पुणे : पुण्यात भर दिवसा पुन्हा एकदा गोळीबार करण्याची घटना घडली आहे. पुण्यातील विद्यापीठ चौक म्हणून ओळखल्या जाणाऱ्या सावित्रीबाई फुले चौकात मोठा गोळीबार झाला आहे. सकाळी 11:30च्या सुमारास 2 अज्ञात युवकांनी एका दुचाकीस्वारावर गोळीबार केला आहे. यात दुचाकीस्वार जखमी झाला आहे. गोळीबार करताच तरुणांनी घटनास्थळीवरून पळ काढला आहे.
समीर येणपुरे असं जखमी झालेल्या युवकाचं नाव आहे. समीरला जवळच्या रत्ना हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आलं आहे. कोथरूडमध्ये राहणाऱ्या तुकाराम मदारेसोबत पानाच्या टपरीच्या जागेवरून झालेल्या वादामुळे तुकारामने गोळीबार केलं असल्याची प्राथमिक माहिती सुत्रांकडून हाती लागली आहे. भर दिवसा झालेल्या या गोळीबारामुळे परिसरात भीतीचं वातावरण आहे.
दरम्यान, स्थानिकांकडून घटनेची माहिती मिळताच पुणे पोलीस घटनास्थळी दाखल झाले आहेत. पोलीस या संपूर्ण प्रकरणाचा तपास करतायत. पण अद्याप गोळीबारा करणारा तुकाराम मदारे याचा पोलीस शोध घेत आहेत. परिसरातील सीसीटीव्ही कॅमेऱ्यांच्या मदतीने या प्रकरणात आणखी कोणी होत का याचाही पोलीस शोध घेत आहेत.
या प्रकरणात प्रत्यक्षर्दींचीही चौकशी करण्यात येणार आहे. पण पुण्यात भर दिवसा गोळीबार होण्याची ही काही पहिली वेळ नाही आहे. त्यामुळे पुण्यातील वाढती गुन्हेगारी लक्षात घेता सामान्य नागरिकांची सुरक्षा रामभरोसे आहे असं म्हणायला हरकत नाही.
पुण्यातील पीएमटीच्या बसचालकाची सोनगाव येथे आत्महत्या |
झाड मारल्याप्रकरणी सातार्यात दोन गुन्हे दाखल |
अदानी ग्रुपचा वीज प्रकल्प रद्द करण्याठी प्रकल्पग्रस्त जिल्हाधिकारी कार्यालयावर काढणार मोर्चा |
प्रतापसिंह नगरात अतिक्रमणांसह लल्लन आणि युवराजच्या दहशतीवर जिल्हा प्रशासनाचा बुलडोझर |
पाच नॅशनल पुरस्कार मिळवून श्लोक घोरपडे कोल्हापूर येथील स्पर्धेत मारणार बाजी |
'आयडियल' मतदारसंघाचे 'आयडॉल' आमदार |
आचारसंहिता काळात लोकशाही दिनाचे आयोजन होणार नाही : नागेश पाटील |
पोक्सोंतर्गत एकावर गुन्हा |
कुऱ्हाडीने वार केल्या प्रकरणी एकावर गुन्हा |
अवैधरित्या दारू विक्री प्रकरणी एकावर कारवाई |
अंमली पदार्थाचे सेवन केल्याप्रकरणी एकावर गुन्हा |
राहत्या घरातून युवक बेपत्ता |
वडूज येथे बांधकाम विभागाचा अभियंता लाचलुचपतच्या जाळ्यात |
मल्हारपेठेत शाहूपुरी पोलिसांनी पकडला पावणेदोन लाखाचा गुटखा |
आज जिल्ह्यात उदयनराजेंची होणार ग्रँड एन्ट्री |
'आयडियल' मतदारसंघाचे 'आयडॉल' आमदार |
आचारसंहिता काळात लोकशाही दिनाचे आयोजन होणार नाही : नागेश पाटील |
पोक्सोंतर्गत एकावर गुन्हा |
कुऱ्हाडीने वार केल्या प्रकरणी एकावर गुन्हा |
अवैधरित्या दारू विक्री प्रकरणी एकावर कारवाई |
अंमली पदार्थाचे सेवन केल्याप्रकरणी एकावर गुन्हा |
राहत्या घरातून युवक बेपत्ता |
वडूज येथे बांधकाम विभागाचा अभियंता लाचलुचपतच्या जाळ्यात |
मल्हारपेठेत शाहूपुरी पोलिसांनी पकडला पावणेदोन लाखाचा गुटखा |
आज जिल्ह्यात उदयनराजेंची होणार ग्रँड एन्ट्री |
सातारा लोकसभेवर अजितदादांच्या राष्ट्रवादीचा दावा कायम |
पाटखळ येथील नूतन तलाठी कार्यालयाचे अतिक्रमण |
मेक इन इंडिया पॉलिसीमुळे ‘मॅक्सिको’ होण्याची भीती? |
चक्क अप्पर जिल्हाधिकारी निवासस्थाना बाहेरचे झाड जाळण्याचा प्रयत्न |
अजित वाकनीस यांचे निधन |