03:04pm | Apr 20, 2018 |
सातारा : वीजबिलाचा तपशील तसेच वीजपुरवठा बंद असण्याचा कालावधी व इतर माहिती वीजग्राहकांच्या मोबाईलवर 'एसएमएस'द्वारे पाठविण्याची सेवा महावितरणने सुरू केलेली आहे. महावितरणकडे आपल्या मोबाईल क्रमांकांची नोंदणी केलेले बारामती परिमंडलातील २२ लाखांहून अधिक वीजग्राहक या सेवेचा लाभ घेत आहेत.
बारामती परिमंडलात घरगुती, वाणिज्यिक, औद्योगिक, कृषिपंपधारक व इतर असे एकूण २४ लाख २६ हजार ३३५ वीजग्राहक आहेत. त्यापैकी २२ लाख ३९ हजार १९६ वीजग्राहकांनी ग्राहक क्रमांकासोबत स्वतःचे मोबाईल क्रमांक महावितरणकडे नोंदवले आहेत. त्यात बारामती मंडलांतर्गत बारामती, इंदापूर, दौंड, शिरूर, पुरंदर व भोर तालुक्यातील ५ लाख ४६ हजार १४० ग्राहकांपैकी ५ लाख ३ हजार ६७९, सातारा मंडलातील ८ लाख ८९ हजार १८० ग्राहकांपैकी ८ लाख ३८ हजार ८९० तर सोलापूर मंडलातील ९ लाख ९१ हजार १५ ग्राहकांपैकी ८ लाख ९६ हजार ६२७ ग्राहकांनी आपले मोबाईल क्रमांक नोंदवले आहेत.
मोबाईल क्रमांकाची नोंदणी केलेल्या वीजग्राहकांच्या मोबाईलवर वीजसेवेसंबंधित विविध माहिती 'एसएमएस'द्वारे पाठविण्यात येत आहे. ग्राहकांचे वीजबिल तयार होताच ग्राहकाने किती वीज वापरली, मीटर रीडिंग, एकूण वीजबिल, सध्याचे रीडिंग, बिल भरण्याची अंतिम तारीख, अशा प्रकारची माहिती वीजग्राहकांना देण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे. तसेच तांत्रिक बिघाड किंवा नियोजित देखभाल व दुरुस्तीमुळे वाहिनीवरील बंद असलेला वीजपुरवठा पूर्ववत होण्याचा कालावधी वीजग्राहकांना 'एसएमएस'द्वारे कळविण्यात येत आहे. महावितरणने कर्मचार्यांसाठी तयार केलेल्या 'कर्मचारी मित्र' या मोबाईल अॅपद्वारे वीजपुरवठा बंद असलेल्या वीजवाहिनीची नोंद घेऊन संबंधित वीजग्राहकांच्या मोबाईलवर वीजपुरवठा बंदबाबतचा कालावधी 'एसएमएस'द्वारे नियमित कळविण्यात येत आहे.
महावितरणकडून बारामती परिमंडलातील १०० टक्के वीजग्राहकांच्या मोबाईल क्रमांकाची नोंदणी करण्याची मोहीम सद्यस्थितीत सुरू आहे. याशिवाय वीजग्राहकांनाही स्वतःहून मोबाईल क्रमांकाची नोंदणी करता येणार आहे. यात वीजग्राहकांनी नोंदणी करावयाच्या मोबाईल क्रमांकावरून ९२२५५९२२५५ क्रमांकावर MREG (बारा अंकी ग्राहक क्रमांक) अशी माहिती टाईप करून एसएमएस केल्यास मोबाईल क्रमांकाची नोंदणी होणार आहे. MREG व ग्राहक क्रमांक यात स्पेस देणे आवश्यक आहे. याशिवाय २४ तास सुरू असणार्या कॉल सेंटरचे १९१२ किंवा १८००-१०२-३४३५ आणि १८००-२३३-३४३५ हे तीन टोल फ्री क्रमांक उपलब्ध असून कोणत्याही कंपनीच्या मोबाईल किंवा दूरध्वनीद्वारे या दोन्ही क्रमांकावर संपर्क साधता येतो. तसेच महावितरणच्या www.mahadiscom.in या संकेतस्थळावरून किंवा महावितरण मोबाईल अॅपवर मोबाईल क्रमांकाची नोंदणी करण्याची सोय उपलब्ध आहे. उर्वरित वीजग्राहकांनी ग्राहक क्रमांकासोबत मोबाईल क्रमांकाची नोंदणी करून सहकार्य करण्याचे आवाहन महावितरणने केले आहे.
मराठीतही मिळणार एसएमएस
दरम्यान, ग्रामीण भागातील वीजग्राहकांच्या भाषेची अडचण लक्षात घेऊन पूर्वी केवळ इंग्रजीतूनच मिळणारे हे एसएमएस मराठी भाषेतही उपलब्ध करून देण्यात येत आहेत. यासाठी ग्राहकांनी मोबाईल क्रमांक महावितरणकडे नोंदवला असेल तर त्यावरून मराठी भाषेसाठी MLANG टाईप करून स्पेस देऊन आपला बारा आकडी ग्राहक क्रमांक टाकावा. त्यानंतर स्पेस देऊन १ क्रमांक टाकून ९२२५५९२२५५ या क्रमांकावर पाठवावा, असे आवाहन महावितरणने केले आहे.
राजवाडा परिसरातून सव्वा लाखांच्या सोन्याच्या चैनची चोरी |
मारहाण प्रकरणी चौघांवर गुन्हा |
ट्रक चालकाला लुटल्याप्रकरणी तीन अज्ञातांवर गुन्हा |
महिलेचा विनयभंग केल्याप्रकरणी एकावर गुन्हा |
सराईत गुन्हेगाराने दिली तीन घरफोड्यांची कबुली |
उदयनराजे यांच्या समर्थनार्थ सातार्यात लोटला जनसागर |
शिक्षक हेच सुसंस्कृत समाजनिर्मितीचे जनक |
अजिंक्यतारा कारखान्यावर वादातून झाला गोळीबार |
जनता बँक साताराच्या तज्ज्ञ संचालकपदी सौरभ रायरीकर, राजेंद्र जाधव यांची निवड |
महिलेची गळफास घेवून आत्महत्या |
एकाच्या मृत्यूप्रकरणी कार चालकावर गुन्हा |
संशयित माल जवळ बाळगल्याप्रकरणी एकावर गुन्हा |
राहत्या घरातून युवती बेपत्ता |
वाई, जावळी परिसरात जोरदार अवकाळी पाऊस |
विरोधकांच्या रडीच्या डावाला जनता भुलणार नाही |
उदयनराजे यांच्या समर्थनार्थ सातार्यात लोटला जनसागर |
शिक्षक हेच सुसंस्कृत समाजनिर्मितीचे जनक |
अजिंक्यतारा कारखान्यावर वादातून झाला गोळीबार |
जनता बँक साताराच्या तज्ज्ञ संचालकपदी सौरभ रायरीकर, राजेंद्र जाधव यांची निवड |
महिलेची गळफास घेवून आत्महत्या |
एकाच्या मृत्यूप्रकरणी कार चालकावर गुन्हा |
संशयित माल जवळ बाळगल्याप्रकरणी एकावर गुन्हा |
राहत्या घरातून युवती बेपत्ता |
वाई, जावळी परिसरात जोरदार अवकाळी पाऊस |
विरोधकांच्या रडीच्या डावाला जनता भुलणार नाही |
महायुतीचे आज सातार्यात जोरदार शक्ती प्रदर्शन |
सातारा जिल्ह्यात राम लल्लाच्या गजराने रामनवमी साजरी |
उदयनराजे यांच्या शक्तीप्रदर्शनासाठी आमदार शिवेंद्रसिंहराजे सज्ज |
सातारा जिल्ह्यात रामनवमी उत्साहात साजरी |
उष्माघातावरील उपचारासाठी सर्व शासकीय रुग्णालयांमध्ये कक्ष स्थापन |