बंगळुरू : बंगळुरूत नागरिकत्व सुधारणा कायद्याविरोधात (CAA) आयोजित करण्यात आलेल्या सभेत मंचावर जाऊन 'पाकिस्तान झिंदाबाद' घोषणा देणाऱ्या अमूल्या लियोना विशेष चर्चेत आहे. सोशल मीडियावर या घटनेचे पडसाद उमटलेले पाहायला मिळत आहेत. अनेकांनी 'पाकिस्तान झिंदाबाद' म्हणणाऱ्या अमूल्या हिला पाकिस्तानात जाण्याचा सल्ला दिलाय. तर काहींनी गुरुवारी तिच्या घराची तोडफोडही केली. याच दरम्यान हिचे काही जुने व्हिडिओ सोशल मीडियावरून समोर येत आहेत.
यापैंकीच एका व्हिडिओत अमूल्या काही धक्कादायक खुलासे करताना दिसत आहेत. असे कृत्य करणारी मी एकटी नाही असं म्हणतानाच, ती जे म्हणतेय किंवा करतेय त्यापाठी एक मोठी टीम काम करतेय, फक्त चेहरा आपला आहे, असंही या व्हिडिओत अमूल्या म्हणतानना दिसत आहे. उल्लेखनीय म्हणजे, 'पाकिस्तान झिंदाबाद' घोषणा देण्यापूर्वीचा अमूल्याचा हा व्हिडिओ आहे.
'मी आज जे काही करत आहे, ते मी करत नाही. मीडियामुळे मी केवळ याचा चेहरा बनलेय. पण माझ्या मागे अनेक ऍडव्हायजरी समित्या काम करतात आणि त्याच सल्ले देतात की आज भाषणात ही गोष्ट बोलायचीय किंवा हे अमूक अमूक मुद्दे मांडायचेत. यासाठी कॉन्टेन्ट टीम काम करते. खूप सारे सीनियर कार्यकर्ते काम करते. माझे आई-वडील सांगतात की असं बोलायचंय, असं करायचंय, इकडे जायचंय... बंगळुरू स्टुडंट अलायन्स हा खूप मोठा स्टुडंट ग्रुप या साऱ्या आंदोलनामागे काम करतोय. मी केवळ याचा चेहरा बनलेय. परंतु, बंगळुरू स्टुडंट अलायन्स यासाठी खूप मेहनत घेत आहे' असं म्हणताना अमूल्या या व्हिडिओत दिसत आहे.
दुसरीकडे, अमूल्या हिचा हा नवा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर ऑल इंडिया मजलिस ए इत्तेहादूल मुसलमीन (AIMIM) पक्षाचे अध्यक्ष असदुद्दीन ओवेसी यांच्यावरही निशाणा साधला जातोय.
या घटनेनंतर अमुल्याच्या वडिलांनी या वक्तव्याला आक्षेपार्ह म्हटले आहे आणि तिच्यावर टीकास्त्र सोडले होते. माझ्या मुलीचे वक्तव्य मी सहन करणार नाही असेही त्यांनी म्हटले आहे. माझ्या मुलीने जे काही सांगितले किंवा केले आहे ते पूर्णपणे चुकीचे आहे, ते सहन केले जाणार नाही. पण आता हा व्हिडिओ समोर आल्यानंतर त्यांची बोलती बंद झाली आहे.
एएमआयएमचे खासदार असदुद्दीन ओवैसी यांच्या उपस्थितीत बंगळूरमध्ये सीएएविरूद्ध रॅली आयोजित करण्यात आली होती. या रॅलीत व्यासपीठावर असणार्या १९ वर्षीय अमूल्या लियोनने पाकिस्तान जिंदाबादचा जयघोष केला. त्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आणि तिला कडक टीकेला सामोरे जावे लागले. तिच्यावर देशद्रोहाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तिला १४ दिवसांच्या न्यायालयीन कोठडीत पाठविण्यात आले आहे.
अमुल्या विद्यार्थीनी कार्यकर्ती आहे. ती बंगळूरच्या एनएमकेआरव्ही कॉलेजमधून पत्रकारितेचा अभ्यास करत आहे. तिने या ठिकाणी पदवसीसाठी प्रवेश घेतला आहे. त्याआधी तिने सेंट नॉर्बर्ट सीबीएसई स्कूल, क्राइस्ट स्कूल मणिपाल आणि सेंट जोसेफ स्कूल कोप्पा येथूनही शिक्षण घेतले आहे. सोशल मीडियावर खूप अॅक्टिव असणारी अमूल्या मूळची चिक्कमंगळूरची आहे.
दरम्यान, बंगळुरूमध्ये मंचावर 'पाकिस्तान झिंदाबाद' घोषणा देणाऱ्या अमूल्या हिला १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आलीय.
पंतप्रधान मोदी यांची सभा म्हणजे उदयनराजे यांच्या विजयाची नांदी |
वाट कशाची पाहता? कामाला लागा |
साताऱ्यात आरटीई प्रवेशासाठी पालकांचा कमी प्रतिसाद |
अफवांवर नाही, हवामान खात्यावर विश्वास ठेवा : हवामान खात्याचे प्रमुख सुनील कांबळे |
घोटाळेबाजांशी कायम लढत राहणार उदयनराजे गरजले |
साताऱ्यातील सुप्रसिद्ध डॉ. रविंद्र हर्षे यांचे दुःखद निधन |
भाजप देशाचे भविष्य तर काँग्रेस भूतकाळ उदयनराजे भोसले यांचा टोला |
कृष्णाबाई यात्रा महोत्सवाचा पालखी मिरवणुकीने शुभारंभ |
गंभीर गुन्हे करणार्या चौघांच्या टोळीला तडीपारीचा दणका |
बेकायदा दारु विक्रीप्रकरणी एकावर कारवाई |
आदेशाचे उल्लंघन केल्याप्रकरणी पाचजणांवर गुन्हा |
अपघातात जखमी केल्याप्रकरणी दुचाकी चालकावर गुन्हा |
वेगवेगळ्या घटनांमध्ये दोनजणी बेपत्ता |
सातारा शहरातील लल्लन टोळीवर मोक्का कारवाई |
कृष्णा खोरे महामंडळामुळे दुष्काळी भागात पाणी : उदयनराजे भोसले |
साताऱ्यातील सुप्रसिद्ध डॉ. रविंद्र हर्षे यांचे दुःखद निधन |
भाजप देशाचे भविष्य तर काँग्रेस भूतकाळ उदयनराजे भोसले यांचा टोला |
कृष्णाबाई यात्रा महोत्सवाचा पालखी मिरवणुकीने शुभारंभ |
गंभीर गुन्हे करणार्या चौघांच्या टोळीला तडीपारीचा दणका |
बेकायदा दारु विक्रीप्रकरणी एकावर कारवाई |
आदेशाचे उल्लंघन केल्याप्रकरणी पाचजणांवर गुन्हा |
अपघातात जखमी केल्याप्रकरणी दुचाकी चालकावर गुन्हा |
वेगवेगळ्या घटनांमध्ये दोनजणी बेपत्ता |
सातारा शहरातील लल्लन टोळीवर मोक्का कारवाई |
कृष्णा खोरे महामंडळामुळे दुष्काळी भागात पाणी : उदयनराजे भोसले |
लोकसभा निवडणुकीच्या मतदानाची वेळ वाढवून मिळावी |
सूर्योदयाच्या मुहूर्तावर हनुमान जन्मोत्सव साजरा |
सणबूरच्या यात्रेत कुस्तीच्या फडात आग्या मोहोळाचा हल्ला |
उदयनराजेंच्या पत्नी दमयंतीराजेंचा काँग्रेसवर गंभीर आरोप |
वाई, जावळी तालुक्यात अवकाळी पाऊस |