11:42pm | Mar 07, 2018 |
सातारा : बीबी ता.फलटण येथे पत्त्याच्या पानावर जुगार खेळणार्या 5 जणांना स्थानिक गुन्हे अन्वेषन विभागाच्या पथकाने अटक केली असून संशयितांकडून 1 लाख 82 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. दरम्यान, अटक केलेल्या संशयितांमध्ये तंटामुक्तीचा माजी अध्यक्षाचाही समावेश असून कारवाईने परिसरात खळबळ उडाली आहे.
बळवंत लक्ष्मण नलवडे (वय 63, रा.बीबी), आबा बबन तरडे (वय 48, रा.मलवडी), प्रकाश बबन बोबडे (वय 45, रा.बीबी), संजय लक्ष्मण टकले (वय 38, रा.मलवडी), गणेश विठ्ठल नाकयवडी (वय 40, रा.आळजापूर सर्व ता.फलटण) अशी अटक केलेल्यांची नावे असून यातील बळवंत नलवडे हा माजी तंटामुक्ती अध्यक्ष आहे.
याबाबत अधिक माहिती अशी, बीबी गावच्या हद्दीत जुगार खेळत असल्याची माहिती एलसीबीला मिळाली होती. पोलिसांनी पथक करुन त्यानुसार छापा टाकला असता संशयित मोकळ्या रानात बाभळीच्या झाडाखाली जुगार खेळत असल्याचे निदर्शनास आले. पोलिसांनी घटनास्थळाचा पंचनामा केल्यानंतर परिसरातून दुचाकी, रोख रक्कम, जुगाराचे साहित्य असा एकूळ 1 लाख 82 हजार रुपयांचा मुद्देमाल सापडला असून तो जप्त करण्यात आला.
दरम्यान, बीबी गावच्या हद्दीत पोलिसांनी छापा टाकल्यानंतर परिसरात खळबळ उडाली. यावेळी बघ्यांचीही मोठी गर्दी झाली होती. पोलिसांनी सर्व संशयित व मुद्देमाल ताब्यात घेवून लोणंद पोलिसांकडे वर्ग केले आहे. पोनि पद्माकर घनवट यांच्या मार्गदर्शनाखाली फौजदार सागर गवसणे, शशिकांत मुसळे, पोलिस हवालदार नागे, मोहन नाचण, रविंद्र वाघमारे, योगेश पोळ, नितीन भोसले, राजकुमार ननावरे, गणेश कचरे यांनी कारवाईमध्ये सहभाग घेतला.
सातारा पोलीस मुख्यालयात उपनिरीक्षकाला धमकी |
बिग बॉस फेम अभिजीत बिचुकले यांचा अर्ज दाखल |
महाविकास आघाडीच्या उमेदवाराचा पूर्ण ताकतीने प्रचार करणार |
माढयात अभय जगताप यांचे बंड शमले |
सातारा लोकसभा प्रबंधन समितीचे कार्य उत्कृष्ठ |
उदयनराजे भोसले यांची संपत्ती 251 कोटीची |
वादळी वाऱ्यात स्पीड बोट उलटून एकाचा मृत्यू |
निवडणूक स्थिर सर्वेक्षण पथकातील कर्मचाऱ्याला पोलिसाकडून मारहाण |
येणके येथील कुंभार वस्तीतील जल जीवन मिशनअंतर्गतचे काम प्रगतीपथावर |
निवडणुक निरिक्षक आर. अर्जुन व पोलिस निवडणुक निरिक्षक प्रदीप शर्मा यांचे जिल्ह्यात आगमन |
उदयनराजेंना विक्रमी मताधिक्याने निवडून आणण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करणार |
श्री क्षेत्र निनाम येथील सासनकाठीला यात्रेत महत्वाचे स्थान |
मंदार कोल्हटकर, धिरज पाटील यांचे अपघाती निधन |
ट्रकच्या धडकेत दुचाकीस्वाराचा मृत्यू |
राजवाडा परिसरातून सव्वा लाखांच्या सोन्याच्या चैनची चोरी |

मारहाण प्रकरणी चौघांवर गुन्हा |
ट्रक चालकाला लुटल्याप्रकरणी तीन अज्ञातांवर गुन्हा |
महिलेचा विनयभंग केल्याप्रकरणी एकावर गुन्हा |
सराईत गुन्हेगाराने दिली तीन घरफोड्यांची कबुली |
उदयनराजे यांच्या समर्थनार्थ सातार्यात लोटला जनसागर |