07:25pm | Apr 09, 2020 |
सातारा : संचारबंदीच्या काळात बारा-बारा तास ड्युटी करणाऱ्या पोलिसांसाठी एक आनंददायक बातमी आहे, ती म्हणजे चोरटे अज्ञातवासात गेल्याची. सुदैवाने गेल्या काही दिवसांमध्ये जिल्ह्यातील क्राईम रेट कमालीचा घटला असल्याचे दिसून येत आहे. विशेष म्हणजे जिल्ह्याचे मुख्यालय असणाऱ्या सातारा येथील कंट्रोल, शहर, तालुका, शाहूपुरी, सिव्हिल पोलीस ठाणे निल असल्याचे दिसून येत असल्यामुळे पोलिसांच्या डोक्याचा ताप कमी झाला आहे.
कराडमध्ये टोळीयुद्ध, फलटणमध्ये खाजगी सावकारी, माण - खटाव तालुक्यात बेकायदेशीर वाळू उत्खनन, खंडाळा तालुक्यात कामगार संघटनांची गटबाजी, त्यातून अपहरणाच्या घटना, जावली तालुक्यात बंदी असतानाही बेकायदेशीर दारू विक्री, जुगार मटक्याचे अड्डे जोमात, सातारा तालुक्यात जबरी चोरी, हाणामाऱ्या, फसवणुकीच्या घटना या सातारा जिल्ह्यात नित्याची बाब झाली आहे. जिल्ह्याची राजधानी असणाऱ्या सातारा शहर व तालुक्यात दिवसभरात किमान १० क्राईमशी संलग्न घटना घडत होत्या. अलीकडच्या काळामध्ये खून, खुनाचा प्रयत्न, खंडणी याचेही प्रमाणही वाढले असल्याचे आकडेवारीवरून स्पष्ट होते. क्राईमच्या घटना घडल्यानंतर त्या उघडकीस आणण्यात स्थानिक गुन्हे शाखेसह संबंधित पोलिस ठाण्याच्या गुन्हे प्रकटीकरण पथकाला चांगलेच यश येत असले तरी क्राईमच्या घटना घडण्यात मात्र घट होत नव्हती. विशेषता उन्हाळ्याच्या दिवसात ग्रामीण भागात चोरी, घरफोडी, दरोडा, यात्रा जत्रामध्ये हाणामारी या घटनांमध्ये मोठ्या प्रमाणावर वाढ होत असते हे विशेष.
सातारा जिल्ह्यामध्ये नव्याने आलेले पोलीस अधीक्षक आपापल्या पद्धतीने जिल्ह्यातील क्राईम रेट कमी कसा होईल यासाठी सातत्याने प्रयत्न करत असतात. यापूर्वी सातारा जिल्ह्यात काम करणारे तत्कालीन पोलीस अधीक्षक के.एम.एम. प्रसन्ना, डॉ. अभिनव देशमुख, संदीप पाटील यांची कामगिरी उजवी ठरली आहे. वर्षभरापूर्वी पंकज देशमुख यांची बदली झाल्यानंतर त्यांच्या जागी रुजू झालेल्या तेजस्वी सातपुते यांनी पोलीस अधीक्षक पदाची सूत्रे स्वीकारताच सातारा जिल्हा पोलिस दलाला विश्वासात घेऊन काम करणार असल्याचे स्पष्ट केल्यामुळे त्या जिल्ह्यात वेगळे काहीतरी करून दाखवतील, याबाबत जनतेच्या मनात विश्वास निर्माण झाला होता. तेजस्वी सातपुते यांनी अल्पावधीतच त्यंत चांगली कामगिरी करून दाखवत अनेक गंभीर गुन्हे उघडकीस आणण्यासाठी आपले कसब पणाला लावले त्यात त्यांना चांगले प्रमाणात यश आले.
अप्पर पोलीस अधीक्षक धीरज पाटील, सहाय्यक पोलीस अधीक्षक समीर शेख, स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक पाटील यांच्या मदतीने तेजस्वी सातपुते यांना जिल्ह्यातील गुन्हेगारीवर काही प्रमाणात नियंत्रण मिळवता आले आहे. जिल्ह्यातील क्राईमच्या घटनांचा तपास सुरू असतानाच कोरोनाचा धोका टाळण्यासाठी देशभरात लॉक डाऊन करण्यात आला. ओघानेच सातारा जिल्ह्यात संचारबंदी लागू झाली. या संचारबंदी चा फायदा सर्वाधिक पोलिस प्रशासनाला झाला. २४ मार्चनंतर सातारा जिल्ह्यात क्राईमच्या घटना अत्यंत दुर्मिळ घडल्या. जानेवारी, फेब्रुवारी २०२० च्या तुलनेत २४ मार्चनंतर आज अखेर चोरी, दरोडा, हाणामारी, दोन गटात वाद, विनयभंग, परस्परविरोधी तक्रारी याचे प्रमाण शून्य टक्क्यावर असल्याचे दिसून येत आहे. ज्या सातारा शहर व परिसरात चोरट्यांनी हैदोस घातला होता तेच चोरटे आज अज्ञातवासात गेल्याचे चित्र दिसून येत आहे. ही बाब पोलिसांसाठी निश्चितच दिलासादायक ठरत असावी. आज सातारा शहरासह जिल्ह्यातील कोणत्याही पोलिस ठाण्यात क्राईम ची माहिती घेण्यासाठी फोन केला असता त्याचे प्रमाण खडखडीत म्हणजेच शून्य असल्याचे दिसून येत असल्यामुळे बारा बारा तास पोलीस बंदोबस्तावर असलेल्या पोलिसांसाठी मात्र ही बाब दिलासादायक ठरत आहे.
उदयनराजे यांना मतदान करून गादीचा सन्मान ठेवा |
जपानचे स्लिम लँडर तिसऱ्यांदा जागृत |
कोल्हापुरातील अंबाबाईच्या रथोत्सव |
छत्रपतींच्या वंशजांना जावळीचा स्वाभिमान सांगू नका |
माझ्याकडे विरोधकांच्या अनेक भानगडी |
महाभकास आघाडीला निवडणुकीत जागा दाखवा |
साताऱ्यात मेघगर्जनेसह बरसल्या पावसाच्या सरी |
जनता बँकेत पुर्नगठीत बोर्ड ऑफ मॅनेजमेंटच्या चेअरमनपदी विनोद कुलकर्णी |
बोंडारवाडीसह धरणांची कामे मार्गी लावणार उदयनराजेंचे आश्वासन |
दलित महासंघ,पॅंथरचा उदयनराजेंना जाहीर पाठींबा |
सातारकरांना बाहेरच्यांनी स्वाभिमान शिकवू नये |
साताऱ्यात कोट्यावधीची कामे हीच आपली जमेची बाजू |
जुगार प्रकरणी एकावर कारवाई |
नोकरीच्या अमिषाने सुमारे पावणे सहा लाखांची फसवणूक |
शहरातील दोन वेगवेगळ्या घटनांमध्ये दोनजण बेपत्ता |
महाभकास आघाडीला निवडणुकीत जागा दाखवा |
साताऱ्यात मेघगर्जनेसह बरसल्या पावसाच्या सरी |
जनता बँकेत पुर्नगठीत बोर्ड ऑफ मॅनेजमेंटच्या चेअरमनपदी विनोद कुलकर्णी |
बोंडारवाडीसह धरणांची कामे मार्गी लावणार उदयनराजेंचे आश्वासन |
दलित महासंघ,पॅंथरचा उदयनराजेंना जाहीर पाठींबा |
सातारकरांना बाहेरच्यांनी स्वाभिमान शिकवू नये |
साताऱ्यात कोट्यावधीची कामे हीच आपली जमेची बाजू |
जुगार प्रकरणी एकावर कारवाई |
नोकरीच्या अमिषाने सुमारे पावणे सहा लाखांची फसवणूक |
शहरातील दोन वेगवेगळ्या घटनांमध्ये दोनजण बेपत्ता |
विवाहितेला आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी पती विरुध्द गुन्हा |
शाहूनगर येथे घरफोडी |
पंतप्रधान मोदी यांची सभा म्हणजे उदयनराजे यांच्या विजयाची नांदी |
वाट कशाची पाहता? कामाला लागा |
साताऱ्यात आरटीई प्रवेशासाठी पालकांचा कमी प्रतिसाद |