शेणोली : कोडोली (ता. कराड) येथील डॉ. जगदीश शंकर जगताप या शेतकर्याच्या मुलाने युपीएससीत महाराष्ट्राचा झेंडा रोवला आहे. देशात 304 वा क्रमांक पटकावत त्याने हे यश तिसर्या प्रयत्नात खेचून आणले. एकत्रित कुटुंबाचा भक्कम आधार मला कामी आल्याचे डॉ. जगताप यांनी सांगितले.
शेतकरी कुटुंबातील पार्श्वभूमी असणार्या डॉ. जगताप यांना व्यापक सेवेचा ध्यास आणि चिकाटीच्या जोरावर हे यश मिळवता आले. आई, वडील, चुलते, चुलती यांनी घेतलेल्या काबाडकष्टातून जगदीश यश मिळवू शकल्याचे अभिमानाने सांगत आहेत. जगताप कुटुंबाची 4 एकर शेतीवर गुजराण चालते. वडील शंकर श्रीरंग जगताप, आई मंगल जगताप, चुलते कृष्णा श्रीरंग जगताप व चुलत्या सुमन जगताप ही मंडळी शेतीचा सर्व भार वाहतात. शेतीच्या जोरावर घरातील चार मुले आणि एक मुलगी त्यांनी उच्चशिक्षित केली.
कृष्णा आरोग्य विद्यापीठातून त्याने दंतचिकिस्ताची वैद्यकीय पदवी घेतली. पदवी घेतल्यानंतर कोडोली व शेणोली स्टेशन येथे दवाखाना सुरु करुन तेथून त्याने आपली आरोग्य सेवा सुरू केली. परंतु आपली सेवा मौखिक आरोग्यपुरती सिमित असल्याची उणीव मनात राहिल्याने त्याने पुढील टप्प्यात आव्हान स्वीकारण्याचे ठरवले. प्रशासकीय सेवेतून प्रभावशाली काम करण्याची ओढ त्यांना लागल्यानंतर त्यांनी आरोग्य सेवेबरोबर यूपीएससीच्या परीक्षांचे प्रयत्न सुरु केले.
एकत्रित कुटुंबाचा भक्कम आधार मला कामी आल्याचे त्यांनी सांगितले. जयवंतराव भोसले व डॉ. सुरेश भोसले यांची प्रेरणा मला खूप उपयोगी ठरल्याचे त्यांनी आवर्जून नमूद केले.
शाहूपुरी पोलिस ठाण्याच्या हद्दीत आढळला अनोळखी पुरुषाचा मृतदेह |
सातारा शहरातून दोनजणी बेपत्ता |
डॉ आंबेडकर जयंती समारोह अध्यक्षपदी संजय गाडे यांची निवड |
शरद पवारांच्या डावपेचाकडे महाराष्ट्राचे लक्ष |
कराडला रविवारी इंडिया आघाडीचा मेळावा |
पश्चिम महाराष्ट्रात दि. २९ ते ३१ पर्यंत महावितरणचे वीजबिल भरणा केंद्र सुरू |
करंजे पेठतील थकबाकीदाराची पालिकेकडून मालमत्ता केली सील |
साताऱ्यात लोकसभेबाबत शुक्रवारी शरद पवारांची बैठक |
जमिनीच्या वादातून धारदार शस्त्राने एकाचा खून |
लोकसभा सार्वत्रिक निवडणूक-2024 |
कोल्हापूरला निघालेली खासगी ट्रॅव्हल्स झाली पलटी |
पुण्यातील पीएमटीच्या बसचालकाची सोनगाव येथे आत्महत्या |
झाड मारल्याप्रकरणी सातार्यात दोन गुन्हे दाखल |
अदानी ग्रुपचा वीज प्रकल्प रद्द करण्याठी प्रकल्पग्रस्त जिल्हाधिकारी कार्यालयावर काढणार मोर्चा |
प्रतापसिंह नगरात अतिक्रमणांसह लल्लन आणि युवराजच्या दहशतीवर जिल्हा प्रशासनाचा बुलडोझर |

पाच नॅशनल पुरस्कार मिळवून श्लोक घोरपडे कोल्हापूर येथील स्पर्धेत मारणार बाजी |
'आयडियल' मतदारसंघाचे 'आयडॉल' आमदार |
आचारसंहिता काळात लोकशाही दिनाचे आयोजन होणार नाही : नागेश पाटील |
पोक्सोंतर्गत एकावर गुन्हा |
कुऱ्हाडीने वार केल्या प्रकरणी एकावर गुन्हा |