09:43pm | Jun 01, 2018 |
सातारा : गेंडामाळाजवळील माजगांवकर माळावर पंतप्रधान आवास योजना साकार करण्यासाठी नगरपरिषदेच्या मालकीची जागा आहे. सर्वांना परवडणारी घरे प्रदान करणे याठिकाणी शक्य आहे, म्हाडाचे अधिकारी, पंतप्रधान आवास योजनेचे महत्व आणि वैशिष्टये समजावून सांगण्यासाठी व योजना पडताळीसाठी माजगांवकर माळ या ठिकाणी आले आहेत. संबंधीत सर्व नागरीकांनी योजनेची परिपूर्ण माहीती आणि शंका समाधान त्यांचेकडून करुन पंतप्रधान आवास योजनेच्या माध्यमतुन स्वतःच्या हक्काच्या घराचे स्वप्न साकार करावे असे आवाहन सातारा लोकसभा मतदार संघाचे खासदार श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले यांनी आज केले.
पंतप्रधान आवास योजनेअंतर्गंत घरे उभारण्याच्या हुडकाच्या डेप्युटी जनरल मॅनेजर श्रीमती वैजयंती महाबले यांच्या समवेत, माजगांवकर माळ येथील जागेची पहाणी खासदार श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले यांनी केली त्यावेळी ते लोकांना संबोधित करताना औपचारिक बोलत होते.
पंतप्रधान आवास योजनेच्या माध्यमातुन एकूण 1958 घरांच्या प्रस्तावाला कालच केंद्र शासनाने मंजूरी दिल्यावर, प्रत्यक्ष प्रकल्पाचे आर्थिक नियोजनाकरीता म्हाडाच्या उपसरव्यवस्थापिका वैजयंती महाबळे यांनी प्रत्यक्ष भेट दिली. त्यानी योजनेची विस्तृत माहीती देताना, किती स्केअरफुटांचे घर मिळणार तसेच लाभार्थी हिस्सा, नगरपरिषदेचा हिस्सा आणि केंद्राचा हिस्सा याबाबत नागरीकांना मार्गदर्शन केले.
पंतप्रधान आवास योजने अंतर्गंत ज्याला स्वतःचे निवासस्थान नाही अश्या सर्वांना सामावून घेण्याचा नगरपरिषदेचा प्रयत्न राहणार आहे. त्यासाठी लागेल तितका निधी उपलब्ध करुन दिला जाईल. घरांबरोबरच मुलभुत नागरी सुविध जसे की, अंतर्गंत रस्ते, गटर्स, दिवाबत्ती, पाणी या सुविधा मिळणार असल्याने, माजगांवकरमाळ रहिवाश्यांनी योजनेचे महत्व लक्षात घेवून यामध्ये सहभागी व्हावे, साता-या बरोबरच कराड, वाई नगरपरिषदांच्या हद्यीत ही योजना लवकरच कार्यान्वित होणार आहे. त्याकरीताही केंद्राच्या माध्यमातुन मोठया प्रमाणावर निधी उपलब्ध करुन दिला जाणार आहे अशीही माहीती खासदार श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले यांनी केले.
यावेळी नगरसेवक डि.जी.बनकर, मुख्याधिकारी शंकर गोरे, माजी जिल्हापरिषद सदस्य सुनील काटकर, जितेंद्र खानविलकर, प्रताप शिंदे, ठेका अभियंता अनंत प्रभुणे व म्हाडाचे क्षेत्रिय अधिकारी उपस्थित होते.
दरम्यान, कालच मंजूर करण्यात आलेल्या योजनेच्या दृष्टीने आज सर्वेक्षण करण्यात आल्याने, पंतप्रधान आवास योजना वेगाने पूर्ण होण्यासाठी खासदार श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले यांनी स्वतः लक्ष घातले आहे त्यामुळे मोठया गतीने पंतप्रधान आवास योजनेची घरे साकार होतील अशी चर्चा माजगांवकरमाळावर नागरीकांमध्ये सुरु होती.
उदयनराजे यांनी घेतले वाईच्या महागणपतीचे दर्शन |
तरुणांच्या भवितव्यासाठी मोदींच्या नेतृत्वाखाली स्थिर सरकार निवडून देऊया उदयनराजे यांचे आवाहन |
पाण्याच्या मोटरची चोरी |
सिव्हिल हॉस्पिटलच्या पार्किंगमधून दुचाकीची चोरी |
चैन स्नॅचिंग प्रकरणी दोन अज्ञातांवर गुन्हा |
अपघातात जखमी केल्याप्रकरणी एकावर गुन्हा |
अवैध दारु प्रकरणी दोघांवर कारवाई |
वाहनावर विनापरवाना स्पिकर लावल्याप्रकरणी एकावर कारवाई |
सातारा लोकसभेसाठी एकूण १६ उमेदवार रिंगणात |
उमेदवारांच्या निवडणुक खर्चाची नोंदवही तपासण्याचे वेळापत्रक जाहीर ; जिल्हा निवडणूक निर्णय अधिकारी डुडी |
छत्रपती संभाजी महाराज शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयतर्फे विविध आरोग्यविषयक उपक्रमांचे आयोजन |
प्लास्टिक पाईपने बेदम मारहाण करून युवकाचा केला निर्घृण खून |
किरकोळ वादातून मुलाला दगडाने मारहाण करुन खून |
न्यू इंग्लिश स्कूलच्या शतकोत्तर रोप्य महोत्सवी वर्षानिमित्त श्रीराम गीते..संगीत संध्या कार्यक्रम |
बेकायदा दारु विक्री प्रकरणी दोघांवर कारवाई |
अपघातात जखमी केल्याप्रकरणी एकावर गुन्हा |
अवैध दारु प्रकरणी दोघांवर कारवाई |
वाहनावर विनापरवाना स्पिकर लावल्याप्रकरणी एकावर कारवाई |
सातारा लोकसभेसाठी एकूण १६ उमेदवार रिंगणात |
उमेदवारांच्या निवडणुक खर्चाची नोंदवही तपासण्याचे वेळापत्रक जाहीर ; जिल्हा निवडणूक निर्णय अधिकारी डुडी |
छत्रपती संभाजी महाराज शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयतर्फे विविध आरोग्यविषयक उपक्रमांचे आयोजन |
प्लास्टिक पाईपने बेदम मारहाण करून युवकाचा केला निर्घृण खून |
किरकोळ वादातून मुलाला दगडाने मारहाण करुन खून |
न्यू इंग्लिश स्कूलच्या शतकोत्तर रोप्य महोत्सवी वर्षानिमित्त श्रीराम गीते..संगीत संध्या कार्यक्रम |
बेकायदा दारु विक्री प्रकरणी दोघांवर कारवाई |
मोती चौक परिसरातून सोन्याच्या चैनची चोरी |
महिलेच्या पर्सची चोरी |
एसटी स्टॅन्ड परिसरातील कॅफेवर कारवाई; तिघांवर गुन्हा |
मारहाणीसह जबरी चोरी प्रकरणी 20 जणांवर गुन्हा |
उदयनराजे यांनी केली पंतप्रधान मोदी यांच्या कराडमधील सभास्थळाची पाहणी |