरी |
मारहाण प्रकरणी चौघांवर गुन्हा |
ट्रक चालकाला लुटल्याप्रकरणी तीन अज्ञातांवर गुन्हा |
महिलेचा विनयभंग केल्याप्रकरणी एकावर गुन्हा |
सराईत गुन्हेगाराने दिली तीन घरफोड्यांची कबुली |
उदयनराजे यांच्या समर्थनार्थ सातार्यात लोटला जनसागर |
शिक्षक हेच सुसंस्कृत समाजनिर्मितीचे जनक |
अजिंक्यतारा कारखान्यावर वादातून झाला गोळीबार |
जनता बँक साताराच्या तज्ज्ञ संचालकपदी सौरभ रायरीकर, राजेंद्र जाधव यांची निवड |
महिलेची गळफास घेवून आत्महत्या |
एकाच्या मृत्यूप्रकरणी कार चालकावर गुन्हा |
संशयित माल जवळ बाळगल्याप्रकरणी एकावर गुन्हा |
राहत्या घरातून युवती बेपत्ता |
महिलेचा विनयभंग केल्याप्रकरणी एकावर गुन्हा |
सराईत गुन्हेगाराने दिली तीन घरफोड्यांची कबुली |
उदयनराजे यांच्या समर्थनार्थ सातार्यात लोटला जनसागर |
शिक्षक हेच सुसंस्कृत समाजनिर्मितीचे जनक |
अजिंक्यतारा कारखान्यावर वादातून झाला गोळीबार |
जनता बँक साताराच्या तज्ज्ञ संचालकपदी सौरभ रायरीकर, राजेंद्र जाधव यांची निवड |
महिलेची गळफास घेवून आत्महत्या |
एकाच्या मृत्यूप्रकरणी कार चालकावर गुन्हा |
संशयित माल जवळ बाळगल्याप्रकरणी एकावर गुन्हा |
राहत्या घरातून युवती बेपत्ता |
वाई, जावळी परिसरात जोरदार अवकाळी पाऊस |
विरोधकांच्या रडीच्या डावाला जनता भुलणार नाही |
महायुतीचे आज सातार्यात जोरदार शक्ती प्रदर्शन |
सातारा जिल्ह्यात राम लल्लाच्या गजराने रामनवमी साजरी |
उदयनराजे यांच्या शक्तीप्रदर्शनासाठी आमदार शिवेंद्रसिंहराजे सज्ज |