कराड : श्री गणेशोत्सव विसर्जन मिरवणुकीसाठी शनिवार, दि.22 रोजीच्या मध्यरात्री बारापासून रविवारी विसर्जन मिरवणूक संपेपर्यत शहरातील मुख्या मार्गावरून होणार्या वाहतुकीत बदल करण्यात येणार आहे. याबाबतचा आदेश पोलीस अधिक्षक पंकज देशमुख यांनी काढला आहे.
शहर व परिसरातील 350 हून अधिक गणेश मंडळांच्या श्री गणेश मूर्तीचे व घरगुती गणेश मूर्तीचे शनिवार दि.22 ते रविवार दि.23 पर्यंत येथील कृष्णा-कोयनेच्या प्रीतीसंगमात विसर्जन करण्यात येणार आहे. दत्त चौकातून चावडी चौक मार्गे कृष्णा घाट व पांढरीचा मारूती मंदीरामार्गे कृष्णा घाट या रस्त्यावरून विसर्जनसाठी वाहने ये-जा करत असतात. त्यामुळे या मार्गावर वाहतुक कोंडी होवू नये, तसेच वाहतूक सुरळीत सुरू रहावी, यासाठी वाहतुक व्यवस्थेत बदल करण्याचा आदेश पोलीस अधिक्षक पंकज देशमुख यांच्याकडून काढण्यात आला आहे. त्यानुसार पोपटभाई पेट्रोल पंप ते आझाद चौक, चावडी चौक ते कृष्णा घाट या रस्त्यावर एकेरी वाहतूक राहील. कन्याशाळा ते चावडी चौकापर्यंतही एकेरी वाहतूक राहील.
विसर्जन झाल्यानंतर परतणारी वाहने ही कृष्णा घाट ते भगवा चौक, जोशी यांचे राम मंदीर, श्रीधर मुद्रणालय ते कुंभारवाडा ते स्मशानभूमीजवळून डॉ. आंबेडकर मुलांचे शासकीय वस्तीगृह ते जोतिबा मंदीर मार्गे शहरातून बाहेर पडतील.तसेच दुसर्या मार्गाने जोशी यांचे राम मंदीरापासून ते कृष्णामाई-प्रीतिसंगम सांस्कृतिक केंद्र ते हाटकेश्वर मंदीर, व्यंकटेश मंदीर ते सोमवर पेठ पाण्याची टाकी ते शिखरेवाडा (कुंभारवाड) ते स्मशानभूमी चौक ते नगरपरिषद जलनिस्सारण केंद्र ते डॉ. आंबेडकर मुलांचे वस्तीगृह ते नागेश्वर मंदीर मार्गे वाहने बाहेर पडू शकतील. ही सर्व वाहने कृष्णा नाका सर्कल मधून कॉटेज हॉस्पिटलमार्गे विजय दिवस चौकातून भेदा चौकामार्गे शहरातून बाहेर जातील. मिरवणूक कालावधीत शहरातील कोणत्याही रस्त्यावर, रस्त्याकडेला फळांचा गाडा, खाद्यपदार्थांचा स्टॉल, फेरीविक्रेता यांना कोणताही हातगाडा, स्टॉल्स उभा करण्यास मनाई करण्यात आली आहे.
वाहतुकीतील या बदलाची नोंद घेवून गणेश मंडळांनी, नागरिकांनी, व्यापार्यांनी सहकार्य करावे, असे आवाहन वरिष्ठ पोलीस निरीक्षक सर्जेराव गायकवाड यांनी केले आहे.
एकास मारहाण केल्याप्रकरणी पाच जणांवर गुन्हा |
सातार्यातून युवक बेपत्ता |
नागठाण्यात युवकाची आत्महत्या |
उदयनराजे यांना मतदान करून गादीचा सन्मान ठेवा |
जपानचे स्लिम लँडर तिसऱ्यांदा जागृत |
कोल्हापुरातील अंबाबाईच्या रथोत्सव |
छत्रपतींच्या वंशजांना जावळीचा स्वाभिमान सांगू नका |
माझ्याकडे विरोधकांच्या अनेक भानगडी |
महाभकास आघाडीला निवडणुकीत जागा दाखवा |
साताऱ्यात मेघगर्जनेसह बरसल्या पावसाच्या सरी |
जनता बँकेत पुर्नगठीत बोर्ड ऑफ मॅनेजमेंटच्या चेअरमनपदी विनोद कुलकर्णी |
बोंडारवाडीसह धरणांची कामे मार्गी लावणार उदयनराजेंचे आश्वासन |
दलित महासंघ,पॅंथरचा उदयनराजेंना जाहीर पाठींबा |
सातारकरांना बाहेरच्यांनी स्वाभिमान शिकवू नये |
साताऱ्यात कोट्यावधीची कामे हीच आपली जमेची बाजू |
कोल्हापुरातील अंबाबाईच्या रथोत्सव |
छत्रपतींच्या वंशजांना जावळीचा स्वाभिमान सांगू नका |
माझ्याकडे विरोधकांच्या अनेक भानगडी |
महाभकास आघाडीला निवडणुकीत जागा दाखवा |
साताऱ्यात मेघगर्जनेसह बरसल्या पावसाच्या सरी |
जनता बँकेत पुर्नगठीत बोर्ड ऑफ मॅनेजमेंटच्या चेअरमनपदी विनोद कुलकर्णी |
बोंडारवाडीसह धरणांची कामे मार्गी लावणार उदयनराजेंचे आश्वासन |
दलित महासंघ,पॅंथरचा उदयनराजेंना जाहीर पाठींबा |
सातारकरांना बाहेरच्यांनी स्वाभिमान शिकवू नये |
साताऱ्यात कोट्यावधीची कामे हीच आपली जमेची बाजू |
जुगार प्रकरणी एकावर कारवाई |
नोकरीच्या अमिषाने सुमारे पावणे सहा लाखांची फसवणूक |
शहरातील दोन वेगवेगळ्या घटनांमध्ये दोनजण बेपत्ता |
विवाहितेला आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी पती विरुध्द गुन्हा |
शाहूनगर येथे घरफोडी |