सातारा : वडूज, दहिवडी, सातारा तालुका, राजगड (जि. पुणे) येथील विविध पोलीस ठाण्यांमध्ये रोड रॉबरी, चोरी, घरफोडी, दरोडा, मारामारी, खुनाचा प्रयत्न यांसारखे गंभीर गुन्हे दाखल असलेल्या बाळू गिरजाप्पा जाधव, विशाल कैलास पाटोळे व विशाल अशोक मदने या अट्टल गुन्हेगारांवर कोल्हापूर परिक्षेत्राचे पोलीस महानिरीक्षक विश्वास नांगरे पाटील यांनी मोक्कान्वये कारवाई केल्याची माहिती जिल्हा पोलीस अधीक्षक संदीप पाटील यांनी पत्रकाद्वारे दिली आहे.
जिल्ह्यात सध्या पोलीस अधीक्षक संदीप पाटील यांच्या मोक्कास्त्रामुळे गुंडापूंडांची पुंगी टाईट झाली असतानाच आज कोल्हापूर परिक्षेत्राचे पोलीस महानिरीक्षक विश्वास नांगरे पाटील यांनी बाळे गिरजाप्पा जाधव रा. महिमानगड, ता. माण, विशाल कैलास पाटोळे रा. औंध, ता. खटाव व विशाल अशोक मदने रा. महिमानगड, ता. माण या तिघांनी मिळून दि. 21 मे 2018 रोजी दुपारी दीड वाजण्याच्या सुमारास औंध येथील यमाई देवीच्या मंदिराच्या पायर्यांवर एका जोडप्यावर नाव-गाव विचारुन हल्ला केला होता. यावेळी तिघाही आरोपींनी या जोडप्याला लाकडी दांडक्याने मारहाण केली होती व रोख 5050 आणि 14500 रुपये किंमतीचा मोबाईल हिसकावून चोरुन नेला होता. या आरोपींची माहिती काढली असता त्यांनी यापूर्वीही अनेकठिकाणी अशाच प्रकारचे उद्योग केल्याचे समोर आले होते. संबंधित आरोपींच्या विरोधात वडूज, दहिवडी, सातारा तालुका, राजगड (जि. पुणे) येथील पोलीस ठाण्यांमध्ये विविध प्रकारचे गंभीर गुन्हे दाखल असल्याचे निदर्शनास आले होते. त्यानुसार पोलीस अधीक्षक संदीप पाटील यांनी बाळू जाधव टोळीवर मोक्क्याचा प्रस्ताव कोल्हापूर परिक्षेत्राचे पोलीस महानिरीक्षक विश्वास नांगरे पाटील यांच्याकडे पाठविला होता. त्यानुसार आज बाळू जाधव टोळीवर मोक्कान्वये कारवाई झाल्याची माहिती पोलीस अधीक्षक संदीप पाटील यांनी पत्रकाद्वारे दिली आहे.
शाहूपुरी पोलिस ठाण्याच्या हद्दीत आढळला अनोळखी पुरुषाचा मृतदेह |
सातारा शहरातून दोनजणी बेपत्ता |
डॉ आंबेडकर जयंती समारोह अध्यक्षपदी संजय गाडे यांची निवड |
शरद पवारांच्या डावपेचाकडे महाराष्ट्राचे लक्ष |
कराडला रविवारी इंडिया आघाडीचा मेळावा |
पश्चिम महाराष्ट्रात दि. २९ ते ३१ पर्यंत महावितरणचे वीजबिल भरणा केंद्र सुरू |
करंजे पेठतील थकबाकीदाराची पालिकेकडून मालमत्ता केली सील |
साताऱ्यात लोकसभेबाबत शुक्रवारी शरद पवारांची बैठक |
जमिनीच्या वादातून धारदार शस्त्राने एकाचा खून |
लोकसभा सार्वत्रिक निवडणूक-2024 |
कोल्हापूरला निघालेली खासगी ट्रॅव्हल्स झाली पलटी |
पुण्यातील पीएमटीच्या बसचालकाची सोनगाव येथे आत्महत्या |
झाड मारल्याप्रकरणी सातार्यात दोन गुन्हे दाखल |
अदानी ग्रुपचा वीज प्रकल्प रद्द करण्याठी प्रकल्पग्रस्त जिल्हाधिकारी कार्यालयावर काढणार मोर्चा |
प्रतापसिंह नगरात अतिक्रमणांसह लल्लन आणि युवराजच्या दहशतीवर जिल्हा प्रशासनाचा बुलडोझर |

पाच नॅशनल पुरस्कार मिळवून श्लोक घोरपडे कोल्हापूर येथील स्पर्धेत मारणार बाजी |
'आयडियल' मतदारसंघाचे 'आयडॉल' आमदार |
आचारसंहिता काळात लोकशाही दिनाचे आयोजन होणार नाही : नागेश पाटील |
पोक्सोंतर्गत एकावर गुन्हा |
कुऱ्हाडीने वार केल्या प्रकरणी एकावर गुन्हा |