RNI REG.NO. MAHMAR/2014/56135

What are you looking for?

Contact Us

Address:

Email:

Tel:

Sadar Bazar, Satara, Maharashtra 415001

contact@tmnnews.com

02162 237 474

What are you looking for?

×

अजित पवारांवर गुन्हा दखल करा

23 August 2019 at 14:38

उच्च न्यायालयाचे मुंबई पोलिसांना आदेश; पन्नासहून अधिक राजकीय नेते अडचणीत

मुंबई : महाराष्ट्र राज्य सहकारी बँकेत (एमएससी बँक) कर्जांच्या वितरणात हजारो कोटी रुपयांचा घोटा‌ळा झाल्याप्रकरणी पाच दिवसांच्या आत एफआयआर नोंदवून पुढील कायदेशीर कार्यवाही करण्याचे आदेश मुंबई उच्च न्यायालयाने गुरुवारी मुंबई पोलिसांच्या आर्थिक गुन्हे शाखेला दिले. त्यामुळे बँकेच्या तत्कालीन संचालक मंडळांमध्ये असलेले राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार, शिवसेनेचे आनंदराव अडसूळ, तत्कालीन राष्ट्रवादीचे व सध्या भाजपमध्ये असलेले विजयसिंह मोहिते-पाटील यांच्यासह पन्नासहून अधिक राजकीय नेते अडचणीत आले आहेत. 

उच्च न्यायालयाच्या या आदेशामुळे राज्याची शिखर सहकारी बँक म्हणून ओळखल्या जाणाऱ्या एमएससी बँकेतील गैरव्यवहारांचा प्रश्न जवळपास दहा वर्षांनंतर पुन्हा एकदा चर्चेत आला आहे. 

या बँकेतील संचालक मंडळाने तसेच कर्जमंजुरी समितीने अनेक सहकारी साखर कारखाने, सूत गिरण्या आणि संचालकांचे हितसंबंध असलेल्या कंपन्यांना नियमबाह्य व सवलतीच्या दरात कर्जांचे वितरण केले. अशा कर्जांची परतफेड न झाल्याने बँक डबघाईस आली आणि सरकारी तिजोरीचे मोठे नुकसान झाले, असे 'नाबार्ड'ने सन २०११मध्ये केलेल्या ऑडिटमधून स्पष्ट झाले होते. त्यामुळे रिझर्व्ह बँकेला एमएससी बँकेवर प्रशासक नेमण्याचा आदेश काढावा लागला होता. या प्रकरणी राज्य सरकारच्या सहकार विभागाने महाराष्ट्र सहकारी संस्था कायद्यातील कलम ८८ अन्वये बँकेच्या तत्कालीन संचालक मंडळातील संचालकांवर सप्टेंबर-२०१५मध्ये आरोपपत्र ठेवले होते. यासंदर्भात फौजदारी कारवाई करण्यासाठी काहींनी पोलिसांत तक्रारही दिली होती. तरीही कोणतीच कारवाई होत नसल्याचे पाहून सामाजिक कार्यकर्ते सुरिंदर अरोरा यांनी ज्येष्ठ वकील सतीश तळेकर यांच्यामार्फत सन २०१५मध्ये उच्च न्यायालयात फौजदारी जनहित याचिका केली होती. त्यावर न्यायालयाने गुरुवारी ८४ पानी निकाल दिला. 

न्यायालयाची निरीक्षणे 

-'नाबार्डचा तपासणी अहवाल असूनही आणि तो अहवाल बँक कर्मचाऱ्यांच्या जबाबांवर व दस्तावेजांवर आधारित असूनही तपास अधिकाऱ्याने त्याची चाचपणी करण्याची तसदी घेतली नाही. 

-प्राथमिक चौकशी काय केली याचा कोणताही तपशील न देता संशय वाटण्याजोगी कारणे नसल्याचा निष्कर्ष या अधिकाऱ्याने मांडला. कायद्याला आणि सर्वोच्च न्यायालयाने घालून दिलेल्या तत्त्वाला हे अभिप्रेत नाही. 

-नाबार्डच्या अहवालातील गंभीर निष्कर्ष आणि अन्य महत्त्वाची माहिती लक्षात घेता प्रथमदर्शनी भारतीय दंड संहिता तसेच, अन्य कायद्यांतर्गत दखलपात्र गुन्हे घडले असल्याचे आमचे मत आहे.

उदयनराजेंची पगडी नरेंद्र मोदींच्या डोक्यावर

राष्ट्रवादीचे माजी खासदार उदयनराजे भोसले यांनी नुकताच भाजप प्रवेश केलेला आहे. परवा दिल्लीत अमित शहांच्या उपस्थितीत उदयनराजेंनी आपल्या लोकसभा सदस्यत्वाचा राजीनामा देवून भाजपात प्रवेश केला.

22 hours before

डॉ भरत वाटवाणी यांना यंदाचा जीवन गौरव पुरस्कार

मनोदय मेंटल हेल्थ फोरम, कर्वे समाज सेवा संस्था पुणे च्या वतीने मानसिक आरोग्य क्षेत्रामध्ये उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या व्यक्तीस देण्यात येणारा यावर्षीचा प्रतिष्ठेचा जीवन गौरव पुरस्कार २०१९ हा प्रथितयश मनोविकार तज्ञ व रस्त्यावर फिरणाऱ्या मनोरुग्णांच्य

11 September 2019 at 03:01