कराड : श्री मळाईदेवी शिक्षण संस्थेच्या कन्याशाळा मलकापूर येथे 25नोव्हेंबर रोजी नवमहाराष्ट्राचे शिल्पकार स्वर्गीय यशवंतराव चव्हाण यांची पुण्यतिथी व 26नोव्हेंबर संविधान दिन अनोख्या पध्दतीने साजरा करण्यात आला. यावेळी स्वर्गीय यशवंतराव चव्हाण साहेबांच्या प्रतिमेचे पूजन क्रीडाशिक्षक मा.जयवंत पाटील यांनी केले.यावेळी शाळेच्या मुख्याध्यापिका सौ.सुलोचना भिसे व ज्येष्ठ शिक्षिका सौ.प्रमिला शेलार यांनी यशवंत विचारांची समाजाला कशी आवश्यकता आहे हे यशवंतरावांचे चरित्र कथन करून पटवून दिले.
26 नोव्हेंबर संविधान दिनाचे औचित्य साधून सर्व विद्यार्थिनींकडून संविधानाचे पारायण करून विद्यार्थिनींना प्रास्ताविकेत सांगितलेली उद्दिष्टे व त्यांचा अर्थ समजावून सांगण्यात आला.. यावेळी इतिहासशिक्षक बाबासाहेब तपासे म्हणाले,संविधानाचे आजच्या तरूण पिढीला महत्व समजले पाहिजे.यावेळी त्यांनी संविधानाचा अर्थ व मुलभूत हक्क याची विद्यार्थिनींना माहिती दिली.
यावेळी इतिहास शिक्षक योगेश खराडे यांनी संविधान तयार होण्यामागची पार्श्वभूमी व संविधान निर्मितीतील डॉ.बाबासाहेब आंबेडकरांचे योगदान विशद केले. तसेच विद्यार्थिनींनी संविधानाद्वारे मिळालेल्या हक्कांद्वारे स्वतःच्या व समाजाच्या विकासाला हातभार लावावा व त्याद्वारे सांगितलेल्या कर्तव्याचे पालन करावे असे सांगितले.
संविधानाची विद्यार्थिनींना ओळख व्हावी व त्याचे महत्व कळावे यासाठी मराठी विभागाच्या वतीने शाळांस्तरावर वत्कृत्व व निबंध स्पर्धा घेण्यात आल्या .त्यामध्ये मुलींनी उत्स्फुर्त सहभाग घेतला. वकृत्व स्पर्धेत कु.वैष्णवी शिर्के,वैष्णवी काकडे , वैष्णवी सरगर यांनी अनुक्रमे प्रथम, द्वितीय व तृतीय क्रमांक संपादन केला. तसेच निबंध स्पर्धेत वैष्णवी कांबळे, साक्षी देसावळे व अनुष्का पवार यांनी अनुक्रमे प्रथम, द्वितीय, तृतीय क्रमांक संपादन केला. सर्व यशस्वी विद्यार्थिनींना बक्षिस देऊन गौरविण्यात आले.परीक्षक म्हणून सौ.सविता कोळी, सौ.जयश्री पाटील, सौ.करूणा शिर्के, सौ.संगिता पाटील, सौ.अरूणा कुंभार यांनी काम पाहिले. यावेळी शाळेच्या मुख्याध्यापिका सौ.सुलोचना भिसे, पर्यवेक्षक सुरेश राजे, सर्व शिक्षक, शिक्षिका व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.
श्री क्षेत्र निनाम येथील सासनकाठीला यात्रेत महत्वाचे स्थान |
मंदार कोल्हटकर, धिरज पाटील यांचे अपघाती निधन |
ट्रकच्या धडकेत दुचाकीस्वाराचा मृत्यू |
राजवाडा परिसरातून सव्वा लाखांच्या सोन्याच्या चैनची चोरी |
मारहाण प्रकरणी चौघांवर गुन्हा |
ट्रक चालकाला लुटल्याप्रकरणी तीन अज्ञातांवर गुन्हा |
महिलेचा विनयभंग केल्याप्रकरणी एकावर गुन्हा |
सराईत गुन्हेगाराने दिली तीन घरफोड्यांची कबुली |
उदयनराजे यांच्या समर्थनार्थ सातार्यात लोटला जनसागर |
शिक्षक हेच सुसंस्कृत समाजनिर्मितीचे जनक |
अजिंक्यतारा कारखान्यावर वादातून झाला गोळीबार |
जनता बँक साताराच्या तज्ज्ञ संचालकपदी सौरभ रायरीकर, राजेंद्र जाधव यांची निवड |
महिलेची गळफास घेवून आत्महत्या |
एकाच्या मृत्यूप्रकरणी कार चालकावर गुन्हा |
संशयित माल जवळ बाळगल्याप्रकरणी एकावर गुन्हा |
ट्रक चालकाला लुटल्याप्रकरणी तीन अज्ञातांवर गुन्हा |
महिलेचा विनयभंग केल्याप्रकरणी एकावर गुन्हा |
सराईत गुन्हेगाराने दिली तीन घरफोड्यांची कबुली |
उदयनराजे यांच्या समर्थनार्थ सातार्यात लोटला जनसागर |
शिक्षक हेच सुसंस्कृत समाजनिर्मितीचे जनक |
अजिंक्यतारा कारखान्यावर वादातून झाला गोळीबार |
जनता बँक साताराच्या तज्ज्ञ संचालकपदी सौरभ रायरीकर, राजेंद्र जाधव यांची निवड |
महिलेची गळफास घेवून आत्महत्या |
एकाच्या मृत्यूप्रकरणी कार चालकावर गुन्हा |
संशयित माल जवळ बाळगल्याप्रकरणी एकावर गुन्हा |
राहत्या घरातून युवती बेपत्ता |
वाई, जावळी परिसरात जोरदार अवकाळी पाऊस |
विरोधकांच्या रडीच्या डावाला जनता भुलणार नाही |
महायुतीचे आज सातार्यात जोरदार शक्ती प्रदर्शन |
सातारा जिल्ह्यात राम लल्लाच्या गजराने रामनवमी साजरी |