सातारा : भारतातील नागरिक विविध समाज माध्यमांचा वापर करतात. यात यवुकांचा मोठा सहभाग आहे. युवकांनी समाज माध्यमांचा वापर विधायक कामांसाठी करावा, असे आवाहन जिल्हाधिकारी श्वेता सिंघल यांनी आज केले.
येथील जिल्हाधिकारी कार्यालयातील नियोजन भवनात महामित्र सोशल मीडिया संवाद सत्राचे आयोजन जिल्हा माहिती कार्यालयाच्यावतीने आज करण्यात आले होते. त्याचा समारोप जिल्हाधिकारी श्वेता सिंघल यांच्या प्रमुख उपस्थित झाला. यावेळी जिल्हा नियोजन अधिकारी बी.जे. जगदाळे, समाज कल्याणचे सहायक आयुक्त विजय गायकवाड, जिल्हा अग्रणी बँक व्यवस्थापक महादेव शिरोळकर, कौशल्य विकास अधिकारी सचिन जाधव, जिल्हा माहिती अधिकारी युवराज पाटील, जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अधिकारी देवीदास ताम्हाणे, कोषागार अधिकारी सितल करंजेकर, अलका पाटील, प्राध्यापक पी.बी. गायकवाड, एन.व्ही. शिंदे, श्रीधर कुलकर्णी, मनीष इनामदार आदी यावेळी उपस्थित होते.
शासनाच्या विविध योजना जनतेपर्यंत पोहचण्यासाठी महामित्र ही संकल्पना समोर आली आहे. आपल्या कौशल्याच्या आधारे शासनाच्या योजना जास्तीत जास्त नागरिकांपर्यंत पोहोचवाव्यात. समाजामध्ये समाज माध्यमांद्वारे सकारात्मक बदल घडवावे. महामित्रांनी शासनचे दूत म्हणून काम करावे, असे आवाहनही जिल्हाधिकारी श्वेता सिंघल यांनी शेवटी केले.
महामित्र सोशल मीडिया संवाद सत्र हा कार्यक्रम माझ्यासाठी विशेष आहे. नागरिकांसाठी तसेच शेतकऱ्यांसाठी असणाऱ्या बँकेकडील योजनांची माहिती समाज माध्यमांवरुन प्रसिद्धीसाठी या महामित्राचा वापर केला जाईल, असे आश्वासन जिल्हा अग्रणी बँक व्यवस्थापक महादेव शिरोळकर यांनी यावेळी दिले.
महामित्र सोशल मीडिया ही संकल्पना खूप चांगली असून या संवाद सत्रामध्ये समाज उपयोगी चर्चा झाली. यापुढेही महामित्रांनी समाज विधायक कामे करावीत, असेआवाहन कौशल्य विकास अधिकारी सचिन जाधव यांनी यावेळी केले.
आपला देश हा युवकांचा देश आहे. आपल्याकडे 27 कोटी लोक व्हॉस्अपचा वापर करत असून रोज 1 लाख लोक नव्याने सहभागी होत आहेत. तरुणांना योग्य दिशा मिळावी त्यांचा विधायक कामांमध्ये मोठ्या प्रमाणात सहभाग वाढावा यासाठी महामित्र ही संकल्पना समोर आली आहे. महामित्र सोशल मीडिया संवाद सत्रातून युवकांमधून चांगले विचार पुढे आले आहेत हे विचार विविध समाज माध्यमांतून जनतेपर्यंत पोहचावे, असे जिल्हा माहिती अधिकारी युवराज पाटील यांनी प्रास्ताविकात सांगितले.
महामित्र समृद्ध समाज घडविण्यात महत्वाची भूमिका बजावेल : कैलास शिंदे
महामित्र सोशल मीडिया संवाद सत्राचे उद्घाटन आज मुख्य कार्यकारी अधिकारी कैलास शिंदे यांच्या हस्ते झाले. यावेळी ते म्हणाले, समाज माध्यमांची भूमिका ही महत्वाची आहे. युवकांनी समाज माध्यमांचा वापर स्वत:च्या, जनतेच्या सकारात्मक कामांसाठी करावा. यामध्ये महिलांच्या हक्कासाठी, शिक्षणासाठी व प्रगत कृषी तंत्रज्ञान शेतकऱ्यांपर्यंत कसे पोहोचेल यासाठी प्रयत्न करा. महामित्रांनी समाजात चांगल्या पद्धतीन मते मांडावीत. समृद्ध समाज घडविण्यात महत्वाची भूमिका बजावेल असा विश्वासही मुख्य कार्यकारी अधिकारी कैलास शिंदे यांनी यावेळी व्यक्त केला.
या सत्राच्या उद्घाटन प्रसंगी अपर जिल्हाधिकारी साहेबराव गायकवाड, उपवनसंरक्षक अनिल अंजनकर, उपमुख्य कार्यकारी अधिकारी जावेद शेख, उपप्रादेशिक परिवहन अधिकारी संजय धायगुडे, ग्रामीण विकास यंत्रणेचे प्रकल्प संचालक नितीन थाडे, जिल्हा क्रीडा अधिकारी सुहास पाटील, एकात्मिक बाल विकास अधिकारी वृंदा शिवदे, आदी यावेळी उपस्थित होते.
चंद्रकांत पवार, सरक साळुंखे, चैतन्य नवाथे, श्रेयस काणे, समीर पवार, चंदन देशमुख, किशोर प्रमाळे, विनायक पाठकजी, दादा जगदाळे, सचिन शेवाळे यांचे या परिसंवादासाठी सहकार्य लाभले असून जिल्हा माहिती कार्यालयातील राहूल पवार, वैभव जाधव, नितीन पवार, रुपाली तारळकर, विष्णू शिंदे अर्जुन कारंडे, रमेश क्षिरसागर, अनिता काशिद, विकास मोरे यांनी या परिसंवादासाठी परिश्रम घेतले.
विरोधकांच्या रडीच्या डावाला जनता भुलणार नाही |
महायुतीचे आज सातार्यात जोरदार शक्ती प्रदर्शन |
सातारा जिल्ह्यात राम लल्लाच्या गजराने रामनवमी साजरी |
उदयनराजे यांच्या शक्तीप्रदर्शनासाठी आमदार शिवेंद्रसिंहराजे सज्ज |
सातारा जिल्ह्यात रामनवमी उत्साहात साजरी |
उष्माघातावरील उपचारासाठी सर्व शासकीय रुग्णालयांमध्ये कक्ष स्थापन |
आदर्श आचारसंहितेच्या काटेकोरपणे अंमलबजावणीस सर्वोच्च प्राधान्य : जिल्हाधिकारी डुडी |
श्रीराम नवमी निमित्त राम ध्यान मंदिरात अर्पित कथक नृत्यलयाचा कार्यक्रम |
निवृत्तीवेतनधारक/कुटुंबनिवृत्तीवेतन धारकांना आवाहन |
विविध मोबाईल अॅपच्या माध्यमातून मतदारांना सोई- सुविधा |
45- सातारा लोकसभेसाठी 6 नामनिर्देशनपत्र दाखल |
जिल्हाधिकारी कार्यालयाबाहेरुन सव्वादोन तोळ्याच्या चैनची चोरी |
महिलेला मारहाण केल्याप्रकरणी एकावर गुन्हा |
बॉम्बे रेस्टॉरंट परिसरात आढळला बेवारस मृतदेह |
लोखंडी रॉडने मारहाण केल्याप्रकरणी तिघांवर गुन्हा |
उष्माघातावरील उपचारासाठी सर्व शासकीय रुग्णालयांमध्ये कक्ष स्थापन |
आदर्श आचारसंहितेच्या काटेकोरपणे अंमलबजावणीस सर्वोच्च प्राधान्य : जिल्हाधिकारी डुडी |
श्रीराम नवमी निमित्त राम ध्यान मंदिरात अर्पित कथक नृत्यलयाचा कार्यक्रम |
निवृत्तीवेतनधारक/कुटुंबनिवृत्तीवेतन धारकांना आवाहन |
विविध मोबाईल अॅपच्या माध्यमातून मतदारांना सोई- सुविधा |
45- सातारा लोकसभेसाठी 6 नामनिर्देशनपत्र दाखल |
जिल्हाधिकारी कार्यालयाबाहेरुन सव्वादोन तोळ्याच्या चैनची चोरी |
महिलेला मारहाण केल्याप्रकरणी एकावर गुन्हा |
बॉम्बे रेस्टॉरंट परिसरात आढळला बेवारस मृतदेह |
लोखंडी रॉडने मारहाण केल्याप्रकरणी तिघांवर गुन्हा |
भाजप कार्यालयात उदयनराजे यांचे स्वागत |
माझ्यावरील आरोप हा राजकीय षडयंत्राचा भाग |
देशात समान नागरी कायदा लागू करण्यासाठी भाजप वचनबद्ध |
जिल्ह्यात cVIGIL (सी व्हिजील) वर 27, तर वोटर हेल्पलाईनवर 74 तक्रारी प्राप्त |
दिव्यांग व्यक्तिंसाठी मतदान केद्रांवर आवश्यक सोयी : याशनी नागराजन |