12:41am | Oct 20, 2018 |
कराड : स्व. यशवंतराव चव्हाण जन्मशताब्दी महोत्सवाच्या निमित्ताने देण्यात आलेल्या निधीतून कराड शहराला स्वागत कमान बनवण्यात आली आहे. या कमानीचे उद्घाटन कार्यक्रमाची मला कोणतीही पूर्व कल्पाना देण्यात आली नाही. तसेच या कमानीवर बसवण्यात आलेल्या कोनशीलेवर तसेच कार्यक्रम पत्रिकेत शासकीय प्रोटोकॉलनुसार तालुक्यातील सर्व विधीमंडळ सदस्यांची नावे नव्हती. ही नावे टाकण्याची जबाबदारी संबंधित अधिकारी यांची होती. मात्र त्यांनी ती पाळलेली नाही. तसेच या कोनशीला प्रकरणी हे सरकार कु बुध्दीचे निघाल्याचा आरोप माजी मुख्यमंत्री आ. पृथ्वीराज चव्हाण यांनी केला.
दरम्यान, अधिकाऱ्यांनी राजकारणात किती पडावे याला मर्यादा आहेत. अशा पध्दतीने कोणी राजकारणात पडत असेल तर ते शासकीय नियमावलीला धरून नाही, हे त्यांनी लक्षात घ्यावे असा सुचक इशारा पत्रकारांशी बोलताना दिला.
आ. पृथ्वीराज चव्हाण म्हणाले, स्व. यशवंतराव चव्हाण जन्मशताब्दी महोत्सवाच्या निमित्ताने आपण शंभर कोटींचा निधी काँग्रेस आघाडीच्या सरकारने मंजूर केला होता. त्यापैकी एक काम म्हणजे कराड शहराला स्वागत कमान. हे काम बरेच दिवस रखडले होते. ते काम पूर्ण झाल्यानंतर कमानीच्या उद्घाटनाचा निर्णय नगरपालिकेने घेतला. मात्र ,या कार्यक्रमाची कोणतही पूर्व सुचना अथवा कल्पना मला देण्यात आली नाही. प्रोटोकॉलनुसार सर्व कराड तालुक्यातील विधीमंडळ सदस्यांची नावे पत्रिकेत पाहिजे होती. तशी ती कोनशिलेवरही अपेक्षित होती. मात्र असे काहीही घडले नाही. शासकीय कामात कोणाकोणाला निमंत्रित करावे हा प्रशासकीय प्रोटोकॉल आहे. त्या प्रोटोकॉलची अंमलबजावणी करण्याची जबाबदारी प्रशासकीय अधिकाऱ्यांची आहे. कार्यक्रमानंतर प्रोटोकॉलबाबतची गंभीर चूक लक्षात आल्याने स्वागत कमानी वरील कोनशिला बदलण्यात आली आहे. स्व. यशवंतराव चव्हाण हे काय एका व्यक्तीचे नव्हते किंवा सत्ताधारी पक्षाचे नव्हते. त्यामुळे या कार्यक्रमात सर्वांना सामावून घेतले असतेतर आम्हलाही आनंदच झाला असता. मात्र, ऐवढ्या कु बुध्दीचे हे सरकार आहे, हे दुर्देवच म्हणावे लागेल.
ते म्हणाले, प्रसिध्दी माध्यमांवरही कोनशिला प्रकरणावरून पालिका मुख्याधिकारी यांनी आरोप केले. मात्र माध्यमांनी माध्यमांचे काम केले. घडलेली घटना सत्य असेलतर तिला प्रसिध्दी देणे हे त्यांचे कामच आहे. मात्र, पालिकेच्या जाहीर सभेत माध्यमांना खोटे पाडणे, फेक न्युज देतात, असा आरोप करणे गंभीर बाब आहे. शासकीय अधिकाऱ्यांनी राजकारणात किती पडावे याला मर्यादा आहेत आणि ते अशा पध्दतीने कोणी राजकारण करत असतील तर ते शासकीय नियमावलीला अनुसरून नाही. त्यामुळे अधिकाऱ्यांनी राजकारण विरहित काम करावे, असा सुचक इशाराही आ. चव्हाण यांनी दिला.
पत्रकारभवनाची चौकशी करणार
कराड तालुक्यातील पत्रकारांसाठी आपण सुमारे ५५ लाख रूपयांचे पत्रकार भवन दिले आहे. त्या भवनाची इमारत उभारणीत मोठा आर्थिक गैरव्यवहार झाला असून ती इमारत एक पत्र्याचे शेड आहे. ते भवन पत्रकारांसाठी असलेतरी तो निधी शासकीय आहे. त्यामुळे याप्रकरणी आपण लक्ष घालणार का? या प्रश्नावर बोलताना आ. पृथ्वीराज चव्हाण म्हणाले, याप्रकरणी अनेक तक्रारी प्रशासनाकडे आहेत, असे असलेतरी माझ्याकडे निवदेन द्या, या प्रकरणीची सखोल चौकशी केली जाईल.
पंतप्रधान मोदी यांची सभा म्हणजे उदयनराजे यांच्या विजयाची नांदी |
वाट कशाची पाहता? कामाला लागा |
साताऱ्यात आरटीई प्रवेशासाठी पालकांचा कमी प्रतिसाद |
अफवांवर नाही, हवामान खात्यावर विश्वास ठेवा : हवामान खात्याचे प्रमुख सुनील कांबळे |
घोटाळेबाजांशी कायम लढत राहणार उदयनराजे गरजले |
साताऱ्यातील सुप्रसिद्ध डॉ. रविंद्र हर्षे यांचे दुःखद निधन |
भाजप देशाचे भविष्य तर काँग्रेस भूतकाळ उदयनराजे भोसले यांचा टोला |
कृष्णाबाई यात्रा महोत्सवाचा पालखी मिरवणुकीने शुभारंभ |
गंभीर गुन्हे करणार्या चौघांच्या टोळीला तडीपारीचा दणका |
बेकायदा दारु विक्रीप्रकरणी एकावर कारवाई |
आदेशाचे उल्लंघन केल्याप्रकरणी पाचजणांवर गुन्हा |
अपघातात जखमी केल्याप्रकरणी दुचाकी चालकावर गुन्हा |
वेगवेगळ्या घटनांमध्ये दोनजणी बेपत्ता |
सातारा शहरातील लल्लन टोळीवर मोक्का कारवाई |
कृष्णा खोरे महामंडळामुळे दुष्काळी भागात पाणी : उदयनराजे भोसले |
साताऱ्यातील सुप्रसिद्ध डॉ. रविंद्र हर्षे यांचे दुःखद निधन |
भाजप देशाचे भविष्य तर काँग्रेस भूतकाळ उदयनराजे भोसले यांचा टोला |
कृष्णाबाई यात्रा महोत्सवाचा पालखी मिरवणुकीने शुभारंभ |
गंभीर गुन्हे करणार्या चौघांच्या टोळीला तडीपारीचा दणका |
बेकायदा दारु विक्रीप्रकरणी एकावर कारवाई |
आदेशाचे उल्लंघन केल्याप्रकरणी पाचजणांवर गुन्हा |
अपघातात जखमी केल्याप्रकरणी दुचाकी चालकावर गुन्हा |
वेगवेगळ्या घटनांमध्ये दोनजणी बेपत्ता |
सातारा शहरातील लल्लन टोळीवर मोक्का कारवाई |
कृष्णा खोरे महामंडळामुळे दुष्काळी भागात पाणी : उदयनराजे भोसले |
लोकसभा निवडणुकीच्या मतदानाची वेळ वाढवून मिळावी |
सूर्योदयाच्या मुहूर्तावर हनुमान जन्मोत्सव साजरा |
सणबूरच्या यात्रेत कुस्तीच्या फडात आग्या मोहोळाचा हल्ला |
उदयनराजेंच्या पत्नी दमयंतीराजेंचा काँग्रेसवर गंभीर आरोप |
वाई, जावळी तालुक्यात अवकाळी पाऊस |