11:53pm | Apr 08, 2019 |
कराड : येत्या लोकसभा निवडणुकीत मतदानाची टक्केवारी वाढावी व निवडून जाणारा उमेदवार सदृढ लोकशाहीच्या पाठबळावर संसदेत जावा. त्यासाठी लोकशाहीत मतदानाचा अधिकार किती महत्वाचा आहे, याची जनजागृती व्हावी याहेतूने शेणोली (ता.कराड) येथील संजीवनी विद्यामंदिरमध्ये विद्यार्थ्यांनी पालकांना पत्र लिहली आहेत. विद्यार्थ्यांनी अतिशय मार्मिक मजकुरात सदरची पत्र लिहली आहेत. त्या मजकुरामध्ये पालकांना मतदान किती महत्वाचे आहे हे सांगतानाच आपली लोकशाही किती प्रबळ आहे याचे शाब्दिक अनुभव कथनही करण्यात आला आहे. या उपक्रमातून तयार झालेली 130 पत्रे पोस्टातून प्रत्येक पालकांच्या घरी पोहच केली जाणार आहेत.
संजीवनी शिक्षण संस्थेचे शेणोलीत संजीवनी विद्यामंदीर कार्यरत आहे. पाचवी ते दहावीपर्यंत गाव व परिसरातील विद्यार्थ्यांना ज्ञानदान दिले जाते. निवडणूक आयोगाने येत्या लोकसभा निवडणुकीबाबत जोरदार जनजागृती सुरु केली आहे. त्याअंतर्गत विविध स्तरावर उपक्रम राबवले आहेत. शैक्षणिक पातळीवर मतदान जनजागृतीसाठी मोठा भर दिला जात आहे. निवडणूक आयोगाच्या तत्वानुसार जनजागृती सुरू असताना यामध्ये संजीवनी विद्यामंदिरने आघाडी घेतली आहे.
मतदान हे पवित्र दान आहे. प्रत्येक भारतीय नागरिकाने मतदानाचा हक्क बजावला पाहिजे. निवडणुकीत मतदान कमी झाल्यास जनतेचे बहुमत न घेता उमेदवार निवडला जाईल. मतदानाची टक्केवारी वाढल्यास लोकशाही सदृढ होईल. बहुमताने उमेदवार निवडून दिल्यास निश्चितच उमेदवाराची जबाबदारी वाढेल. या जनजागृतीसाठी संजीवनी विद्यामंदिरने गावातून प्रभातफेरी काढली.
व त्यापुढील पाऊल टाकत विद्यार्थ्यांकडून पालकांना पत्र लिहून घेतली. ती पत्र पालकांना दाखवून त्यावर त्यांच्या स्वाक्षर्या नोंदवण्यात आल्या आहेत. या उपक्रमातून 130 पत्र तयार झाली आहेत. ती पोस्टाच्या माध्यमातून प्रत्येक पालकांकडे पोहोचवली जाणार आहेत. मुख्याध्यापक व्ही. डी. देशमुख म्हणाले, या उपक्रमातून विद्यार्थ्यांमध्ये मतदानाबाबत जाणीव जागृती झाली. भविष्यात कोणीही मतदानापासून वंचित राहू नये, ही बाब विद्यार्थ्यांच्या लक्षात आली.
मुख्याध्यापक देशमुख व सर्व शिक्षकांच्या मार्गदर्शनाखाली हा उपक्रम राबविण्यात आला. यावेळी शेणोली विकास सेवा सोसायटीचे चेअरमन पोपटराव जगताप, माजी चेअरमन सुनिल शामराव कणसे, सुरेंद्रनाथ कणसे, अधिकराव चव्हाण, महेश कणसे (मेहरबान), सुहास कणसे, पोलीस पाटील सुनिता पवार उपस्थित होते.
सातारा शहरातील लल्लन टोळीवर मोक्का कारवाई |
कृष्णा खोरे महामंडळामुळे दुष्काळी भागात पाणी : उदयनराजे भोसले |
लोकसभा निवडणुकीच्या मतदानाची वेळ वाढवून मिळावी |
सूर्योदयाच्या मुहूर्तावर हनुमान जन्मोत्सव साजरा |
सणबूरच्या यात्रेत कुस्तीच्या फडात आग्या मोहोळाचा हल्ला |
उदयनराजेंच्या पत्नी दमयंतीराजेंचा काँग्रेसवर गंभीर आरोप |
वाई, जावळी तालुक्यात अवकाळी पाऊस |
अल्पवयीन मुलीवर अत्याचार करणाऱ्या युवकाला सश्रम कारावास |
उदयनराजे यांनी घेतले वाईच्या महागणपतीचे दर्शन |
तरुणांच्या भवितव्यासाठी मोदींच्या नेतृत्वाखाली स्थिर सरकार निवडून देऊया उदयनराजे यांचे आवाहन |
पाण्याच्या मोटरची चोरी |
सिव्हिल हॉस्पिटलच्या पार्किंगमधून दुचाकीची चोरी |
चैन स्नॅचिंग प्रकरणी दोन अज्ञातांवर गुन्हा |
अपघातात जखमी केल्याप्रकरणी एकावर गुन्हा |
अवैध दारु प्रकरणी दोघांवर कारवाई |
उदयनराजेंच्या पत्नी दमयंतीराजेंचा काँग्रेसवर गंभीर आरोप |
वाई, जावळी तालुक्यात अवकाळी पाऊस |
अल्पवयीन मुलीवर अत्याचार करणाऱ्या युवकाला सश्रम कारावास |
उदयनराजे यांनी घेतले वाईच्या महागणपतीचे दर्शन |
तरुणांच्या भवितव्यासाठी मोदींच्या नेतृत्वाखाली स्थिर सरकार निवडून देऊया उदयनराजे यांचे आवाहन |
पाण्याच्या मोटरची चोरी |
सिव्हिल हॉस्पिटलच्या पार्किंगमधून दुचाकीची चोरी |
चैन स्नॅचिंग प्रकरणी दोन अज्ञातांवर गुन्हा |
अपघातात जखमी केल्याप्रकरणी एकावर गुन्हा |
अवैध दारु प्रकरणी दोघांवर कारवाई |
वाहनावर विनापरवाना स्पिकर लावल्याप्रकरणी एकावर कारवाई |
सातारा लोकसभेसाठी एकूण १६ उमेदवार रिंगणात |
उमेदवारांच्या निवडणुक खर्चाची नोंदवही तपासण्याचे वेळापत्रक जाहीर ; जिल्हा निवडणूक निर्णय अधिकारी डुडी |
छत्रपती संभाजी महाराज शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयतर्फे विविध आरोग्यविषयक उपक्रमांचे आयोजन |
प्लास्टिक पाईपने बेदम मारहाण करून युवकाचा केला निर्घृण खून |