RNI REG.NO. MAHMAR/2014/56135

What are you looking for?

Contact Us

Address:

Email:

Tel:

Sadar Bazar, Satara, Maharashtra 415001

contact@tmnnews.com

02162 237 474

What are you looking for?

×

पुतण्याच्या हातून शरद पवारांची 'हिट विकेट' : मोदी

01 April 2019 at 16:29

वर्धा : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी वर्ध्यातील प्रचारसभेत राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते शरद पवार यांच्यावर जोरदार तोफ डागली आहे. 'पंतप्रधानपदाचे स्वप्न पाहणारे आता निवडणूक लढवण्यासच नकार देत आहेत. कारण त्यांना माहीत आहे हवेची दिशा कोणत्या दिशेला आहे, अशा शब्दांत पंतप्रधान मोदी यांनी पवार यांच्यावर शाब्दिक हल्ला चढवला. पवारांवर टीका करताना, भारतीय जनता पक्षाने भल्याभल्यांना मैदानातून पळवून लावल्याचे म्हणत पंतप्रधान मोदींनी पवारांना टोला लगावला. शरद पवारांवर चौफेर हल्ला चढवताना, 'शरद पवार यांच्या पुतण्याच्या हातूनच त्यांची हिट विकेट गेली' असे जोरदार टोला मोदी यांनी पवार यांना लगावला. 

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये आता खूप मोठे कौटुंबिक युद्ध सुरू झाले आहे. शरद पवार यांची पक्षावरील पकड आता सुटत चालली आहे. आता हळूहळू पवार यांचा पुतण्या पक्ष आपल्या ताब्यात घेऊ पाहात असे असे अजित पवार यांचे नाव न घेता पंतप्रधान मोदी म्हणाले. कौटुंबिक युद्धामुळे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला उमेदवारांना तिकिटे देण्यातही अडथळे आले. कोणाला कुठली जागा द्यावी, कुठून लढावे हा मोठा प्रश्न पवारांपुढे उभा राहिला. यामुळे पक्षातील इतर नेत्यांचे धैर्य समाप्त झाल्याचेही मोदी म्हणाले. 

शरद पवार हे देशात सर्वात अनुभवी नेत्यांपैकी एक समजले जातात. ते जे काही बोलतात, जे काही करतात, ते-ते विचारपूर्वक करत असतात. अशा शरद पवार यांनी यावेळी निवडणुकीची हवा कोणत्या दिशेला वाहतेय हे लक्षात आल्याने ते मैदान सोडून पळाले. 

विधानपरिषदेचे सभापती नेमके कोणाचे ?

राज्याच्या सर्वोच्च सभागृहाचे सभापती खरे तर सर्व पक्षांचे हवे पण ते एका पक्षाचे असल्यासारखे वागत आहेत,'' त्यामुळे विधानपरिषदेचेसभापती नेमके कोणाचे? हा प्रश्‍न आता उपस्थित झाला आहे.

yesterday

मंत्रिमंडळाच्या विस्तारानंतर खातेवाटप जाहीर; पाहा, कोणाला मिळालं कुठलं खातं?

राज्य मंत्रिमंडळाचा रविवारी सकाळी (दि.१६) विस्तार झाल्यानंतर नव्याने १३ मंत्र्यांना मंत्रिमंडळात समावून घेण्यात आले. तर विद्यमान ६ मंत्र्यांना मंत्रिमंडळातून वगळण्यात आले.

17 June 2019 at 14:44