02:36am | Dec 07, 2019 |
कराड : आगाशिवनगर (ता.कराड) येथे एकाच रात्रीत अज्ञात चोरट्यांनी तीन बंद फ्लॅट फोडून रोख रक्कमेसह तीन तोळ्याचे दागिने लंपास केले आहेत. ही घटना आज (शुक्रवारी) पहाटे उघडकीस आली.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, आगाशिवनगर येथील अलंकापुरी कॉलनीमध्ये गरुड दाम्पत्य राहण्यास आहेत. सौ. गरूड यांच्या पतीची तब्येत ठीक नसल्याने त्या बुधवारी पुणे येथे गेल्या होत्या. दरम्यान, गुरूवारी रात्री अज्ञात चोरट्याने त्यांचा बंद फ्लॅट फोडला. ही घटना आज (शुक्रवारी) सकाळी सहा वाजता उघडकीस आली. त्यांच्या शेजारी राहणार्या पूजा अमरदीप करपे यांनी फोन करून घराचे दरवाजे उघडे असल्याची माहिती दिली. त्यामुळे सौ.गरूड या तात्काळ पुणे येथून घरी येऊन पाहिले असता, बेडरूममधील लाकडी कपाट उघडे दिसले. त्यामधील साहित्य अस्ताव्यस्त पडल्याचे दिसून आले. कपाटातील ड्राव्हरच्या आत ठेवलेले वीस हजार रुपये किमतीचे एक टोळ्यांची चैन, 30 हजार रुपये किमतीची दीड तोळ्याच्या सोन्याच्या अंगठ्या, 25 हजार रुपये किमतीचे कानातील टॉप्स व पाच हजार रोख रक्कम असा सुमारे 80 हजार रुपयांचा ऐवज अज्ञात चोरट्यांनी लंपास केल्याचे त्यांच्या निदर्शनास आले.
तसेच त्यांच्या शेजारील अपार्टमेंटमधील संदीप पाटील यांचा बंद फ्लॅटही चोरट्यांनी फोडला परंतु पोलिसांनी त्यांना संपर्क साधून याबाबत माहिती दिल्यावर पाटील यांनी घरी येऊन पाहिले असता घरातील काहीही चोरीस गेले नसल्याचे समोर आले. तसेच पंचरत्न सोसायटीतील शांताराम मोरे यांचा बंद फ्लॅटही चोरट्यांनी टार्गेट केल्याचे दिसून आले.
दरम्यान, चोरट्यांनी आगाशिवनगर येथील भरवस्तीत घातलेल्या धुमाकूळामुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे. एकाच रात्री तीन बंद फ्लॅट चोरट्यांनी फोडले आहेत. हे चोरटे पंचरत्न अपार्टमेंट येथे असणार्या सीसीटीव्ही मध्ये कैद झाले आहेत. पोलिसांनी घटनास्थळी तातडीने श्वान पथक व ठसे तज्ज्ञांना पाचारण केले होते. या घटनेची नोंद कराड शहर पोलिसात झाली आहे.
एकास मारहाण केल्याप्रकरणी पाच जणांवर गुन्हा |
सातार्यातून युवक बेपत्ता |
नागठाण्यात युवकाची आत्महत्या |
उदयनराजे यांना मतदान करून गादीचा सन्मान ठेवा |
जपानचे स्लिम लँडर तिसऱ्यांदा जागृत |
कोल्हापुरातील अंबाबाईच्या रथोत्सव |
छत्रपतींच्या वंशजांना जावळीचा स्वाभिमान सांगू नका |
माझ्याकडे विरोधकांच्या अनेक भानगडी |
महाभकास आघाडीला निवडणुकीत जागा दाखवा |
साताऱ्यात मेघगर्जनेसह बरसल्या पावसाच्या सरी |
जनता बँकेत पुर्नगठीत बोर्ड ऑफ मॅनेजमेंटच्या चेअरमनपदी विनोद कुलकर्णी |
बोंडारवाडीसह धरणांची कामे मार्गी लावणार उदयनराजेंचे आश्वासन |
दलित महासंघ,पॅंथरचा उदयनराजेंना जाहीर पाठींबा |
सातारकरांना बाहेरच्यांनी स्वाभिमान शिकवू नये |
साताऱ्यात कोट्यावधीची कामे हीच आपली जमेची बाजू |
कोल्हापुरातील अंबाबाईच्या रथोत्सव |
छत्रपतींच्या वंशजांना जावळीचा स्वाभिमान सांगू नका |
माझ्याकडे विरोधकांच्या अनेक भानगडी |
महाभकास आघाडीला निवडणुकीत जागा दाखवा |
साताऱ्यात मेघगर्जनेसह बरसल्या पावसाच्या सरी |
जनता बँकेत पुर्नगठीत बोर्ड ऑफ मॅनेजमेंटच्या चेअरमनपदी विनोद कुलकर्णी |
बोंडारवाडीसह धरणांची कामे मार्गी लावणार उदयनराजेंचे आश्वासन |
दलित महासंघ,पॅंथरचा उदयनराजेंना जाहीर पाठींबा |
सातारकरांना बाहेरच्यांनी स्वाभिमान शिकवू नये |
साताऱ्यात कोट्यावधीची कामे हीच आपली जमेची बाजू |
जुगार प्रकरणी एकावर कारवाई |
नोकरीच्या अमिषाने सुमारे पावणे सहा लाखांची फसवणूक |
शहरातील दोन वेगवेगळ्या घटनांमध्ये दोनजण बेपत्ता |
विवाहितेला आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी पती विरुध्द गुन्हा |
शाहूनगर येथे घरफोडी |