RNI REG.NO. MAHMAR/2014/56135

What are you looking for?

Contact Us

Address:

Email:

Tel:

Sadar Bazar, Satara, Maharashtra 415001

contact@tmnnews.com

02162 237 474

What are you looking for?

×

शिरवळ येथील हॉटेल सुयश लॉजवरील छाप्यात वेश्या व्यवसाय केंद्राचा पर्दाफाश

02 June 2018 at 17:32

सातारा स्थानिक गुन्हे अन्वेषणची कारवाई

शिरवळ : सोशल मीडियावरून ( व्हॉटस ऍप) द्वारे युवतींचे फोटो पाठवून वेश्या व्यवसायाकरीता युवती पुरविल्याप्रकरणी एका दलालाविरुद्ध मानवी अनैतिक व्यापार प्रतिबंध स्त्रिया / मुली अधिनियम १९५६ (सीट अधिनियम पुनर्निर्मित ) ( पिटाअंतर्गत ) गुन्हा दाखल करत याप्रकरणी एका दलालाला अटक तर दोन युवतींना पोलीसांनी ताब्यात घेतले आहे.सातारा स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाच्या धडक कारवाईमुळे शिरवळ,शिंदेवाडीसह खंडाळा तालुक्यातील लॉज व्यावसायिकांमध्ये खळबळ उडाली आहे. यावेळी पोलीसांनी संबंधितांकडून तीन मोबाइलसह ४६ हजार ९०० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. 

याबाबतची घटनास्थळावरून व पोलीसांनी दिलेली माहिती अशी, सातारा गुन्हे अन्वेषण विभागाचे पोलीस निरीक्षक पद्माकर घनवट, सहाय्यक पोलीस निरीक्षक विकास जाधव हे आपल्या पथकासमवेत शिरवळ पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये पेट्रोलिंग करीत असताना पोलीस निरीक्षक पद्माकर घनवट यांना बातमीदारांमार्फत शिरवळ येथील हॉटेल सुयश याठिकाणी असणाऱ्या लॉजवर नायर नामक व्यक्ती सोशल मीडियाद्वारे ( व्हॉटस ऍप) द्वारे फोटो पाठवून वेश्या व्यवसायाकरीता युवती पुरवत असल्याची माहिती मिळाली . त्यानुसार स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाचे पोलीस निरीक्षक पद्माकर घनवट यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक विकास जाधव, सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक व्ही.दि.जाधव,पी.एच.घोरपडे,एम.आर.घोरपडे, पोलीस हवालदार यू .सी.दबडे, मुबीन मुलाणी , एन.एस.काटकर,महिला पोलीस संगीता सुतार,मोनिका निकम, चालक जाधव यांच्या पथकाने हॉटेल सुयश येथील लॉजवर सापळा रचला . यावेळी पोलीसांनी बनावट गि-हाईकाद्वारे संबंधित ठिकाणी खात्री केली असता याठिकाणी वेश्या व्यवसाय सुरु असल्याची खात्री पटल्यानंतर पोलीसांच्या पथकाने सुयश लॉजवर छापा टाकला . यावेळी पोलीसांनी सुयश लॉजवरील वेश्या व्यावसायिकांचा दलाल शशी शैलेंद्र नायर ( वय ४४, रा. सोलापूर मार्ग ,बोरोपारधी,पुणे ,मूळ रा. पुनल्लू राज्य केरळ ) व त्याच्या समवेत वेश्या व्यवसायाकरीता आणलेल्या दोन युवतींना ताब्यात घेतले. यावेळी पोलीसांनी संबंधितांकडून तीन मोबाईल,१६ हजार ५०० रुपये रोखसह ४६ हजार ९०० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. सातारा स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाने केलेल्या कारवाईमुळे शिरवळ,शिंदेवाडीसह खंडाळा तालुक्यातील लॉज व्यावसायिकांमध्ये खळबळ उडाली आहे. खंडाळा तालुक्यात शिरवळ ,खंडाळा,लोणंद,शिंदेवाडीसह परिसरात अवैधरित्या चालणाऱ्या वेश्या व्यवसायाचे पाळेमुळे मुंबई ,पुणे याठिकाणी असल्याचे स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाच्या प्राथमिक तपासामध्ये निष्पन्न झाले आहे. त्यामुळे या प्रकरणामध्ये पोलीस तपासामध्ये आणखी कोण -कोणते मासे गळाला लागतात याकडे शिरवळसह संपूर्ण खंडाळा तालुक्याचे लक्ष लागून राहिले आहे. याप्रकरणी शशी नायर याला शिरवळ पोलीसांनी अटक केली असून त्याला खंडाळा येथील न्यायालयासमोर उभे केले असता न्यायालयाने शुक्रवार दि. ८ जून पर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. याप्रकरणामध्ये वेश्या व्यवसायामध्ये मुली पुरिवणाऱ्या आंतरराज्य टोळी सक्रिय असल्याची शक्यता व्यक्त करण्यात येत असून याची पाळेमुळे मुंबई,पुणे,लोणंद,शिरवळ,खंडाळा,महाबळेश्वर,पाचगणी, वाई याठिकाणी असल्याने संबंधित पाळेमुळे खणून काढण्याची जवाबदारी शिरवळ पोलीसांवर येऊन ठेपली आहे. त्याचप्रमाणे ताब्यात घेतलेल्या दोन युवतींना कराड येथील आशा केंद्रामध्ये दाखल करण्यात आले आहे. या घटनेची फिर्याद पोलीस हवालदार संगीता सुतार यांनी शिरवळ पोलीस स्टेशनला दिली असून अधिक तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक स्मिता पाटील ह्या करीत आहे. 

 

सातारा स्थानिक गुन्हे अन्वेषण पोलीसांची उतुंग कारवाई .. मोठे रॅकेट उध्वस्त ..! 

शिरवळ येथील हॉटेल सुयश च्या लॉजवर सातारा गुन्हे अन्वेषण विभागाच्या पथकाने कारवाई केल्यानंतर अनेक कारनाम्यांनी पोलिसही चक्रावून गेले. सगळे खिश्यात असल्याच्या तोऱ्यात असलेल्या शशी नायर याची पोलीसांनी पोलीसी खाक्या दाखवल्यानंतर तंतरली. यावेळी रडण्याचे नाटक करीत शशी नायर हा गयावया करू लागला. यावेळी पोलीस निरीक्षक पद्माकर घनवट, सहाय्यक पोलीस निरीक्षक विकास जाधव यांच्या टीमने मुसक्या आवळ्यानंतर शशी नायर हा पोपटागत बोलू लागला . पोलीसांनी बनावट गि-हाइकाबरोबर केलेले नाटकाचे औषध वर्मी बसल्याने वेश्या व्यवसायाच्या रॅकेटचा पर्दाफाश करण्यात पोलीसांना यश आले. यामध्ये आणखी आरोपींची संख्या वाढण्याची शक्यता पोलीसांनी वर्तवली आहे.   

 

वाहनांच्या बेशिस्त पार्किंगमुळे आरटीओ कार्यालयासमोरच वाहतुकीचे तीन तेरा

वाहनचालकांना वाहतुकीचे नियम शिकवणार्‍या उप प्रादेशिक परिवहन कार्यालय (आरटीओ) कार्यालयासमोरच रस्त्याच्या दुतर्फा होत असलेल्या बेकायदेशीर चारचाकी व दुचाकीच्या पार्किंगमुळे अजिंक्य हॉस्पिटल ते सैनिक स्कूल मार्गावर आरटीओ अधिकारी आणि एजंटांच्या संगनमताने

24 minutes before

जेसीबी पलटी होऊन झालेल्या अपघातात एकाचा मृत्यू

नलवडे (बिचुकले), ता. कोरेगाव येथील वाडगं तथा मोरदरा नावाच्या शेतशिवारातील जेसीबी पलटी होऊन झालेल्या अपघातात सामाजिक वनीकरण विभागाचा कंत्राटी कामगार जागीच ठार झाला.

2 hours before

फलटण येथील दत्त नगर येथे महिलेचा खून

दत्त नगर, चौधरवाडी ता. फलटण येथील हेमंत निंबाळकर यांच्या शेतातील घरात रहात असलेल्या महिलेचा अज्ञाताने खून केल्याची घटना घडली असून अरीफा रशीद शेख (वय ४८) असे मृत महिलेचे नाव आहे.

14 hours before

इथिओपियाचा फिक्रू अबेरा दादी प्रथम

ढगाळ वातावरण... यवतेश्वर घाटातील धबधबे ...रस्त्यावर आलेले ढग ... अशा आल्हाददायी वातावरणात आज सातारा हिल हाफ मॅरेथॉन स्पर्धा उत्साहात झाली. स्पर्धकांमुळे येवतेश्वर घाट फुलला होता. सातारकरांनी मार्गाच्या दुतर्फा उभे राहून टाळ्यांच्या गजरात धावपटूंचे

14 hours before