05:44pm | Sep 19, 2019 |
सातारा : ऐन विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राष्ट्रवादीचे खासदार उदयनराजे यांना भाजपात खेचून निवडणुकीच्या अगोदरच दिवाळी साजरी केली. उदयनराजे यांच्या भाजप प्रवेशामुळे माजी केंद्रीय कृषीमंत्री तथा राष्ट्रवादी सुप्रिमो शरद पवार भलतेच दुखावले गेले आहेत. तरीपण निवडणुकीच्या तोंडावर 21 वर्षाच्या युवकाला लाजवेल असा उत्साह संचारुन शरद पवारांनी राज्यभरात भिरकीट लावली आहे. अनेक सभा आणि बैठकांच्या माध्यमातून पडझडलेला पक्ष सावरण्याची धडपड पवारांची सुरु आहे. परंतू असे असताना सातारा लोकसभेच्या पोटनिवडणुकीमध्ये श्रीनिवास पाटलांपासून अभिजीत बिचुकलेपर्यंतच्या चर्चांना स्वत: पवारांनी पूर्णविराम देत सातारा लोकसभेच्या आखाड्यात उदयनराजेंच्या विरोधात 'खुद गब्बर' म्हणत शरद पवारांनीच शड्डू ठोकल्याची खात्रीलायक माहिती सातारा टुडे च्या विश्वसनीय सूत्रांकडून मिळाली आहे.
राष्ट्रवादी पक्षाच्या स्थापनेपासून सातारा हा राष्ट्रवादीचा बालेकिल्ला राहिलेला आहे. शरद पवारांनी अडचणीच्या काळात पक्षासोबत राहिलेल्यांना मंत्रीपदाची खैरात केली, त्यांना आर्थिकदृष्ट्या सक्षम केले. परंतू घर बदलले की घराचे वासेही बदलतात. 2014 साली राज्यात आणि केंद्रात ऐतिहासिक सत्तांतर झाल्यानंतर सातारचा किल्ला शाबूत ठेवण्यात राष्ट्रवादीला काही अंशी यशही मिळाले. मात्र 2019 च्या लोकसभा निवडणुकीनंतर राष्ट्रवादीला अभूतपूर्व अशी गळती लागली आहे. राष्ट्रवादीच्या पहिल्या फळीतील सरंजामदारांनी राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा पल्लू पकडून भाजपात प्रवेश करण्याचा सपाटा लावल्यामुळे राष्ट्रवादीला अभूतपूर्व गळती सुरु झाली आहे. 2009 च्या लोकसभा निवडणुकीपासून राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवारांनी सातार्याचे माजी खासदार उदयनराजे भोसले यांच्यावर मुलासारखे प्रेम केले, प्रसंगी स्वपक्षातील नेत्यांचा विरोध पत्करुन उदयनराजेंचा हट्ट पुरवला. नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत पक्षांतर्गत विरोध असूनही शरद पवारांनी उदयनराजेंवर विश्वास दाखवित त्यांना उमेदवारी दिली. भाजप-शिवसेना युतीचे उमेदवार नरेंद्र पाटील यांच्या विरोधात उदयनराजे मोदी लाट असूनही सुमारे दीड लाखाच्या मताधिक्याने निवडून आले. परंतू हळद उतरायच्या आतच उदयनराजेंनी राष्ट्रवादीसह शरद पवारांना खंबाटकी घाट दाखवला. राजेंच्या या अनपेक्षित दगाबाजीमुळे राष्ट्रवादीसह आघाडीही हादरुन गेली आहे.
शिवछत्रपतींच्या थेट तेराव्या वंशजानेच शस्त्र परजल्यामुळे राष्ट्रवादीच्या तंबूत उंट घुसल्यासारखी अवस्था झालेली आहे. ज्या शिवछत्रपतींच्या नावाने राष्ट्रवादीने शिवस्वराज्य यात्रा काढली, त्यांच्याच वंशजांना फोडून भाजपने निवडणुकीअगोदरच दिवाळी साजरी केली आहे. माजी खासदार राजु शेट्टी, आ. शशिकांत शिंदे, खा. अमोल कोल्हे आणि स्वत: पवारांनी उदयनराजेंच्या गाठीभेटी घेत राजेंच्या भाजप प्रवेशाच्या अनुषंगाने त्यांचे मतपरिवर्तन करण्याचा प्रयत्न केला होता. परंतू ही शिष्टाईही फळाला आली नाही. शेवटी पुण्यातून मध्यरात्रीच देवेंद्र फडणवीसांचे चार्टर विमान उदयनराजेंना घेवून दिल्लीच्या दिशेने भुर्रकन उडाले. या विमानाच्या भुर्रकन उडण्यामुळे इकडे राष्ट्रवादीची गर्रर्रकन दुरवस्था सुरु झाली. तिकडे उदयनराजेंनी लोकसभेचे सभापती ओम बिर्ला यांच्याकडे भल्या पहाटे आपल्या लोकसभा सदस्यत्वाचा राजीनामा देवून सकाळी भाजपा सुप्रिमो तथा केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या निवासस्थानी झालेल्या छोटेखानी समारंभात भाजपात अर्थात स्वगृही प्रवेश केला. हा पक्षांतर सोहळा महाराष्ट्राने याची देही याची डोळा पाहिला. त्यामुळे राष्ट्रवादी सोडू इच्छिणार्या अनेकांना बळ मिळाले. उदयनराजेंच्या भाजपा प्रवेशानंतर राष्ट्रवादीतील हेवीवेट समजले जाणारे विधान परिषदेचे सभापती मिस्टर रामराजे हेसुद्धा शिवसेनेच्या वाटेवर असल्याचे बोलले जात आहे. परंतू त्यांनी याबाबत अधिकृत असा काहीच निर्णय घेतला नसल्याने मिस्टर रामराजेंचे तळ्यात मळ्यात आहे. उदयनराजेंनी राष्ट्रवादीला रामराम केल्यानंतर सातारा लोकसभा मतदारसंघातून कोण, अशा चर्चांना ऊत आला आहे. माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, सिक्कीमचे माजी राज्यपाल श्रीनिवास पाटील, त्यांचे पुत्र सारंग पाटील, आ. शशिकांत शिंदे तसेच बिग बॉस फेम अभिजीत बिचुकलेंच्या नावाची चर्चा सोशल मीडियावर आहे. परंतू राष्ट्रवादीने सातारा लोकसभेबाबत अधिकृत भूमिका जाहीर न केल्याने या केवळ चर्चाच आहेत. मात्र गद्दारी करणार्या उदयनराजेंना धडा शिकवण्यासाठी राष्ट्रवादीनेही जिल्हाभरात जोरदार मोर्चेबांधणी सुरु केली आहे. अनेक निष्ठावंतांना चार्ज करण्याचे काम पक्षाकडून केले जात आहे. सोशल मीडियावरुन लोकांचा कल पाहून राष्ट्रवादीने भावनिक आवाहन करुन लोकांची मने जिंकण्याचे प्रयत्न सुरु केले आहेत. उदयनराजेंच्या अनपेक्षित भाजप प्रवेशामुळे अनेकांनी सोशल मिडियावर नाराजीही व्यक्त केली आहे. याच नाराजीचे रुपांतर मतात परावर्तित करण्यासाठी राष्ट्रवादीला सातारा लोकसभा मतदारसंघातून राजेंविरोधात खमक्या उमेदवार द्यावा लागणार आहे. तरच उदयनराजेंविरोधात राष्ट्रवादीतील उमेदवाराचा टिकाव लागणार आहे.
जिल्ह्यात वाईमधून मदन भोसले, सातार्यातून शिवेंद्रराजे भोसले, कराड दक्षिणमधून अतुल भोसले, कराड उत्तरमधून मनोज घोरपडे, पाटणमधून शंभुराज देसाई, नरेंद्र पाटील, कोरेगावमधून महेश शिंदे यांच्या जिवावर उदयनराजे पोटनिवडणूक लढवतील. मात्र राष्ट्रवादीतील सामान्य मतदार यावेळी राष्ट्रवादीच्याच पाठिमागे उभा राहणार असल्याचे चित्र दिसत असल्यामुळे उदयनराजेंसाठी ही निवडणूक सोपी ठरणार नाही. 2014 साली लोकसभा निवडणूक लढणार नसल्याचे जाहीर करुन शरद पवारांनी राज्यसभेवर जाण्याचा निर्णय घेतला होता. नुकत्याच पार पडलेल्या माढा लोकसभा निवडणुकीमध्ये शरद पवार उभे राहणार, अशाही वावड्या उठल्या होत्या. परंतू हवेची दिशा बघून पवारांनी आपली तलवार म्यान केली होती. परंतू सातारा जिल्ह्यात राष्ट्रवादीचा होल्ड आहे. कावळे उडाले तरी मावळे अजून जमिनीवरच आहेत. त्यात सोशल मीडियावर नरेंद्र मोदींविरोधात सुरु असलेल्या नाराजी नाट्याचा राष्ट्रवादी उमेदवाराला फायदा होईल, अशी अटकळ बांधली जात आहे. सातारकरांवर पुन्हा एकदा लोकसभेची पोटनिवडणूक लादणार्या उदयनराजेविरोधी चीड आहे. या सर्व गोष्टींचा फायदा उचलण्याचे राष्ट्रवादीने ठरवले आहे. कराड दक्षिणमधून पृथ्वीराज चव्हाण, विलासकाका उंडाळकर, पाटणमधून विक्रमसिंह पाटणकर, कराड उत्तरमधून बाळासाहेब पाटील, राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष सुनील माने, वाईमधून मकरंद पाटील, कोरेगाव-सातारा-जावलीमधून शशिकांत शिंदे तसेच शरद पवार आणि राष्ट्रवादीवर प्रेम करणार्या कार्यकर्त्यांमधून राष्ट्रवादीच पुन्हा असा दावा केला जात आहे. शरद पवारांनीही अगदी ग्रास रुटपासून चाचपणी करायला सुरुवात केली आहे. त्यामुळे उदयनराजेंविरोधात खुद्द शरद पवारच उभे राहिले तरच राष्ट्रवादी सातारची जागा पुन्हा राखू शकते, असा निष्कर्ष राष्ट्रवादीजनांनी काढल्यामुळे उदयनराजेंविरोधात शरद पवारच हेच फिक्स झाल्याची खात्रीलायक माहिती समोर येत आहे. आतापर्यंत 'मैं खडा तो सरकार से बडा' असे म्हणणार्या उदयनराजेंच्या विरोधात 'मैं खडा तो उदयनराजे से बडा' असे म्हणत शरद पवारांनी येत्या सातारा पोटनिवडणुकीतील लोकसभेच्या आखाड्यात शरद पवारांनी शड्डू ठोकल्यास नवल वाटू नये.
सातारा पोलीस मुख्यालयात उपनिरीक्षकाला धमकी |
बिग बॉस फेम अभिजीत बिचुकले यांचा अर्ज दाखल |
महाविकास आघाडीच्या उमेदवाराचा पूर्ण ताकतीने प्रचार करणार |
माढयात अभय जगताप यांचे बंड शमले |
सातारा लोकसभा प्रबंधन समितीचे कार्य उत्कृष्ठ |
उदयनराजे भोसले यांची संपत्ती 251 कोटीची |
वादळी वाऱ्यात स्पीड बोट उलटून एकाचा मृत्यू |
निवडणूक स्थिर सर्वेक्षण पथकातील कर्मचाऱ्याला पोलिसाकडून मारहाण |
येणके येथील कुंभार वस्तीतील जल जीवन मिशनअंतर्गतचे काम प्रगतीपथावर |
निवडणुक निरिक्षक आर. अर्जुन व पोलिस निवडणुक निरिक्षक प्रदीप शर्मा यांचे जिल्ह्यात आगमन |
उदयनराजेंना विक्रमी मताधिक्याने निवडून आणण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करणार |
श्री क्षेत्र निनाम येथील सासनकाठीला यात्रेत महत्वाचे स्थान |
मंदार कोल्हटकर, धिरज पाटील यांचे अपघाती निधन |
ट्रकच्या धडकेत दुचाकीस्वाराचा मृत्यू |
राजवाडा परिसरातून सव्वा लाखांच्या सोन्याच्या चैनची चोरी |
उदयनराजे भोसले यांची संपत्ती 251 कोटीची |
वादळी वाऱ्यात स्पीड बोट उलटून एकाचा मृत्यू |
निवडणूक स्थिर सर्वेक्षण पथकातील कर्मचाऱ्याला पोलिसाकडून मारहाण |
येणके येथील कुंभार वस्तीतील जल जीवन मिशनअंतर्गतचे काम प्रगतीपथावर |
निवडणुक निरिक्षक आर. अर्जुन व पोलिस निवडणुक निरिक्षक प्रदीप शर्मा यांचे जिल्ह्यात आगमन |
उदयनराजेंना विक्रमी मताधिक्याने निवडून आणण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करणार |
श्री क्षेत्र निनाम येथील सासनकाठीला यात्रेत महत्वाचे स्थान |
मंदार कोल्हटकर, धिरज पाटील यांचे अपघाती निधन |
ट्रकच्या धडकेत दुचाकीस्वाराचा मृत्यू |
राजवाडा परिसरातून सव्वा लाखांच्या सोन्याच्या चैनची चोरी |
मारहाण प्रकरणी चौघांवर गुन्हा |
ट्रक चालकाला लुटल्याप्रकरणी तीन अज्ञातांवर गुन्हा |
महिलेचा विनयभंग केल्याप्रकरणी एकावर गुन्हा |
सराईत गुन्हेगाराने दिली तीन घरफोड्यांची कबुली |
उदयनराजे यांच्या समर्थनार्थ सातार्यात लोटला जनसागर |