05:58pm | Jul 11, 2019 |
सातारा : तिवरे धरणफुटीच्या अनुषंगाने सातारा येथील संकल्प इंजिनिअरिंग सांस्कृतिक संस्थेचे चिन्मय कुलकर्णी यांनी राज्याच्या जलसंपदा विभागाच्या प्रधान सचिवांची भेट घेवून मुरुड गावच्या हद्दीत असणार्या तारळी नदीवरील धरणाच्या गळतीबाबत लक्ष घालण्याची मागणी करुन दोषी अधिकारी व ठेकेदारांवर गुन्हा दाखल करण्याची मागणी केली आहे.
गेल्या आठवड्यात रत्नागिरी जिल्ह्यातील तिवरे धरण फुटल्यामुळे सुमारे 23 जणांना आपले जीव गमवावे लागले होते. निकृष्ठ दर्जाच्या कामामुळेच हे धरण फुटले होते, हे निष्पन्न झाल्यानंतर धरणांचा जिल्हा म्हणून ओळखल्या जाणार्या सातारा जिल्ह्यातील धरणांचा प्रश्नही ऐरणीवर आला आहे. तारळी धरणालाही सुमारे दोन-तीन वर्षांपूर्वी गळती लागली होती. धरणाच्या महाकाय भिंतीलाच गळती लागल्याने धरणातील लाखो लिटर पाणी वाया जात आहे. मात्र त्या पलिकडेही धरणाच्या मुख्य भिंतीतूनच गळती लागल्याने ती धरणाची भिंत कधीही फुटू शकते. परंतू असे असतानाही धरणाचा ठेकेदार ए. प्रभाकर रेड्डी, रॉमन प्रोग्रेसिव्ह व मे. प्रसाद यांनी 2012-13 साली या धरणाचे बहुतांशी काम पूर्ण केले होते. पावसाळी हंगामामध्ये हे धरण पूर्ण क्षमतेने भरल्यानंतर 5.85 टीएमसी एवढा पाणीसाठा या धरणात होत असतो. असे असतानाही काही वर्षातच निकृष्ठ दर्जाच्या बांधकामामुळे या धरणाच्या मुख्य भिंतीलाच गळती लागली आहे. 1057 कोटी रुपये खर्चूनसुद्धा हे धरण सदोष पद्धतीने बांधण्यात आले आहे. या प्रकल्पामध्ये तत्कालीन जलसंपदा मंत्री, कृष्णा खोरे महामंडळाचे अधिकारी तसेच ठेकेदारांनी संगनमताने या प्रकल्पामध्ये भ्रष्टाचार केलेला आहे. तारळी धरणाच्या परिसरामध्ये अनेक छोट्या-मोठ्या गावातील हजारो लोक वास्तव्यास आहेत. तारळी धरणाला काही वर्षांपूर्वी पडलेल्या भगदाडाकडे अधिकारी व ठेकेदारांनी जाणीवपूर्वक दुर्लक्ष केल्यामुळे हजारो लोकांच्या जिविताचा प्रश्न निर्माण झालेला आहे. त्यामुळे या प्रकल्पाचे काम निकृष्ठ दजाचे करुन यामध्ये कोट्यवधी रुपयांचा भ्रष्टाचार तत्कालीन जलसंपदा मंत्री, कृष्णा खोरे महामंडळाचे अधिकारी तसेच ठेकेदारांनी केलेला आहे. त्यांनीच वाढून ठेवलेले पाप आता धरणाच्या भिंतीतून वाहू लागले आहे. त्यामुळे या संपूर्ण प्रकल्पाची तपासणी एसआयटी तसेच कॅग मार्फत करुन संबंधितांवर कठोर कारवाई करण्याची मागणी चिन्मय कुलकर्णी यांनी राज्याच्या जलसंपदा विभागाच्या प्रधान सचिवांना दिलेल्या निवेदनात केलेली आहे.
जलसंपदा विभागातील अधिकार्यांची नार्को टेस्ट करावी
गेल्या वीस वर्षांमध्ये कृष्णा खोरे महामंडळामध्ये मोठ्या प्रमाणावर कोट्यवधी रुपयांचा भ्रष्टाचार झालेला आहे. त्यामुळेच जिल्ह्यातील प्रकल्पांची कामे निकृष्ठ दर्जाची झालेली आहेत. तारळी हा या भ्रष्टाचाराचा एक नमुना आहे. सातारा जिल्ह्यातील अनेक प्रकल्पांची कामेही अशाच निकृष्ठ पद्धतीने झाली असल्याची शक्यता नाकारता येवू शकत नाही. तिवरे, जि. रत्नागिरी येथील धरणाचे कामही निकृष्ठ दर्जाचे झाल्याने हे धरण पावसाळ्यात फुटले आहे. त्यामुळे लोकांना हाकनाक आपले जीव गमवावे लागले आहेत. सातारा जिल्ह्यातील प्रकल्प त्या मानाने फार मोठे आहे. धरणाच्या खालच्या बाजूला मोठ्या लोकसंख्येची गावे आहेत. त्यामुळे एखादे धरण फुटल्यास त्यामधून हजारो लोकांची जिवितहानी होण्याची शक्यता नाकारता येवू शकत नाही. त्यामुळे जलसंपदा विभागातील अधिकार्यांवर गुन्हे दाखल करुन त्यांची नार्को टेस्ट करावी. जेणेकरुन दूध का दूध और पानी का पानी होणार आहे, असे चिन्मय कुलकर्णी यांनी ‘सातारा टुडे’शी बोलताना सांगितले.
विरोधकांच्या रडीच्या डावाला जनता भुलणार नाही |
महायुतीचे आज सातार्यात जोरदार शक्ती प्रदर्शन |
सातारा जिल्ह्यात राम लल्लाच्या गजराने रामनवमी साजरी |
उदयनराजे यांच्या शक्तीप्रदर्शनासाठी आमदार शिवेंद्रसिंहराजे सज्ज |
सातारा जिल्ह्यात रामनवमी उत्साहात साजरी |
उष्माघातावरील उपचारासाठी सर्व शासकीय रुग्णालयांमध्ये कक्ष स्थापन |
आदर्श आचारसंहितेच्या काटेकोरपणे अंमलबजावणीस सर्वोच्च प्राधान्य : जिल्हाधिकारी डुडी |
श्रीराम नवमी निमित्त राम ध्यान मंदिरात अर्पित कथक नृत्यलयाचा कार्यक्रम |
निवृत्तीवेतनधारक/कुटुंबनिवृत्तीवेतन धारकांना आवाहन |
विविध मोबाईल अॅपच्या माध्यमातून मतदारांना सोई- सुविधा |
45- सातारा लोकसभेसाठी 6 नामनिर्देशनपत्र दाखल |
जिल्हाधिकारी कार्यालयाबाहेरुन सव्वादोन तोळ्याच्या चैनची चोरी |
महिलेला मारहाण केल्याप्रकरणी एकावर गुन्हा |
बॉम्बे रेस्टॉरंट परिसरात आढळला बेवारस मृतदेह |
लोखंडी रॉडने मारहाण केल्याप्रकरणी तिघांवर गुन्हा |
उष्माघातावरील उपचारासाठी सर्व शासकीय रुग्णालयांमध्ये कक्ष स्थापन |
आदर्श आचारसंहितेच्या काटेकोरपणे अंमलबजावणीस सर्वोच्च प्राधान्य : जिल्हाधिकारी डुडी |
श्रीराम नवमी निमित्त राम ध्यान मंदिरात अर्पित कथक नृत्यलयाचा कार्यक्रम |
निवृत्तीवेतनधारक/कुटुंबनिवृत्तीवेतन धारकांना आवाहन |
विविध मोबाईल अॅपच्या माध्यमातून मतदारांना सोई- सुविधा |
45- सातारा लोकसभेसाठी 6 नामनिर्देशनपत्र दाखल |
जिल्हाधिकारी कार्यालयाबाहेरुन सव्वादोन तोळ्याच्या चैनची चोरी |
महिलेला मारहाण केल्याप्रकरणी एकावर गुन्हा |
बॉम्बे रेस्टॉरंट परिसरात आढळला बेवारस मृतदेह |
लोखंडी रॉडने मारहाण केल्याप्रकरणी तिघांवर गुन्हा |
भाजप कार्यालयात उदयनराजे यांचे स्वागत |
माझ्यावरील आरोप हा राजकीय षडयंत्राचा भाग |
देशात समान नागरी कायदा लागू करण्यासाठी भाजप वचनबद्ध |
जिल्ह्यात cVIGIL (सी व्हिजील) वर 27, तर वोटर हेल्पलाईनवर 74 तक्रारी प्राप्त |
दिव्यांग व्यक्तिंसाठी मतदान केद्रांवर आवश्यक सोयी : याशनी नागराजन |