सातारा : राष्ट्रवादीच्या निर्मितीपासून सातारा जिल्ह्याने ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्या शब्दाला मान देवून साथ दिली. गेली 19 वर्षे राष्ट्रवादीचा जिल्ह्यात दबदबा दिसून आला असला तरी सध्या अंतर्गत गटबाजीच्या राजकारणामुळे रविवारी 10 जून रोजी होणार्या सरकारविरोधातील हल्लाबोल सांगता सभेला कार्यकर्त्यांचा उत्साह मावळला आहे. या पुण्यातील सांगता सभेला नेमके किती कार्यकर्ते सातार्यातून जातील, याबाबत साशंकता निर्माण झाली आहे.
सातार्यात राष्ट्रवादीने कराड अपवाद वगळता जिल्ह्यात झंझावात निर्माण केला होता. पण सध्या माण-खटाव, वाई, कराड उत्तर-दक्षिण, सातारा-जावली या मतदारसंघात भाजपने चांगलीच रणनिती आखली आहे. त्याचबरोबर शिवसेना, कॉंग्रेस, रासप, आरपीआय, भारिप बहुजन महासंघ, बसपा या पक्षांनीही निवडणूक लढविण्याची तयारी सुरु केली आहे. आधी लोकसभा, त्यानंतर विधानसभा निवडणुका होणार आहेत. राष्ट्रवादी पक्षाचा बालेकिल्ला असूनही राष्ट्रवादीने अद्यापही अधिकृत उमेदवारीची घोषणा न केल्यामुळे नेमका प्रचार कोणाचा करायचा? या संभ्रमामध्ये राष्ट्रवादीचे कार्यकर्ते पडले आहेत. विद्यमान खासदार श्री. छ. उदयनराजे भोसले, विधानपरिषदेचे सभापती रामराजे नाईक-निंबाळकर, सिक्कीमचे राज्यपाल श्रीनिवास पाटील यांची नावे राष्ट्रवादीतून पुढे येत असली तरी पाटील वगळता गटबाजी उफाळून येईल, अशी सध्याची स्थिती आहे. संपूर्ण महाराष्ट्रात केंद्र व राज्य सरकारच्या विरोधात राष्ट्रवादीने हल्लाबोल यात्रा करुन सरकारविरोधात वातावरण निर्मिती केली आहे. यामध्ये सातारा जिल्ह्यातील आमदारांचा सिंहाचा वाटा आहे. पण पुणे येथे होणार्या राष्ट्रवादीच्या हल्लाबोल सांगता सभेला सातारा जिल्ह्यातून म्हणावा असा उठाव होवू शकलेला नाही. राष्ट्रवादीचे नेते शशिकांत शिंदे, आ. शिवेंद्रसिंहराजे भोसले, आ. मकरंद पाटील, आ. बाळासाहेब पाटील यांच्या मतदारसंघात दुसर्या फळीचे कार्यकर्ते हल्लाबोलपासून चार कोस दूर आहेत. तर नेते पायात भिंगरी बांधून सरकारविरोधात तोफ डागत आहेत. पुण्यात होणार्या या हल्लाबोल सांगता सभेला जास्तीत जास्त कार्यकर्ते सामील व्हावेत, यासाठी सर्वांना जबाबदारी देण्यात आली आहे. पण अनेकजण जबाबदारी टाळत आहेत. ज्यांना पक्षाच्या माध्यमातून सत्ता व पदे मिळाली, असे नेते या सभेला उपस्थित राहतील. पण सभेसाठी कार्यकर्ते घेवून येणार नाहीत. कारण सांगता सभेसाठी आयोजकांनी तयारीच केलेली नाही, असा सूर उमटत आहे.
राष्ट्रवादीच्या सातार्यातील बालेकिल्ल्याला घरघर लागल्याचेही चिन्ह असून भविष्यात राष्ट्रवादीला उभारी घेण्यासाठी खूप मोठे परिवर्तन करावे लागणार आहे. सध्या गटबाजीमुळे पोखरलेल्या राष्ट्रवादीचा बोलबाला असला तरी वास्तविक कार्यकर्त्यांमध्ये एकसंघता राहिलेली नाही. विशिष्ट नेता, विशिष्ट कार्यकर्ता अशी ओळख होत असल्यामुळे सातार्यात राष्ट्रवादीऐवजी गटवादी पक्ष अशी हेटाळणी विरोधक करु लागले आहेत. याकडे आता पक्षश्रेष्ठींनीच लक्ष घालावे, अशी मागणी युवा कार्यकर्ते करु लागले आहेत.
सराईत गुन्हेगाराने दिली तीन घरफोड्यांची कबुली |
उदयनराजे यांच्या समर्थनार्थ सातार्यात लोटला जनसागर |
शिक्षक हेच सुसंस्कृत समाजनिर्मितीचे जनक |
अजिंक्यतारा कारखान्यावर वादातून झाला गोळीबार |
जनता बँक साताराच्या तज्ज्ञ संचालकपदी सौरभ रायरीकर, राजेंद्र जाधव यांची निवड |
महिलेची गळफास घेवून आत्महत्या |
एकाच्या मृत्यूप्रकरणी कार चालकावर गुन्हा |
संशयित माल जवळ बाळगल्याप्रकरणी एकावर गुन्हा |
राहत्या घरातून युवती बेपत्ता |
वाई, जावळी परिसरात जोरदार अवकाळी पाऊस |
विरोधकांच्या रडीच्या डावाला जनता भुलणार नाही |
महायुतीचे आज सातार्यात जोरदार शक्ती प्रदर्शन |
सातारा जिल्ह्यात राम लल्लाच्या गजराने रामनवमी साजरी |
उदयनराजे यांच्या शक्तीप्रदर्शनासाठी आमदार शिवेंद्रसिंहराजे सज्ज |
सातारा जिल्ह्यात रामनवमी उत्साहात साजरी |
महिलेची गळफास घेवून आत्महत्या |
एकाच्या मृत्यूप्रकरणी कार चालकावर गुन्हा |
संशयित माल जवळ बाळगल्याप्रकरणी एकावर गुन्हा |
राहत्या घरातून युवती बेपत्ता |
वाई, जावळी परिसरात जोरदार अवकाळी पाऊस |
विरोधकांच्या रडीच्या डावाला जनता भुलणार नाही |
महायुतीचे आज सातार्यात जोरदार शक्ती प्रदर्शन |
सातारा जिल्ह्यात राम लल्लाच्या गजराने रामनवमी साजरी |
उदयनराजे यांच्या शक्तीप्रदर्शनासाठी आमदार शिवेंद्रसिंहराजे सज्ज |
सातारा जिल्ह्यात रामनवमी उत्साहात साजरी |
उष्माघातावरील उपचारासाठी सर्व शासकीय रुग्णालयांमध्ये कक्ष स्थापन |
आदर्श आचारसंहितेच्या काटेकोरपणे अंमलबजावणीस सर्वोच्च प्राधान्य : जिल्हाधिकारी डुडी |
श्रीराम नवमी निमित्त राम ध्यान मंदिरात अर्पित कथक नृत्यलयाचा कार्यक्रम |
निवृत्तीवेतनधारक/कुटुंबनिवृत्तीवेतन धारकांना आवाहन |
विविध मोबाईल अॅपच्या माध्यमातून मतदारांना सोई- सुविधा |