RNI REG.NO. MAHMAR/2014/56135

What are you looking for?

Contact Us

Address:

Email:

Tel:

Sadar Bazar, Satara, Maharashtra 415001

contact@tmnnews.com

02162 237 474

What are you looking for?

×

विडणीजवळ भीषण अपघातात दोघे जागीच ठार

11 October 2018 at 14:54

विडणी : महाड - पंढरपूर मार्गावर विडणी येथे ट्रॅक्टरला पाठीमागून धडक दिल्याने दुचाकीवरील दोघांचा जागीच मृत्यू झाला. या घटनेने पिंप्रद गावावर शोककळा पसरली आहे. उमाजी खाशाबा मदने ( वय -३७) व हरि रामचंद्र पवार वय (वय ५५) दोघेही रा.  पिंप्रद, ता. फलटण अशी मृत दोघांची नावे आहेत. 

दुर्गादेवीची मूर्ती घेऊन फलटणवरून बरडकडे निघालेला ट्रॅक्टर डिझेल संपल्याने रस्त्यातच उभा होता. रात्री ८:३० च्या सुमारास फलटणवरून पिंप्रदकडे  उमाजी मदने  व हरि पवार निघाले होते. महाङ- पंढरपूर रस्त्यावर विडणी पवारवाडी शाळेनजीकच उभ्या असलेल्या ट्रॅक्टरला त्यांची दुचाकी पाठीमागून जोरदार धडकली. त्यामध्ये दोघेही जागीच ठार झाले. ट्रॅक्टर डिझेल संपल्याने रस्त्यावरच उभा होता. रात्रीची वेळ व अंधार असल्याने हा अपघात झाला.

Amin bagwan


चौंडेश्वरीनगर व मलकापूर येथील मस्जीदींचे अतिक्रमण हटवा

चौंडेश्वरीनगर गोवारे, व मलकापूर ,ता. कराड येथे सरकारी खुल्या जागेत मस्जीदीचे अनाधिकृतपणे व बेकायदेशीर बांधकाम करण्यात आले आहे.

4 hours before

मलटण मध्ये घरफोडी ; साडेसात लाखांचे सोन्याचे दागिने लांबवले

येथील उपनगर असलेल्या मलटण येथील काळुबाई नगर येथे बंद घराचे कुलूप तोडून 37 तोळ्याचे सोन्याचे दागिने अज्ञात चोरट्यांनी लंपास केले आहेत.

4 hours before

बालकाच्या अपघाती मृत्यूस कारणीभूत ठरलेल्या कार चालकास सक्तमजुरी

शिंदेवाडी ता.खंडाळा गावच्या हद्दीमध्ये महामार्ग ओलांडणाऱ्या पाच वर्षाच्या मुलाच्या मृत्यूप्रकरणी पुणे येथील एका कार चालकाला खंडाळा न्यायालयाने दोषी ठरवले आहे.

5 hours before

जमाव व शस्त्रबंदी आदेश भंग केल्याप्रकरणी खा. उदयनराजे, आ. शिवेद्रराजेंसह ७५ समर्थकांवर गुन्हे

सोमवारी भरदुपारी दारूच्या दुकानासमोर खा. उदयनराजे व आ. शिवेंद्रराजे भोसले यांच्यासह समर्थकांमध्ये झालेल्या टशन नंतर शाहुपूरी पोलिस ठाण्यात एकूण दोन गुन्हे दाखल झाले आहेत.

5 hours before