04:27pm | Apr 06, 2020 |
सातारा : कॅलिफोर्निया (अमेरिका) येथून आलेल्या कोरोना बाधित रुग्णाचा आज पहाटे मृत्यू झाला. कालच या रुग्णाचा चौदाव्या दिवसाचा रिपोर्ट निगेटिव्ह आला होता. असे असताना त्या रुग्णाच्या मृत्यूमुळे जिल्ह्यात खळबळ उडाली आहे. दरम्यान त्या रुग्णाचा मृत्यू प्राथमिक अंदाजानुसार हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने झाला असल्याची माहिती सातारा जिल्हाधिकारी शेखर सिंह यांनी दिली आहे.
याबाबत माहिती अशी की, सुमारे 14 दिवसांपूर्वी कॅलिफोर्निया (अमेरिका) येथून आलेल्या वृद्ध दांम्पत्याला कोरोना अनुमानित म्हणून जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. दरम्यान, पुणे येथील या दाम्पत्याच्या घशाच्या स्त्रावाच्या नमुन्याची तपासणी केल्यानंतर त्या वृद्ध दाम्पत्यापैकी 63 वर्षीय पुरुषाची चाचणी पॉझिटिव्ह आली होती. जिल्ह्यातील पहिलाच कोरोना बाधित रुग्ण सापडल्यामुळे खळबळ उडाली होती. काल 14 व्या दिवशी या रुग्णाची चाचणी निगेटिव्ह आली होती. त्यामुळे प्रशासनासह आरोग्य कर्मचारी व जिल्ह्यातील नागरिकांमधूनही समाधान व्यक्त केले जात होते. मात्र हा आनंद फार काळ टिकला नाही. आज पहाटे हा रुग्ण आयसोलेशन वॉर्डातच असणार्या स्वच्छतागृहाकडे निघाला असतानाच अचानक खाली पडला. वैद्यकीय सूत्रांनी त्याची तपासणी केल्यानंतर त्याला मृत घोषित करण्यात आले. आज सकाळीच जिल्हाधिकार्यांनी या रुग्णाच्या बाबतीत माहिती देण्याअगोदरच ही बातमी प्रसारमाध्यमांमध्ये लीक झाली. त्यानंतर कोरोना बाधिताच्या मृत्यूमुळे जिल्हाभरात खळबळ उडाली. त्यानंतर अनेकांनी याबाबत जिल्हाधिकार्यांना खुलासा करण्याची मागणी केली. आज दुपारी साडेबाराच्या दरम्यान, सातारा जिल्हाधिकारी शेखर सिंह यांनी मृत्यूचे कारण स्पष्ट केले असून प्राथमिक अंदाजानुसार या रुग्णाचा मृत्यू हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने झाला असल्याचे जाहीर केले आहे. मात्र, आज संध्याकाळपर्यंत पंधराव्या दिवसाचा चाचणी रिपोर्ट येणार आहे. त्यानंतरच मृत्यूचे खरे कारण समोर येणार असल्याची माहिती जिल्हाधिकारी शेखर सिंह यांनी दिली आहे.
सातारा पोलीस मुख्यालयात उपनिरीक्षकाला धमकी |
बिग बॉस फेम अभिजीत बिचुकले यांचा अर्ज दाखल |
महाविकास आघाडीच्या उमेदवाराचा पूर्ण ताकतीने प्रचार करणार |
माढयात अभय जगताप यांचे बंड शमले |
सातारा लोकसभा प्रबंधन समितीचे कार्य उत्कृष्ठ |
उदयनराजे भोसले यांची संपत्ती 251 कोटीची |
वादळी वाऱ्यात स्पीड बोट उलटून एकाचा मृत्यू |
निवडणूक स्थिर सर्वेक्षण पथकातील कर्मचाऱ्याला पोलिसाकडून मारहाण |
येणके येथील कुंभार वस्तीतील जल जीवन मिशनअंतर्गतचे काम प्रगतीपथावर |
निवडणुक निरिक्षक आर. अर्जुन व पोलिस निवडणुक निरिक्षक प्रदीप शर्मा यांचे जिल्ह्यात आगमन |
उदयनराजेंना विक्रमी मताधिक्याने निवडून आणण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करणार |
श्री क्षेत्र निनाम येथील सासनकाठीला यात्रेत महत्वाचे स्थान |
मंदार कोल्हटकर, धिरज पाटील यांचे अपघाती निधन |
ट्रकच्या धडकेत दुचाकीस्वाराचा मृत्यू |
राजवाडा परिसरातून सव्वा लाखांच्या सोन्याच्या चैनची चोरी |

मारहाण प्रकरणी चौघांवर गुन्हा |
ट्रक चालकाला लुटल्याप्रकरणी तीन अज्ञातांवर गुन्हा |
महिलेचा विनयभंग केल्याप्रकरणी एकावर गुन्हा |
सराईत गुन्हेगाराने दिली तीन घरफोड्यांची कबुली |
उदयनराजे यांच्या समर्थनार्थ सातार्यात लोटला जनसागर |