04:10pm | Sep 04, 2018 |
सातारा : राज्यामध्ये हजारो किलोमीटर रस्त्यांचे जाळे पसरले आहे. मुख्य शहरांना जोडणारे रस्ते हे सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अखत्यारित येतात, तर छोट्या-मोठ्या खेडेगावांना जोडणारे रस्ते जिल्हा परिषद बांधकाम विभागाच्या अंतर्गत येतात. राज्यातील हजारो किमी रस्त्यांच्या बांधकामाची व देखभालीची जबाबदारी सार्वजनिक बांधकाम विभागाची असते. असे असतानाही राज्यातील रस्त्यांची सध्या प्रचंड दुरवस्था झाली आहे. तशीच अवस्था नगरपालिका आणि महापालिका रस्त्यांचीसुद्धा आहे.
पूर्वी रस्ते रुंदीला छोटे होते, परंतू चांगल्या दर्जाचे होते. रस्त्याला लागलेले डांबर दहा-दहा वर्षे हालत नव्हते, कारण अधिकारी, कर्मचारी आणि ठेकेदारांच्याही गरजा मर्यादित होत्या. राजकीय हस्तक्षेप कमी होता. त्यामुळे साहजिकच रस्ते चांगले असायचे. एखाद्या रस्त्याला खड्डा पडलाच, तर तो युद्धपातळीवर मुजवला जायचा. कारण रस्त्याच्या देखभालीसाठी सार्वजनिक बांधकाम विभागाच्या उपविभागात शेकडो 'मैलकुलीं'ची फौज असायची. जुन्या पिढीमध्ये रस्त्यांवरुन प्रवास करणार्यांना 'मैलकुली' हा नेहमीच जवळचा वाटायचा.
गेल्या पंधरा वर्षापासून राज्यातील सार्वजनिक बांधकाम विभागाने मैलकुली या पदाची भरतीच बंद केली. अर्थात केडर अबॉलिश केले. सार्वजनिक बांधकाम विभागातील सर्वात शेवटचा दुवा असलेला मैलकुली राज्यातील हजारो किलोमीटर रस्त्यांचे जाळे पसरलेल्या रस्त्यांची डागडुजी आणि देखभाल करायचा. सुमारे चाळीस- पन्नास वर्षापूर्वी भरती झालेले हजारो मैलकुली जिल्ह्यातील 14 सब डिव्हिजनमधून निवृत्त झाले आहेत. 14 सब डिव्हिजनमध्ये 50-60 मैलकुली कार्यरत आहेत. यामध्ये फलटणमध्ये सर्वाधिक आहेत. सध्या रस्त्याला खड्डे पडल्यास अथवा पावसाळ्यात रस्त्यावर झाडे कोसळल्यास मैलकुली जिवाची पर्वा न करता झाडे हटविण्याचे काम करीत असत. नेमून दिलेल्या प्रत्येक मैलावर मैलकुली खड्डा पडू न देण्याची दक्षता घेत असत. भरती होताना शिक्षणाची अट नसल्यामुळे कष्टकरी असलेला मैलकुलीने कर्तव्य बजावताना कधीही कंटाळा केला नाही. शिकलेला माणूस हुशार असतो. परंतू अनेक मैलकुली अल्पशिक्षित असुनसुद्धा त्यांनी निवृत्तीपर्यंत समाजाची निरपेक्ष भावनेने सेवा केली आहे. सरकारे बदलली, तसतसे नियम बदलले. या नियमांमुळे मैलकुली नामशेष झाले आहेत. टेंडर राजमुळे आज कॉन्ट्रॅक्टर गब्बर झाले.
रस्त्यावर खड्डे पडल्यास अथवा झाडे कोसळल्यास सार्वजनिक बांधकाम विभागामार्फत टेंडर काढूनच संबंधित कामे केली जातात. पूर्वी प्रत्येक सब डिव्हिजनमध्ये नेमून दिलेल्या रस्त्यावर फावडे, घमेले आणि सायकलवर जाणारा माणूस जुन्या पिढीतील अनेकांनी पाहिला. भर उन्हाळ्यात व पावसाळ्यात हा मैलकुली उपलब्ध साधनांनुसार हजर असायचा. पंधरा वर्षांपासून मैलकुली या संवर्गातील भरती शासनाने बंद केली. (केडर अबॉलिश केले) त्यामुळे सार्वजनिक बांधकाम विभागातील चतुर्थ श्रेणी घटक हा बांधकाम विभागातून नामशेष झालेला आहे. जिल्ह्यात जे काही निवृत्तीच्या मार्गावर शंभरएक मैलकुली आहेत. त्यांना शासकीय विश्रामगृह, कार्यालयीन शिपाई, माळी अशी कामे विभागून दिली आहेत. त्यामुळे रस्त्यांने येता-जाता दिसणारा मैलकुली हा घटक येत्या काही दिवसांमध्ये लुप्त होणार आहे. कालानुरुप बदल अपेक्षित असतात. मात्र रस्त्यावरुन प्रवास करणार्यांना आपलासा वाटणारा तोकड्या पगारात संसार चालवून लाखो वाहनचालकांच्या प्राणाचे रक्षण करणारा, ऊन, पाऊस, वादळ वाऱ्यात रस्त्यांना खड्डे पडू न देणारा मैलकुली हा घटक येणार्या काळात नावालासुद्धा उरणार नाही. मैलकुली हा ब्रिटीशकालीन शब्दसुद्धा पोस्टाच्या तारेप्रमाणे काळाच्या ओघात विरुन जाणार हे मात्र नक्की.
पूर्वी रस्त्यांच्या अंतरांचे परिमाण हे 'माईल' मध्ये असायचे, १९६० सालानंतर अमेरिका, म्यानमार, लायबेरिया हे देश सोडले तर भारतासह जगभरातील इतर देशांनी किलोमीटर हे परिमाण स्वीकारले आहे. त्यामुळे ब्रिटीश राजवटीमध्ये 'माईल' मध्ये मोजले जाणाऱ्या रस्त्यांच्या परिमाणवरून रस्त्यांची डागडुजी करणाऱ्या वर्गाला 'माईलकुली' हे नाव पडले असावे.
- संग्राम निकाळजे
सातारा शहरातील लल्लन टोळीवर मोक्का कारवाई |
कृष्णा खोरे महामंडळामुळे दुष्काळी भागात पाणी : उदयनराजे भोसले |
लोकसभा निवडणुकीच्या मतदानाची वेळ वाढवून मिळावी |
सूर्योदयाच्या मुहूर्तावर हनुमान जन्मोत्सव साजरा |
सणबूरच्या यात्रेत कुस्तीच्या फडात आग्या मोहोळाचा हल्ला |
उदयनराजेंच्या पत्नी दमयंतीराजेंचा काँग्रेसवर गंभीर आरोप |
वाई, जावळी तालुक्यात अवकाळी पाऊस |
अल्पवयीन मुलीवर अत्याचार करणाऱ्या युवकाला सश्रम कारावास |
उदयनराजे यांनी घेतले वाईच्या महागणपतीचे दर्शन |
तरुणांच्या भवितव्यासाठी मोदींच्या नेतृत्वाखाली स्थिर सरकार निवडून देऊया उदयनराजे यांचे आवाहन |
पाण्याच्या मोटरची चोरी |
सिव्हिल हॉस्पिटलच्या पार्किंगमधून दुचाकीची चोरी |
चैन स्नॅचिंग प्रकरणी दोन अज्ञातांवर गुन्हा |
अपघातात जखमी केल्याप्रकरणी एकावर गुन्हा |
अवैध दारु प्रकरणी दोघांवर कारवाई |
उदयनराजेंच्या पत्नी दमयंतीराजेंचा काँग्रेसवर गंभीर आरोप |
वाई, जावळी तालुक्यात अवकाळी पाऊस |
अल्पवयीन मुलीवर अत्याचार करणाऱ्या युवकाला सश्रम कारावास |
उदयनराजे यांनी घेतले वाईच्या महागणपतीचे दर्शन |
तरुणांच्या भवितव्यासाठी मोदींच्या नेतृत्वाखाली स्थिर सरकार निवडून देऊया उदयनराजे यांचे आवाहन |
पाण्याच्या मोटरची चोरी |
सिव्हिल हॉस्पिटलच्या पार्किंगमधून दुचाकीची चोरी |
चैन स्नॅचिंग प्रकरणी दोन अज्ञातांवर गुन्हा |
अपघातात जखमी केल्याप्रकरणी एकावर गुन्हा |
अवैध दारु प्रकरणी दोघांवर कारवाई |
वाहनावर विनापरवाना स्पिकर लावल्याप्रकरणी एकावर कारवाई |
सातारा लोकसभेसाठी एकूण १६ उमेदवार रिंगणात |
उमेदवारांच्या निवडणुक खर्चाची नोंदवही तपासण्याचे वेळापत्रक जाहीर ; जिल्हा निवडणूक निर्णय अधिकारी डुडी |
छत्रपती संभाजी महाराज शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयतर्फे विविध आरोग्यविषयक उपक्रमांचे आयोजन |
प्लास्टिक पाईपने बेदम मारहाण करून युवकाचा केला निर्घृण खून |