02:29am | Jan 11, 2020 |
कराड : गोवा राज्याकरीता विक्रीसाठी असलेल्या विदेशी मद्यांची वाहतुक करणारी चार चाकी गाडी ताब्यात घेऊन 137 बाटल्यांचा मद्यसाठा जप्त करण्यात आला आहे. ही कारवाई राज्य उत्पादन शुल्क कराड विभागाच्या पथकाने आज (शुक्रवारी) सकाळी मसूर-निगडी रोडवर केली. या कारवाईत तीन जणांना ताब्यात घेऊन त्यांच्याकडील चार चाकी वाहनासह विदेशी मद्यसाठा असा सुमारे 2 लाख 7 हजार रूपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
निलेश शांताराम जाधव, दिलीप किसन जाधव (दोघे रा.किवळ), अजय सुरेश जाधव (रा.आर्वी ता.कोरेगाव) अशी बेकायदेशीर विदेशी मद्याची वाहतुक प्रकरणी ताब्यात घेण्यात आलेल्या तिघांची नावे आहेत.
याबाबत मिळालेली माहिती अशी, मसूर (ता.कराड) येथे मसुर ते निगडी जाणार्या रस्त्यावर फक्त गोवा राज्याकरीता विक्रीसाठी असे लिहिलेल्या विदेशी मद्याची वाहतुक होणार असल्याची माहिती राज्य उत्पादन शुल्क कराड विभागाच्या पथकाला मिळाली. त्यानुसार विभागीय उपायुक्त वाय.एम.पवार यांच्या आदेशानुसार व जिल्हा अधीक्षक अनिल चासकर यांच्या मार्गदर्शनाखाली राज्य उत्पादन शुल्क कराड विभागाच्या पथकाने कराड ते निगडी रस्त्यावर सापळा रचला. आज (शुक्रवारी) सकाळी या रस्त्यावरून चार चाकी वाहन (क्र.एमएच11 एडब्ल्यू 0132) जाताना आढळून आले. या वाहनाची तपासणी केली असता विदेशी मद्याच्या बाटल्यांचा साठा आढळून आला. या प्रकरणी 3 जणांना ताब्यात घेऊन त्यांच्या ताब्यातील चार चाकी वाहन व विदेशी दारूच्या 750 मिलीच्या 137 बाटल्या असा एकुण 2 लाख 7 हजार 995 रूपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.
ही कारवाई राज्य उत्पादन शुल्क कराड विभागाचे निरीक्षक राजेंद्र पाटील, दुय्यम निरीक्षक शिरीष जंगम, प्रताप बोडेकर, रोहित माने, श्रीनिवास पाटील, सहाय्यक दुय्यम निरीक्षक सचिन बावकर, जवान प्रशांत गायकवाड, विनोद बनसोडे, शंकर बक्केवाड, अमोल खरात, महिला जवान राणी काळोखे यांनी केली. पुढील तपास राज्य उत्पादन शुल्क कराड विभागाचे निरीक्षक राजेंद्र पाटील करीत आहेत.
श्री क्षेत्र निनाम येथील सासनकाठीला यात्रेत महत्वाचे स्थान |
मंदार कोल्हटकर, धिरज पाटील यांचे अपघाती निधन |
ट्रकच्या धडकेत दुचाकीस्वाराचा मृत्यू |
राजवाडा परिसरातून सव्वा लाखांच्या सोन्याच्या चैनची चोरी |
मारहाण प्रकरणी चौघांवर गुन्हा |
ट्रक चालकाला लुटल्याप्रकरणी तीन अज्ञातांवर गुन्हा |
महिलेचा विनयभंग केल्याप्रकरणी एकावर गुन्हा |
सराईत गुन्हेगाराने दिली तीन घरफोड्यांची कबुली |
उदयनराजे यांच्या समर्थनार्थ सातार्यात लोटला जनसागर |
शिक्षक हेच सुसंस्कृत समाजनिर्मितीचे जनक |
अजिंक्यतारा कारखान्यावर वादातून झाला गोळीबार |
जनता बँक साताराच्या तज्ज्ञ संचालकपदी सौरभ रायरीकर, राजेंद्र जाधव यांची निवड |
महिलेची गळफास घेवून आत्महत्या |
एकाच्या मृत्यूप्रकरणी कार चालकावर गुन्हा |
संशयित माल जवळ बाळगल्याप्रकरणी एकावर गुन्हा |
ट्रक चालकाला लुटल्याप्रकरणी तीन अज्ञातांवर गुन्हा |
महिलेचा विनयभंग केल्याप्रकरणी एकावर गुन्हा |
सराईत गुन्हेगाराने दिली तीन घरफोड्यांची कबुली |
उदयनराजे यांच्या समर्थनार्थ सातार्यात लोटला जनसागर |
शिक्षक हेच सुसंस्कृत समाजनिर्मितीचे जनक |
अजिंक्यतारा कारखान्यावर वादातून झाला गोळीबार |
जनता बँक साताराच्या तज्ज्ञ संचालकपदी सौरभ रायरीकर, राजेंद्र जाधव यांची निवड |
महिलेची गळफास घेवून आत्महत्या |
एकाच्या मृत्यूप्रकरणी कार चालकावर गुन्हा |
संशयित माल जवळ बाळगल्याप्रकरणी एकावर गुन्हा |
राहत्या घरातून युवती बेपत्ता |
वाई, जावळी परिसरात जोरदार अवकाळी पाऊस |
विरोधकांच्या रडीच्या डावाला जनता भुलणार नाही |
महायुतीचे आज सातार्यात जोरदार शक्ती प्रदर्शन |
सातारा जिल्ह्यात राम लल्लाच्या गजराने रामनवमी साजरी |