RNI REG.NO. MAHMAR/2014/56135

What are you looking for?

Contact Us

Address:

Email:

Tel:

Sadar Bazar, Satara, Maharashtra 415001

contact@tmnnews.com

02162 237 474

What are you looking for?

×

शरद पवारांची निवडणुकीच्या रिंगणातून माघार

11 March 2019 at 18:58

माढ्यातून विद्यमान खा. विजयसिंह मोहिते पाटलांना पुन्हा संधी ?

पुणे : माढा मतदारसंघात झालेल्या बंडाळ्यांमुळे बेदिली थोपविण्यासाठी राष्ट्रवादी सुप्रिमो पुन्हा एकदा शड्डू ठोकत माढ्याच्या आखाड्यात उतरले होते. परंतु आज राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी माढा लोकसभा मतदारसंघातून निवडणूक लढविण्याबाबत कौटुंबिक कारण देत माढ्यातून लढणार नसल्याचे आज पत्रकार परिषदेत जाहीर केले. मात्र माढ्यातून कोण ? की, पुन्हा एकदा विद्यमान खा. विजयसिंह मोहिते पाटलांना पुन्हा संधी देण्याबाबत राष्ट्रवादी अनुकूल असल्याचे बोलले जात आहे. 

कालच केंद्रीय निवडणूक आयोगाने आचारसंहिता लागू करून, देशात सात टप्प्यात लोकसभेच्या निवडणुका होणार असल्याचे जाहीर केले. यापैकी महाराष्ट्रात चार टप्प्यात ११ ते २९ एप्रिल दरम्यान मतदान होणार आहे.

आज पुणे येथे झालेल्या पत्रकार परिषदेत खा. पवार म्हणाले कि, मी आतापर्यंत 14 निवडणुका जिंकल्या, एकही हरलो नाही, त्यामुळे चिंतेने निवडणूक न लढण्याचा निर्णय घेतला आहे असं समजू नका, असं यावेळी शरद पवार म्हणाले. एकाच कुटुंबातील तिघे नको, म्हणून आपण निवडणुकीत माघार घेत आहोत. सुप्रिया सुळे बारामतीतून आणि पार्थ पवार मावळमधून निवडणूक लढवतील, असं पवारांनी नमूद केलं. 

माढा लोकसभा मतदारसंघासाठी 23 एप्रिलला मतदान होणार आहे. माढ्यातून सध्या राष्ट्रवादी काँग्रेसचे  विजयसिंह मोहिते पाटील हे विद्यमान खासदार आहेत. मात्र खुद्द विजयसिंह मोहिते पाटलांनीच पवारांना माढ्यातून लढण्याची विनंती केली. त्यामुळे निवडणूक न लढण्याची घोषणा केलेल्या शरद पवारांना पुन्हा निवडणुकीच्या रणांगणात उतरावं लागलं. यंदा शरद पवार हे माढ्यातून लढणार असल्याने येथील चुरस वाढली आहे. तसेच, राज्याचंही लक्ष या मतदारसंघाकडे लागलं आहे.  स्वत: पवार लढत असलेल्या माढा लोकसभा मतदारसंघात  सातारा जिल्ह्यातील तीन विधानसभा येतात. या सर्व परिस्थितीचा आढावा शनिवारी पवारांनी घेतला होता. त्यानंतर आज पुन्हा बैठक होत आहे. तर पवारांनी 21 फेब्रुवारीला माढ्यातील पदाधिकाऱ्यांची पहिली बैठक घेतली होती. या बैठकीला राष्ट्रवादीचे माढ्याचे विद्यमान खासदार विजयसिंह मोहिते पाटील, शेतकरी कामगार पक्षाचे आमदार गणपतराव देशमुख, पंढरपूरचे काँग्रेस आमदार भारत भालके यांच्यासह पदाधिकारी उपस्थित होते. आज पुण्यात झालेल्या पत्रकार परिषदेत खा. पवारांच्या बाजूला चक्क साताऱ्याचे खासदार उदयनराजे भोसले यांनी उपस्थिती लावली होती. 

 


Hulage Ajit

पवार साहेब


छावण्यातील सोयी, दुष्काळी उपाय योजनांसाठीही आता वापरता येणार आमदार निधी

राज्यातील दुष्काळी परिस्थितीमुळे निर्माण झालेल्या परिस्थितीवर मात करण्यासाठी आमदार स्थानिक विकास निधीचा उपयोग करण्यास मान्यता देण्याचा शासन निर्णय आज राज्य शासनाने जारी केला.

23 hours before

राज्यात लोकसभा निवडणूक मतमोजणीची तयारी पूर्ण

लोकसभा निवडणूकीची मतमोजणी गुरुवार दि. 23 मे रोजी होणार असून राज्यात मतमोजणीची तयारी पूर्ण झाली आहे.

yesterday

गेवराई तालुक्यात तिहेरी अपघात

गेवराई तालुक्यातील कोळगाव येथे कार आणि स्कॉर्पिओ आणि दुचाकीच्या तिहेरी अपघातात गरोदर महिलेचा जळून अक्षरश: कोळसा झाला आहे. कल्याण- विशाखापट्टणम या राष्ट्रीय महामार्ग क्र. 222 वर मंगळवारी 11 वाजेच्या सुमारास हा भीषण अपघात झाला.

21 May 2019 at 19:39

ICC World Cup 2019 | विश्वचषक विजेत्या संघाला आजवरचं सर्वोच्च इनाम

आयसीसी क्रिकेट विश्वचषकाचं काऊण्टडाऊन सुरु झाल्यामुळे चाहत्यांची उत्सुकता शिगेला पोहचली आहे. विजेतेपदाचा चषक उंचावणाऱ्या संघावर बक्षिसांची खैरात होणार, हे साहजिकच. विश्वविजेत्याला यंदा किती रुपयाचं इनाम मिळणार याची माहिती समोर आली आहे.

21 May 2019 at 16:17