02:58am | Feb 18, 2020 |
सातारा : अनाधिकृत व्यापार्यांच्या विरोधात सातारा जिल्हा प्रशासनाला तब्बल सात वेळा निवेदन सादर करूनही काहीच कारवाई न झाल्याने कॉंग्रेस महिला आघाडीच्या सुषमा राजे घोरपडे यांनी बाजार समिती लगतच्या रस्त्यावर ठाण मांडून भाजी विक्री करत प्रशासनाचा निषेध केला. बाजार समितीच्या बाहेर रस्त्यावर मंडई भरवणार्या विक्रेत्यांना परवानगी देण्यात येऊ नये त्यासाठी कायम स्वरूपी उपाय योजना करण्याचे निवेदन राजे घोरपडे यांच्या वतीने जिल्हाधिकारी शेखर सिंह यांना सादर करण्यात आले.
दरम्यान रास्ता रोको केल्याप्रकरणी राजे घोरपडे व त्यांच्या सहकार्यांवर शाहु पुरी पोलिसांनी कारवाई केली. जोपर्यंत प्रशासन अनधिकृत मंडईवर ठोस कारवाई करत नाही तोपर्यंत आमचा लढा अविरतपणे चालूचं राहीलं अशा इशारा सुषमा राजेघोरपडे यांनी दिला.
सातारा बाजार समिती कार्यालयासमोर पहाटेपासून सायंकाळ पर्यंत राधिका रस्ता ते बसस्थानक रस्ता यादरम्यान अनाधिकृत भाजीविक्रेते भाजी विक्री करत असतात. त्यामुळे त्या रस्त्यांवरील वाहतुकीला अडथळा निर्माण होऊन लोकांच्या जीवालाही धोका निर्माण झाला आहे. या अनाधिकृत व्यापार्यांच्या विरोधात आम्ही सर्व शेतकरी व अधिकृत व्यापार्यांनी नगरपालिका, सार्वजनिक बांधकाम विभाग, पोलीस प्रशासन यांच्याकडे अनेकदा तक्रार केली आहे. मात्र त्याविरोधात कोणत्याही प्रकारची ठोस उपाययोजना संबंधित विभागांनी केलेली नाही. अशी तक्रार करत कॉंग्रेस महिला आघाडी उपाध्यक्षा सुषमा राजे घोरपडे व महिला आंदोलकांनी बाजार समितीकडून स्टँन्डला जाणार्या रस्त्यावर ठाणं मांडून आंदोलनाचा पवित्रा घेतल्याने पोलिसांची धावपळ झाली. दरम्यान दुसर्या बाजूने वाहतूक पोलिसांनी सातारा एसटी स्टँन्ड ते आयआरके सिनेमा लगतची दुतर्फा अतिक्रमणे हटवण्याची मोहिम सुरू झाली. सहाय्यक पोलीस अधीक्षक समीर शेख या मोहिमेवर लक्ष ठेऊन होते. अचानक ठिय्या आंदोलन झाल्याने पोलिसांची धावपळ झाली. आंदोलकांना पोलिसांनी ताब्यात घेऊन रस्ता मोकळा केला.
या संदर्भात सुषमा राजे घोरपडे यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी सांगितले की आम्ही सर्व शेतकरी व अधिकृत व्यापार्यांनी मिळून जिल्हाधिकार्यांना त्यांच्यासोबत फुटपाथवर व रस्त्यावर बसून भाजीविक्री करण्यास मिळावी यासाठी निवेदन दिले होते. त्यानुसार आम्ही आज बाजार समिती कार्यालयासमोर त्यांच्यासोबत भाजीविक्री करत होतो. मात्र तेथे (अनाधिकृत व्यापारी) व (शेतकरी आणि अधिकृत व्यापारी) यांच्यात संघर्ष झाला. त्यात काही शेतकरी व व्यापार्यांना शाहुपुरी पोलीस ठाणे यांनी पकडून पोलीस ठाण्यात नेले. तेथे त्यांच्यावर गुन्हे दाखल करण्यात आले. आज गुन्हे दाखल झाले असले तरीही आम्ही सर्व शेतकरी व व्यापारी, जोपर्यंत अनाधिकृत व्यापारी तेथे बसणे बंद करत नाहीत तोपर्यंत तिथे दररोज सकाळी 7 ते 10 या वेळेत त्यांच्यात सामील होऊन त्यांच्यासोबत भाजीविक्री करू, असे रितसर निवेदन आम्ही आज सातारा जिल्हाधिकारी यांना दिले आहे. आमचे आंदोलन सुरूच राहणार असल्याचा इशारा त्यांनी दिला.
शाहूपुरी पोलिस ठाण्याच्या हद्दीत आढळला अनोळखी पुरुषाचा मृतदेह |
सातारा शहरातून दोनजणी बेपत्ता |
डॉ आंबेडकर जयंती समारोह अध्यक्षपदी संजय गाडे यांची निवड |
शरद पवारांच्या डावपेचाकडे महाराष्ट्राचे लक्ष |
कराडला रविवारी इंडिया आघाडीचा मेळावा |
पश्चिम महाराष्ट्रात दि. २९ ते ३१ पर्यंत महावितरणचे वीजबिल भरणा केंद्र सुरू |
करंजे पेठतील थकबाकीदाराची पालिकेकडून मालमत्ता केली सील |
साताऱ्यात लोकसभेबाबत शुक्रवारी शरद पवारांची बैठक |
जमिनीच्या वादातून धारदार शस्त्राने एकाचा खून |
लोकसभा सार्वत्रिक निवडणूक-2024 |
कोल्हापूरला निघालेली खासगी ट्रॅव्हल्स झाली पलटी |
पुण्यातील पीएमटीच्या बसचालकाची सोनगाव येथे आत्महत्या |
झाड मारल्याप्रकरणी सातार्यात दोन गुन्हे दाखल |
अदानी ग्रुपचा वीज प्रकल्प रद्द करण्याठी प्रकल्पग्रस्त जिल्हाधिकारी कार्यालयावर काढणार मोर्चा |
प्रतापसिंह नगरात अतिक्रमणांसह लल्लन आणि युवराजच्या दहशतीवर जिल्हा प्रशासनाचा बुलडोझर |
पश्चिम महाराष्ट्रात दि. २९ ते ३१ पर्यंत महावितरणचे वीजबिल भरणा केंद्र सुरू |
करंजे पेठतील थकबाकीदाराची पालिकेकडून मालमत्ता केली सील |
साताऱ्यात लोकसभेबाबत शुक्रवारी शरद पवारांची बैठक |
जमिनीच्या वादातून धारदार शस्त्राने एकाचा खून |
लोकसभा सार्वत्रिक निवडणूक-2024 |
कोल्हापूरला निघालेली खासगी ट्रॅव्हल्स झाली पलटी |
पुण्यातील पीएमटीच्या बसचालकाची सोनगाव येथे आत्महत्या |
झाड मारल्याप्रकरणी सातार्यात दोन गुन्हे दाखल |
अदानी ग्रुपचा वीज प्रकल्प रद्द करण्याठी प्रकल्पग्रस्त जिल्हाधिकारी कार्यालयावर काढणार मोर्चा |
प्रतापसिंह नगरात अतिक्रमणांसह लल्लन आणि युवराजच्या दहशतीवर जिल्हा प्रशासनाचा बुलडोझर |
पाच नॅशनल पुरस्कार मिळवून श्लोक घोरपडे कोल्हापूर येथील स्पर्धेत मारणार बाजी |
'आयडियल' मतदारसंघाचे 'आयडॉल' आमदार |
आचारसंहिता काळात लोकशाही दिनाचे आयोजन होणार नाही : नागेश पाटील |
पोक्सोंतर्गत एकावर गुन्हा |
कुऱ्हाडीने वार केल्या प्रकरणी एकावर गुन्हा |