RNI REG.NO. MAHMAR/2014/56135

What are you looking for?

Contact Us

Address:

Email:

Tel:

Sadar Bazar, Satara, Maharashtra 415001

contact@tmnnews.com

02162 237 474

What are you looking for?

×

नरेंद्र मोदी यांच्या शपथविधी सोहळ्यासाठी अभेद्य सुरक्षा व्यवस्था

30 May 2019 at 14:28

या सोहळ्यासाठी एकाच स्थानी येणार विविध देशांचे राष्ट्रपती, पंतप्रधान यांच्यासह अनेक महत्वाच्या व्यक्ती

नवी दिल्ली : नरेंद्र मोदी यांच्या पंतप्रधान म्हणून होणाऱ्या शपथविधीला आता अवघे काही तास उरले आहेत. नरेंद्र मोदी हे आज संध्याकाळी सात वाजता जगातील सर्वात मोठ्या लोकशाही देशाच्या पंतप्रधानपदी दुसऱ्यांदा विराजमान होतील. राष्ट्रपती भवनात होणाऱ्या या शपथविधी सोहळ्यासाठी सुरक्षेचा चोख बंदोबस्त करण्यात आला आहे.

प्रजासत्ताक दिनाच्या सोहळ्यासाठी असलेल्या सुरक्षाव्यवस्थेप्रमाणे व्यवस्था या सोहळ्यासाठी करण्यात आली आहे. आर्मी, वायुसेना आणि दिल्ली पोलिसांच्या 10 हजाराहून अधिक जवानांची फौज या सोहळ्यासाठी तैनात करण्यात आली आहे. या सोहळ्यासाठी विविध देशांचे राष्ट्रपती, पंतप्रधान यांच्यासह अनेक महत्वाच्या व्यक्ती एकाच स्थानी येणार आहेत. यामुळे सुरक्षेच्या प्रोटोकॉलप्रमाणे सगळी व्यवस्था करण्यात आली आहे.

यामध्ये परिसरातील इमारती आणि महत्वाच्या जागांवर वायुसेनेचे अँटी एअरक्राफ्ट गन आणि भारतीय सेनेच्या स्नायपरसोबत एनएसजीचे विशेष कमांडो आणि दिल्ली पोलिसांचे जवान तैनात केले आहेत. जवळ असणाऱ्या हिंडन, पालमसह एअरफोर्स स्टेशनांवर देखील अलर्ट जारी करण्यात आला आहे.

दिल्लीमध्ये वाहतूक नियंत्रणासाठी जवळपास एक हजाराहून अधिक पोलीस कर्मचारी तैनात केले आहेत. कामाचा दिवस असल्याने सामान्य लोकांना त्रास होऊ नये यासाठी तगडी व्यवस्था करण्यात आली आहे. शपथविधी समारोहासाठी येणाऱ्या पाहुण्यांच्या वाहनांच्या पार्किंगच्या जागांवर देखील चोख व्यवस्था करण्यात आली आहे.

बिमस्टेक आणि अन्य 8 देशांच्या प्रमुखांसह तब्बल 8 हजार पाहुण्यांच्या उपस्थितीत हा शपथविधी सोहळा पार पडणार आहे. त्यासाठी राष्ट्रपती भवनासमोर मोठा शामियाना उभारण्यात आला आहे.  या सोहळ्यानंतर राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्याकडून प्रमुख पाहुण्यांना खास मेजवानी देण्यात येणार आहे.

दरम्यान, मोदींच्या शपथविधी सोहळ्यासाठी शिवसेनापक्षप्रमुख उद्धव ठाकरे सहकुटुंब दिल्लीला रवाना झाले आहेत. याशिवाय काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी, सोनिया गांधी, माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांच्यासह विविध राजकीय पक्षांचे नेते उपस्थित राहणार आहेत.

माजी केंद्रीय अर्थमंत्री, ज्येष्ठ भाजप नेते अरुण जेटली यांचे निधन

माजी केंद्रीय अर्थमंत्री, भाजपचे ज्येष्ठ नेते, प्रसिद्ध वकील अरुण जेटली यांचे आज प्रदीर्घ आजारानं निधन झालं. ते ६६ वर्षांचे होते. दिल्लीतील एम्स रुग्णालयात त्यांनी अखेरचा श्वास घेतला. जेटली यांच्या निधनाने अत्यंत अभ्यासू आणि उत्कृष्ट संसदपटूला देश

yesterday

अखेर चिदंबरम अटकेत

आयएनएक्स मीडिया गैरव्यवहार प्रकरणात माजी केंद्रीय अर्थमंत्री आणि काँग्रेसचे ज्येष्ठ नेते पी. चिदंबरम यांना अखेर बुधवारी दिवसभराच्या नाट्यपूर्ण घडामोडींनंतर रात्री दहा वाजता सीबीआयने अटक केली. अटक टाळण्यासाठी चिदंबरम यांनी दिवसभर प्रयत्न केले.

22 August 2019 at 14:18