03:11am | Sep 22, 2019 |
सातारा : राष्ट्रवादीचा मजबूत बालेकिल्ला ध्वस्त करणार्या सातारच्या राजांविरोधात राष्ट्रवादी सुप्रिमो शरद पवार यांनी एल्गार पुकारलेला आहे. भाजपने सातारा-जावली मतदारसंघाचे शिवेंद्रराजे भोसले व माजी खासदार उदयनराजे भोसले यांना गळाला लावल्यानंतर राष्ट्रवादीने सातारा जिल्ह्यातील आपला गड शाबूत ठेवण्यासाठी फिल्डिंग लावलेली आहे. आज राष्ट्रवादी सुप्रिमो शरद पवारांची तोफ सातार्यात धडाडणार असून पवार काय बोलणार, याकडे संपूर्ण सातारा जिल्ह्याचे लक्ष लागले आहे.
राष्ट्रवादीचे माजी खासदार उदयनराजे भोसले यांनी गेल्या आठवड्यात केंद्रीय गृहमंत्री तथा भाजपा सुप्रिमो अमित शहा यांच्या उपस्थितीत भाजपात प्रवेश केला. जाणार-जाणार अशी अटकळ बांधलेल्या उदयनराजेंनीही विधानसभा निवडणुकांच्या तोंडावर राष्ट्रवादीला सोडचिठ्ठी देवून भाजपात प्रवेश केल्यामुळे राष्ट्रवादीच्या तंबूत खळबळ माजली आहे. राष्ट्रवादीला लागलेल्या गळतीमुळे शरद पवारांनीही डॅमेज कंट्रोल करण्यासाठी राज्यभर भिरकिट लावली आहे. पंतप्रधान मोदींसह गृहमंत्री अमित शहा, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या कार्यशैलीवर त्यांनी टीकेची झोड उठवली आहे. असे असताना उदयनराजे व शिवेंद्रराजेंच्या भाजप प्रवेशानंतर खा. शरद पवार आज कार्यकर्ता संवाद मेळाव्याच्या अनुषंगाने सातार्यात येत आहेत. आज शरद पवार सातार्यात काय बोलणार, याकडे सातारा जिल्ह्यासह संपूर्ण राज्याचे लक्ष लागले आहे.
भाजपने राष्ट्रवादीच्या बिनीच्या शिलेदारांना आपल्याकडे खेचल्यानंतर नुकतेच पश्चिम महाराष्ट्र विकास महामंडळाच्या अध्यक्षपदी वर्णी लागलेले जि. प. सदस्य दीपक पवारांना राष्ट्रवादीने गळाला लावले आहे. कालच दीपक पवारांनी आपल्या सर्व पदांचा राजीनामा दिला आहे. आज ते शरद पवारांच्या प्रमुख उपस्थितीत राष्ट्रवादीमध्ये जाहीर प्रवेश करणार आहेत. तत्पूर्वी शिवाजी सर्कल पोवई नाका येथून दुपारी 1 वाजता बाईक रॅलीने राष्ट्रवादीच्या कार्यक्रमाला सुरुवात होईल. त्यानंतर येथील जिल्हा परिषदेच्या यशवंतराव चव्हाण सभागृहात राष्ट्रवादीच्या संवाद मेळाव्याला सुरुवात होणार आहे. दीपक पवारांबरोबर भाजप-शिवसेनेतील काही नेतेमंडळी राष्ट्रवादीत प्रवेश करणार असल्याची चर्चा आहे. मात्र, उदयनराजे आणि शिवेंद्रराजेंविना हा मेळावा कसा पार पडेल, याकडेही जिल्हावासियांच्या नजरा लागल्या आहेत.
फलटणचे राजे उद्याच्या मेळाव्यात दिसणार काय?
उदयनराजे व शिवेंद्रराजे भाजपात गेल्यानंतर फलटणचे राजेही राष्ट्रवादी सोडणार, अशा चर्चा झडत होत्या. मात्र, कार्यकर्त्यांचा मेळावा घेवूनही विधान परिषदेचे सभापती मिस्टर रामराजे नाईक-निंबाळकर यांनी आपली पक्षांतराबाबतची आपली भूमिका गुलदस्त्यातच ठेवली आहे. तसेच त्यांचे दोन्ही बंधू राष्ट्रवादीच्या कोणत्याही कार्यक्रमाला फिरकत नसल्यामुळे आजच्या मेळाव्याला हे त्रिकूट दिसणार काय, याबाबत सस्पेन्स निर्माण झाला आहे.
एकास मारहाण केल्याप्रकरणी पाच जणांवर गुन्हा |
सातार्यातून युवक बेपत्ता |
नागठाण्यात युवकाची आत्महत्या |
उदयनराजे यांना मतदान करून गादीचा सन्मान ठेवा |
जपानचे स्लिम लँडर तिसऱ्यांदा जागृत |
कोल्हापुरातील अंबाबाईच्या रथोत्सव |
छत्रपतींच्या वंशजांना जावळीचा स्वाभिमान सांगू नका |
माझ्याकडे विरोधकांच्या अनेक भानगडी |
महाभकास आघाडीला निवडणुकीत जागा दाखवा |
साताऱ्यात मेघगर्जनेसह बरसल्या पावसाच्या सरी |
जनता बँकेत पुर्नगठीत बोर्ड ऑफ मॅनेजमेंटच्या चेअरमनपदी विनोद कुलकर्णी |
बोंडारवाडीसह धरणांची कामे मार्गी लावणार उदयनराजेंचे आश्वासन |
दलित महासंघ,पॅंथरचा उदयनराजेंना जाहीर पाठींबा |
सातारकरांना बाहेरच्यांनी स्वाभिमान शिकवू नये |
साताऱ्यात कोट्यावधीची कामे हीच आपली जमेची बाजू |
कोल्हापुरातील अंबाबाईच्या रथोत्सव |
छत्रपतींच्या वंशजांना जावळीचा स्वाभिमान सांगू नका |
माझ्याकडे विरोधकांच्या अनेक भानगडी |
महाभकास आघाडीला निवडणुकीत जागा दाखवा |
साताऱ्यात मेघगर्जनेसह बरसल्या पावसाच्या सरी |
जनता बँकेत पुर्नगठीत बोर्ड ऑफ मॅनेजमेंटच्या चेअरमनपदी विनोद कुलकर्णी |
बोंडारवाडीसह धरणांची कामे मार्गी लावणार उदयनराजेंचे आश्वासन |
दलित महासंघ,पॅंथरचा उदयनराजेंना जाहीर पाठींबा |
सातारकरांना बाहेरच्यांनी स्वाभिमान शिकवू नये |
साताऱ्यात कोट्यावधीची कामे हीच आपली जमेची बाजू |
जुगार प्रकरणी एकावर कारवाई |
नोकरीच्या अमिषाने सुमारे पावणे सहा लाखांची फसवणूक |
शहरातील दोन वेगवेगळ्या घटनांमध्ये दोनजण बेपत्ता |
विवाहितेला आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी पती विरुध्द गुन्हा |
शाहूनगर येथे घरफोडी |