05:27pm | Dec 16, 2018 |
मुंबई : मागील काही वर्षांमध्ये बनावट जात प्रमाणपत्राच्या आधारे सरकारी नोकऱ्या बळकावून शासकीय लाभ लाटणाऱ्या कर्मचाऱ्यांची संख्या देशभरात मोठ्या प्रमाणात आहे. अशा कर्मचाऱ्यांच्या महत्वपूर्ण मुद्द्यावर खासदार अमर साबळे यांनी संसदेच्या राज्यसभा सभागृहाचे लक्ष वेधले.
संसदेच्या हिवाळी अधिवेशनात खासदार साबळे यांनी बनावट जात प्रमाणपत्राच्या आधारे नोकरी मिळविणाऱ्यांची संख्या दरवर्षी किती असते आणि अशा कर्मचाऱ्यांच्या विरोधात संबंधित मंत्रालयाने कोणती कारवाई केली आहे, असा प्रश्न खासदार साबळेंनी उपस्थित केला.
त्यांच्या प्रश्नांना कर्मचारी, लोक तक्रार आणि पेन्शन मंत्रालयाचे राज्यमंत्री डॉ. जितेंद्र सिंह यांनी उत्तर दिले. ते म्हणाले की, बनावट जात प्रमानपत्राद्वारे नोकरी मिळवल्याच्या अनेक तक्रारी मंत्रालयाकडे प्राप्त होतात. त्या तक्रारींची दखल घेऊन तात्काळ चौकशी करण्याचा सूचना संबंधित विभागांना देण्यात येतात. कर्मचारी आणि प्रशिक्षण विभागाच्या 19/5/1993 च्या कार्यालयीन सूचनेनुसार अशी तरतूद करण्यात आली आहे की जर कोणी कर्मचारी बनावट जात प्रमाणपत्राच्या आधारे नोकरी करत असल्याचे आढळल्यास त्याला तात्काळ सेवेतून बडतर्फ करावे.
सरकारने बनावट जात प्रमाणपत्राच्या आधारे नोकरी मिळविणाऱ्या कर्मचाऱ्यांसंदर्भात माहिती जमा करण्याची प्रक्रिया 2018 या वर्षात सुरू केली आहे. फेब्रुवारी 2018 मध्ये या कर्मचाऱ्यांची माहिती घेऊन त्यांच्यावर कारवाई करण्याची मागणी संबंधित विभागाकडून करण्यात आली आहे.
प्राप्त माहितीनुसार मंत्रालय अथवा विभागाद्वारे बनावट जात प्रमाणपत्रासंदर्भात 700हुन अधिक केस असल्याची माहिती देण्यात आली आहे. यापैकी आतापर्यंत 68 दोषी कर्मचाऱ्यांना नोकरीतून बडतर्फ करण्यात आले असल्याची माहिती डॉ. सिंग यांनी खासदार साबळेंना दिली.
महायुतीच्या रॅलीदरम्यान चोरट्यांची हाथ की सफाई |
सातारा पोलीस मुख्यालयात उपनिरीक्षकाला धमकी |
बिग बॉस फेम अभिजीत बिचुकले यांचा अर्ज दाखल |
महाविकास आघाडीच्या उमेदवाराचा पूर्ण ताकतीने प्रचार करणार |
माढयात अभय जगताप यांचे बंड शमले |
सातारा लोकसभा प्रबंधन समितीचे कार्य उत्कृष्ठ |
उदयनराजे भोसले यांची संपत्ती 251 कोटीची |
वादळी वाऱ्यात स्पीड बोट उलटून एकाचा मृत्यू |
निवडणूक स्थिर सर्वेक्षण पथकातील कर्मचाऱ्याला पोलिसाकडून मारहाण |
येणके येथील कुंभार वस्तीतील जल जीवन मिशनअंतर्गतचे काम प्रगतीपथावर |
निवडणुक निरिक्षक आर. अर्जुन व पोलिस निवडणुक निरिक्षक प्रदीप शर्मा यांचे जिल्ह्यात आगमन |
उदयनराजेंना विक्रमी मताधिक्याने निवडून आणण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करणार |
श्री क्षेत्र निनाम येथील सासनकाठीला यात्रेत महत्वाचे स्थान |
मंदार कोल्हटकर, धिरज पाटील यांचे अपघाती निधन |
ट्रकच्या धडकेत दुचाकीस्वाराचा मृत्यू |

राजवाडा परिसरातून सव्वा लाखांच्या सोन्याच्या चैनची चोरी |
मारहाण प्रकरणी चौघांवर गुन्हा |
ट्रक चालकाला लुटल्याप्रकरणी तीन अज्ञातांवर गुन्हा |
महिलेचा विनयभंग केल्याप्रकरणी एकावर गुन्हा |
सराईत गुन्हेगाराने दिली तीन घरफोड्यांची कबुली |