RNI REG.NO. MAHMAR/2014/56135

What are you looking for?

Contact Us

Address:

Email:

Tel:

Sadar Bazar, Satara, Maharashtra 415001

contact@tmnnews.com

02162 237 474

What are you looking for?

×

प्रियांका चोप्रा म्हणते, मला पंतप्रधान व्हायला आवडेल!

03 June 2019 at 15:11

मुंबई : आपल्या अभिनयाच्या जोरावर बॉलिवूडसह हॉलिवूडही गाजवणारी अभिनेत्री म्हणजे प्रियांका चोप्रा. बॉलिवूडच्या या 'देसी गर्ल'ला आता राजकारणात प्रवेश करायचा आहे. इतकंच नव्हे, तर तिला थेट आपल्या देशाचं पंतप्रधान व्हायचं आहे. 

प्रियांकानं अलीकडेच दिलेल्या एका मुलाखतीत तिच्या राजकीय महत्त्वाकांक्षांबद्दल सांगितलं. 'मला भविष्यात पंतप्रधानपद भूषवायला आवडेल' असं ती म्हणाली. शिवाय, पती निक जोनस यानंदेखील अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षपदाची निवडणूक लढवावी अशी इच्छा तिनं व्यक्त केली आहे. 

प्रियांकानं याच मुलाखतीत बोलताना हे स्पष्ट केलं की, 'एरव्ही मी किंवा निक राजकारणात फार रस घेत नाही. परंतु, हे जग बदलण्यासाठी, अधिक सुंदर बनवण्यासाठी आम्ही दोघंही प्रयत्नशील असतो. त्यामुळे राजकारणात सक्रिय सहभाग घेण्याची एखादी संधी भविष्यात चालून आली तर नाही म्हणून चालणार नाही'