01:08am | Oct 17, 2018 |
कराड : घारेवाडी ता. कराड येथील धुळेश्वर डोंगरावरील मंदीराचे कुलूप तोडून श्री धुळोबा व मिताबाई देवीच्या गळ्यात नवरात्रोत्सवानिमित्त घालण्यात आलेले पाच तोळे सोन्याचे दागिने व ओवाळणीच्या ताटातील रक्कम अज्ञात चोरट्यांनी पळवली. ही घटना रविवार दि. १४ रोजी रात्री घडली.
याबाबत मंदीराचे पुजारी आनंदा पांडूरंग गुरव वय ५२ रा. घारेवाडी यांनी कराड ग्रामीण पोलिसांत फिर्याद दिली आहे. यंदाच्या नवरात्रोत्सवा घारेवाडीच्या धुळेश्वर डोंगरावरील श्री धुळोबा व मिताबाई देवीच्या पुजेचा मान श्री धुळोबा देवस्थान ट्रस्टने आनंदा गुरव यांच्याकडे दिला आहे. त्यासाठी ते दररोज सकाळी ७ वाजता डोंगरावरील मंदीरात जात असतात व सायंकाळची आरती आटोपल्यानंतर सातच्या सुमारास ते मंदीराच्या दरवाजांना कुलूप घालून डोंगरावरून गावातील घरी येत असतात. दिवसभर भाविकभक्तांची दर्शनासाठी ये-जा सुरू असते. रविवार दि. १४ रोजी सायंकाळी आरती आटोपल्यानंतर पुजारी आनंदा गुरव यांनी नेहमीप्रमाणे मंदीराच्या गाभाऱ्यांचे दरवाजे बंद करून व मंदीराचे उत्तर व दक्षिण बाजूकडील दोन्ही दरवाजे कुलूप घालून बंद केले. त्यानंतर ते डोंगरावरून घरी आले.
सोमवारी सकाळी ते पूजाविधी करण्यासाठी सातच्या सुमारास मंदीरात गेले. तेथे उत्तर बाजूच्या दरवाजाचे कुलूप होते, मात्र दक्षिण बाजूच्या दरवाजाचे कुलूप तोडून दरवाजा उघडला गेल्याचे त्यांच्या लक्षात आले. त्यामुळे मंदीरात चोरी झाल्याची त्यांची खात्री पटली. अज्ञात चोरट्याने श्री धुळोबा देवाच्या मूर्तीच्या गळ्यातील दोन तोळ्याचा सोन्याचा गोफ व श्री मिताबाईदेवीच्या गळ्यातील तीन तोळ्याचे सोन्याचे गंठण, तसेच गाभाऱ्यातील ओवाळणीच्या ताटातील १२५ रूपयांची रोकड चोरून नेल्याचे त्यांच्या निदर्शनास आले. शेजारच्या ट्रस्टच्या ऑफिसच्या दरवाजाचे कुलूप तोडून चोरट्याने कपाटामधील साहित्य विस्कटल्याचे त्यांना दिसले. मात्र तेथून काही चोरून नेले नसल्याचे त्यांच्या लक्षात आले. याबाबत त्यांनी ट्रस्टच्या विश्वस्तांसमवेत कराड ग्रामीण पोलीस ठाण्यात येवून फिर्याद दाखल केली. त्यावरून पोलिसांनी अज्ञात चोरट्याविरूध्द गुन्हा नोंद केला आहे. हवालदार बाळकृष्ण जगदाळे तपास करत आहेत.
शाहूपुरी पोलिस ठाण्याच्या हद्दीत आढळला अनोळखी पुरुषाचा मृतदेह |
सातारा शहरातून दोनजणी बेपत्ता |
डॉ आंबेडकर जयंती समारोह अध्यक्षपदी संजय गाडे यांची निवड |
शरद पवारांच्या डावपेचाकडे महाराष्ट्राचे लक्ष |
कराडला रविवारी इंडिया आघाडीचा मेळावा |
पश्चिम महाराष्ट्रात दि. २९ ते ३१ पर्यंत महावितरणचे वीजबिल भरणा केंद्र सुरू |
करंजे पेठतील थकबाकीदाराची पालिकेकडून मालमत्ता केली सील |
साताऱ्यात लोकसभेबाबत शुक्रवारी शरद पवारांची बैठक |
जमिनीच्या वादातून धारदार शस्त्राने एकाचा खून |
लोकसभा सार्वत्रिक निवडणूक-2024 |
कोल्हापूरला निघालेली खासगी ट्रॅव्हल्स झाली पलटी |
पुण्यातील पीएमटीच्या बसचालकाची सोनगाव येथे आत्महत्या |
झाड मारल्याप्रकरणी सातार्यात दोन गुन्हे दाखल |
अदानी ग्रुपचा वीज प्रकल्प रद्द करण्याठी प्रकल्पग्रस्त जिल्हाधिकारी कार्यालयावर काढणार मोर्चा |
प्रतापसिंह नगरात अतिक्रमणांसह लल्लन आणि युवराजच्या दहशतीवर जिल्हा प्रशासनाचा बुलडोझर |

पाच नॅशनल पुरस्कार मिळवून श्लोक घोरपडे कोल्हापूर येथील स्पर्धेत मारणार बाजी |
'आयडियल' मतदारसंघाचे 'आयडॉल' आमदार |
आचारसंहिता काळात लोकशाही दिनाचे आयोजन होणार नाही : नागेश पाटील |
पोक्सोंतर्गत एकावर गुन्हा |
कुऱ्हाडीने वार केल्या प्रकरणी एकावर गुन्हा |