कराड : गॅस गळतीमुळे कराडच्या माजी उपनगराध्यक्षांच्या बुधवार पेठेतील घरात अचानक आग लागली. भरवस्तीत बुधवारी (दि.८) दुपारी लागलेल्या या आगीमुळे लाखो रुपयांचे नुकसान झाले, तर लोकांची चांगलीच पळापळ झाली. या आगीमध्ये संसार उपयोगी साहित्य जळून खाक झाले. दरम्यान, त्यानंतर काही वेळातच नदीकाठच्या कचऱ्याला आग लागल्याने एकच खळबळ उडाली. या दोन्ही घटना नगरपालिकेच्या अग्निशामक दलाने शर्थीचे प्रयत्न करून विझविल्याने पुढील मोठा अनर्थ टळला.
याबाबत घटनास्थळ व पोलिसांकडून समजलेली माहिती अशी की, बुधवारी दुपारी तीन वाजण्याच्या सुमारास कराडचे माजी उपनगराध्यक्ष संभाजी सुर्वे यांच्या घरात अचानक आग लागली. गॅस गळतीमुळे ही आग लागल्याची शक्यता वर्तवली जात आहे. भर दुपारी लागलेल्या आगीने त्वरित रौद्ररूप धारण केले. त्यामुळे घरातील लोकांनी घराबाहेर पळ काढला. आगीची माहिती मिळताच कराड नगरपालिकेच्या अग्निशमन दलाची गाडी घटनास्थळी दाखल झाली.
तोपर्यंत तेथे लोकांची गर्दी जमा झाली होती. पोलिसही घटनास्थळी दाखल झाले. अग्निशामक दलाच्या गाडीने पाण्याचे फवारे मारून आग आटोक्यात आणली. तोपर्यंत आगीने संपूर्ण घराला वेढले होते. घरातील संसारोपयोगी साहित्य, धान्य, विद्युत वाहक तारा तसेच इतरही साहित्य व मौल्यवान वस्तू जळून खाक झाल्या. या आगीमध्ये लाखो रुपयांचे नुकसान झाल्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे. आग लागल्याची माहिती मिळताच परिसरातील नागरिकांनी घटनास्थळी मोठी गर्दी केली होती. पोलिसांनी घटनास्थळी झालेल्या गर्दीला पांगवत घरीच थांबण्याचे आवाहन केले.
भर दुपारी मुख्य बाजारपेठेत लागलेल्या आगीमुळे परिसरातील नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले होते. कोरोनाच्या पार्श्वभूमीवरती लॉकडाऊन असल्याने बहुतांशी नागरिक घरीच थांबले होते. त्यामुळे वेळीच आग आटोक्यात आल्याने पुढील मोठा अनर्थ टळला.
बुधवार पेठेत लागलेली आग विझविल्यानंतर काही वेळातच कृष्णा नदीवरील पुलालगत असलेल्या कचऱ्याला अचानक आग लागली. या आगीमुळे नदीकाठच्या लोकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले होते. आगीच्या ज्वाला व धुराचे लोट बाहेर पडत असताना याबाबतची माहिती काही लोकांनी नगरपालिकेच्या अग्निशमन दलाला दिली. काही क्षणातच अग्निशामन दलाची गाडी घटनास्थळी दाखल झाली. त्यांनी पाण्याचे फवारे मारून आग आटोक्यात आणली.
कराडमध्ये बुधवारी दोन ठिकाणी घडलेल्या आगीच्या घटनेमुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले. कराड नगरपरिषदेच्या अग्निशमन दलाने भर उन्हात शर्थीचे प्रयत्न करून दोन्ही ठिकाणची आग आटोक्यात आणली. त्यांच्या या प्रयत्नाचे कराडकरांमधून समाधान व्यक्त केले जात आहे.
गंभीर गुन्हे करणार्या चौघांच्या टोळीला तडीपारीचा दणका |
बेकायदा दारु विक्रीप्रकरणी एकावर कारवाई |
आदेशाचे उल्लंघन केल्याप्रकरणी पाचजणांवर गुन्हा |
अपघातात जखमी केल्याप्रकरणी दुचाकी चालकावर गुन्हा |
वेगवेगळ्या घटनांमध्ये दोनजणी बेपत्ता |
सातारा शहरातील लल्लन टोळीवर मोक्का कारवाई |
कृष्णा खोरे महामंडळामुळे दुष्काळी भागात पाणी : उदयनराजे भोसले |
लोकसभा निवडणुकीच्या मतदानाची वेळ वाढवून मिळावी |
सूर्योदयाच्या मुहूर्तावर हनुमान जन्मोत्सव साजरा |
सणबूरच्या यात्रेत कुस्तीच्या फडात आग्या मोहोळाचा हल्ला |
उदयनराजेंच्या पत्नी दमयंतीराजेंचा काँग्रेसवर गंभीर आरोप |
वाई, जावळी तालुक्यात अवकाळी पाऊस |
अल्पवयीन मुलीवर अत्याचार करणाऱ्या युवकाला सश्रम कारावास |
उदयनराजे यांनी घेतले वाईच्या महागणपतीचे दर्शन |
तरुणांच्या भवितव्यासाठी मोदींच्या नेतृत्वाखाली स्थिर सरकार निवडून देऊया उदयनराजे यांचे आवाहन |
सातारा शहरातील लल्लन टोळीवर मोक्का कारवाई |
कृष्णा खोरे महामंडळामुळे दुष्काळी भागात पाणी : उदयनराजे भोसले |
लोकसभा निवडणुकीच्या मतदानाची वेळ वाढवून मिळावी |
सूर्योदयाच्या मुहूर्तावर हनुमान जन्मोत्सव साजरा |
सणबूरच्या यात्रेत कुस्तीच्या फडात आग्या मोहोळाचा हल्ला |
उदयनराजेंच्या पत्नी दमयंतीराजेंचा काँग्रेसवर गंभीर आरोप |
वाई, जावळी तालुक्यात अवकाळी पाऊस |
अल्पवयीन मुलीवर अत्याचार करणाऱ्या युवकाला सश्रम कारावास |
उदयनराजे यांनी घेतले वाईच्या महागणपतीचे दर्शन |
तरुणांच्या भवितव्यासाठी मोदींच्या नेतृत्वाखाली स्थिर सरकार निवडून देऊया उदयनराजे यांचे आवाहन |
पाण्याच्या मोटरची चोरी |
सिव्हिल हॉस्पिटलच्या पार्किंगमधून दुचाकीची चोरी |
चैन स्नॅचिंग प्रकरणी दोन अज्ञातांवर गुन्हा |
अपघातात जखमी केल्याप्रकरणी एकावर गुन्हा |
अवैध दारु प्रकरणी दोघांवर कारवाई |