08:32pm | Nov 25, 2018 |
कराड : फलटण येथे दि. 23 नोव्हेंबरच्या पहाटे येथील सामाजिक कार्यकर्ते व स्वराज संघटनेचे अध्यक्ष दिगंबर आगवणे यांच्या लोकशाही व सनदशीर मार्गाने चाललेल्या आंदोलनावर फलटण पोलिसांनी सशस्त्र हल्ला केला होता. हल्ल्यामुळे व्यथित झालेल्या आगवणे यांनी विष प्राशन करुन आत्महत्त्येचा प्रयत्न केला होता. त्यामुळे चिडलेल्या आगवणे समर्थकांनी प्रक्षुब्ध होवून फलटण शहर पोलीस ठाण्यात जावून जाब विचारला असता फलटण पोलिसांनी आपल्या बळाचा गैरवापर करीत शेकडो आगवणे समर्थकांवर लाठीहल्ला करीत चोपून काढले होते. या हल्ल्यात अनेकजण गंभीर जखमी झाले आहेत. जखमींमध्ये महिलांचाही समावेश आहे. याप्रकरणी न्याय मागण्यासाठी आज कृष्णा खोरे महामंडळाचे माजी उपाध्यक्ष रणजितसिंह नाईक-निंबाळकर, माण-खटावचे आमदार जयकुमार गोरे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेवून दिगंबर आगवणे व कार्यकर्त्यांवर झालेल्या अन्यायाचा पाढा वाचला. त्यावेळी मुख्यमंत्र्यांनी उपोषणकर्त्यांवर केलेल्या हल्ल्याप्रकरणी दोषी पोलिसांवर कठोर कारवाई करण्याचे आश्वासन दिले आहे.
दि. 17 नोव्हेंबरपासून सामाजिक कार्यकर्ते व स्वराज संघटनेचे अध्यक्ष दिगंबर रोहिदास आगवणे रा. गिरवी, ता. फलटण हे सहा दिवस आपल्यावर झालेल्या अन्यायाच्या विरोधात व विविध मागण्यांसाठी फलटण येथील अधिकार गृहासमोर उपोषणास बसले होते. यावेळी जिल्हा प्रशासनाकडून त्यांच्या उपोषणाची कसल्याही प्रकारची दखल घेतली नव्हती. केवळ एकच मागणी मान्य करुन पोलिसांनी तोंडाला पाने पुसण्याचा प्रकार केला होता. तसेच फलटणमधील एका शक्तीशाली पुढार्याच्या आदेशाने फलटण पोलिसांनी दिगंबर आगवणे यांचे उपोषण मोडित काढण्यासाठी प्लॅन आखला होता. याची कुणकुण आगवणे यांना लागल्यानंतर आगवणे यांनी पोलिसांनी जर पोलिसांनी उपोषण उधळण्याचा अथवा दगाफटका करण्याचा प्रयत्न केला तर विष पिवून आत्महत्त्या करण्याचा इशारा दिला होता. यासंबंधीची सुसाईड नोटही जिल्ह्यातील समाजमाध्यमांमध्ये व्हायरल झाली होती. असे असतानाही पोलिसांनी कोणत्याही प्रकारचे होमवर्क न करता दि. 23 नोव्हेंबरच्या पहाटे दिगंबर आगवणे यांच्या उपोषणस्थळी जावून तिथे असलेल्या आगवणे समर्थकांना अर्वाच्य भाषेत शिवीगाळ करुन दिगंबर आगवणे कुठे आहे? असे विचारले. मात्र दिगंबर आगवणेंना पोलीस आपले उपोषण उधळणार असल्याची अगोदरच कुणकुण लागल्यामुळे आगवणे उपोषण स्थळाच्या समोर उभ्या केलेल्या चारचाकी गाडीत जावून बसले होते. यानंतर पोलिसांनी दिगंबर आगवणे बसलेल्या गाडीकडे मोर्चा वळवत त्यांना खेचून बाहेर काढण्याचा प्रयत्न केला असता आगवणे यांनी त्यांच्याजवळ असलेल्या विषाच्या बाटलीतून विष प्राशन केले. विष प्राशन करताच आगवणे यांची प्रकृती ढासळल्याने त्यांच्या समर्थकांनी त्यांना येथील खासगी रुग्णालयात दाखल केले. यावेळी प्रक्षुब्ध झालेला जमाव जाब विचारण्यासाठी फलटण शहर पोलिस ठाण्यात धडकला. यावेळी काही प्रक्षुब्ध कार्यकर्त्यांनी पोलीस ठाण्यावर तुफान दगडफेक केली. त्यामुळे या दगडफेकीत फलटण शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक व काही कर्मचारी जखमी झाले. त्यामुळे पोलिसांनी जमावावर लाठीचार्ज करण्यास सुरुवात केली. या लाठीचार्जमुळे एकच धावपळ उडाली. यामध्ये महिला पुरुषांसह अनेकजण जखमी झाले. 23 तारखेला सकाळपासूनच पोलिसांनी आगवणे कार्यकर्त्यांचे अटकसत्र सुरु केले होते. याप्रकरणी 90 पेक्षा जास्त लोकांवर गुन्हे दाखल करण्यात आले असून आतापर्यंत दहाजणांना अटक करण्यात आलेली आहे.
दिगंबर आगवणे यांच्या पत्नी व पंचायत समिती सदस्या सौ. जयश्री आगवणे यांच्यावर जिवे मारण्याचा प्रयत्न, सरकारी कामात अडथळा, दंगल घडवणे अशा प्रकारचे गंभीर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. त्यामुळे फलटण तालुक्यात प्रक्षुब्धतेचे वातावरण निर्माण झालेले आहे. दिगंबर आगवणे यांची प्रकृती अद्याप चिंताजनक आहे. या पार्श्वभूमीवर माण-खटावचे आमदार जयकुमार गोरे, कृष्णा खोरे विकास महामंडळाचे माजी उपाध्यक्ष रणजितसिंह नाईक-निंबाळकर, फलटण तालुका संघर्ष समितीचे अध्यक्ष ऍड. नरसिंह निकम, शेतकरी संघटनेचे धनंजय महामुलकर, भाजपचे सुशांत निंबाळकर यांच्यासह फलटण तालुक्यातील सर्वपक्षीय पदाधिकार्यांनी राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची कराड येथील विमानतळावर भेट घेतली. यावेळी आमदार गोरे व रणजितसिंह नाईक-निंबाळकर यांनी सामाजिक कार्यकर्ते दिगंबर आगवणे यांचे लोकशाही व सनदशीर मार्गाने चाललेले उपोषण फलटणमधील सत्ताधार्यांच्या आदेशाने पोलिसांनी उधळून लावले. दिगंबर आगवणे यांना आत्महत्त्येचा प्रयत्न करण्यास प्रवृत्त केले. तालुक्यातील निष्पाप कार्यकर्ते व पदाधिकार्यांवर खोटे गंभीर गुन्हे दाखल केले, याचा पाढाच वाचला. त्यामुळे मुख्यमंत्रीही ही सर्व घटना ऐकून अचंबित झाले. त्यांनी तत्काळ आगवणे प्रकरणात ज्या पोलिसांनी कायदा हातात घेतला, त्यांच्यावर कठोर कारवाई करण्याचे आश्वासन दिले तसेच या प्रकरणात काहीही संबंध नसताना ज्या-ज्या लोकांवर गुन्हे दाखल झाले आहेत. अशांवर 169 प्रमाणे गुन्हे मागे घेण्यात येतील. त्याचप्रमाणे वेळ पडल्यास या प्रकरणाची सीआयडी चौकशी करु, असे आश्वासनही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आ. जयकुमार गोरे, रणजितसिंह नाईक-निंबाळकर यांना दिले. त्यामुळे फलटणहून कराड येथे भेटावयास आलेल्या सर्वपक्षीय कार्यकर्ते व पदाधिकार्यांनी मुख्यमंत्र्यांच्या आश्वासनाचे स्वागत केले.
अन्यायाची सखोल चौकशी करणार : पंकज देशमुख
फलटण येथील दिगंबर आगवणे यांचे उपोषण पोलिसांनी दबावाचा वापर करीत उधळून लावले, हा आरोप फेटाळून लावत सातारा जिल्हा पोलीस अधीक्षक पंकज देशमुख यांनी फलटण पोलिसांनी नियमानुसारच त्यांचे काम केले आहे असे सांगितले. उपोषणकर्त्यांनी पोलीस ठाण्यावर चाल करुन तुफान दगडफेक केल्यामुळे फलटण शहरचा ठाणेदार तसेच एक महिला पोलीस कर्मचारी या हल्ल्यात गंभीर जखमी झाल्यामुळे पोलिसांना नाईलाजाने लाठीमार करावा लागला. आगवणे प्रकरणात एका पोलीस अधिकार्यासह चार पोलीस कर्मचार्यांचे निलंबन करण्यात आले आहे. तसेच आगवणे यांनी मागणी केल्याप्रमाणे बोगस टेस्ट प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला असून तरीही या प्रकरणाची मी सखोल चौकशी करणार आहे, अशी माहिती पंकज देशमुख यांनी कराड येथे प्रसारमाध्यमांच्या प्रतिनिधींशी बोलताना दिली.
ट्रकच्या धडकेत दुचाकीस्वाराचा मृत्यू |
राजवाडा परिसरातून सव्वा लाखांच्या सोन्याच्या चैनची चोरी |
मारहाण प्रकरणी चौघांवर गुन्हा |
ट्रक चालकाला लुटल्याप्रकरणी तीन अज्ञातांवर गुन्हा |
महिलेचा विनयभंग केल्याप्रकरणी एकावर गुन्हा |
सराईत गुन्हेगाराने दिली तीन घरफोड्यांची कबुली |
उदयनराजे यांच्या समर्थनार्थ सातार्यात लोटला जनसागर |
शिक्षक हेच सुसंस्कृत समाजनिर्मितीचे जनक |
अजिंक्यतारा कारखान्यावर वादातून झाला गोळीबार |
जनता बँक साताराच्या तज्ज्ञ संचालकपदी सौरभ रायरीकर, राजेंद्र जाधव यांची निवड |
महिलेची गळफास घेवून आत्महत्या |
एकाच्या मृत्यूप्रकरणी कार चालकावर गुन्हा |
संशयित माल जवळ बाळगल्याप्रकरणी एकावर गुन्हा |
राहत्या घरातून युवती बेपत्ता |
वाई, जावळी परिसरात जोरदार अवकाळी पाऊस |
सराईत गुन्हेगाराने दिली तीन घरफोड्यांची कबुली |
उदयनराजे यांच्या समर्थनार्थ सातार्यात लोटला जनसागर |
शिक्षक हेच सुसंस्कृत समाजनिर्मितीचे जनक |
अजिंक्यतारा कारखान्यावर वादातून झाला गोळीबार |
जनता बँक साताराच्या तज्ज्ञ संचालकपदी सौरभ रायरीकर, राजेंद्र जाधव यांची निवड |
महिलेची गळफास घेवून आत्महत्या |
एकाच्या मृत्यूप्रकरणी कार चालकावर गुन्हा |
संशयित माल जवळ बाळगल्याप्रकरणी एकावर गुन्हा |
राहत्या घरातून युवती बेपत्ता |
वाई, जावळी परिसरात जोरदार अवकाळी पाऊस |
विरोधकांच्या रडीच्या डावाला जनता भुलणार नाही |
महायुतीचे आज सातार्यात जोरदार शक्ती प्रदर्शन |
सातारा जिल्ह्यात राम लल्लाच्या गजराने रामनवमी साजरी |
उदयनराजे यांच्या शक्तीप्रदर्शनासाठी आमदार शिवेंद्रसिंहराजे सज्ज |
सातारा जिल्ह्यात रामनवमी उत्साहात साजरी |