03:40pm | Apr 23, 2018 |
सातारा : सातारा जिल्हा मध्यवर्ती कारागृह वर्ग 2 (जेल) येथे संशयित आरोपी संजय नामदेव जाधव (वय 39, रा.मु. पिंपळवाडी पो.धावडशी ता.सातारा) याच्याकडे मोबाईल सापडला असल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. संशयित आरोपी हा शौचालयात मोबाईलवर बोलत असताना पोलिसाच्या लक्षात आल्यानंतर त्याची पोलखोल झाली असून याप्रकरणी शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. मात्र कारागृहात मोबाईल कसा गेला, याबाबत तपास होण्याची आवश्यकता आहे,
याबाबत प्राथमिक माहिती अशी, सातारचे मध्यवर्ती कारागृह हे शहर पोलिस ठाण्यालगतच आहे. रविवारी या कारागृहात पोलिस हवालदार दत्तात्रय चव्हाण हे कार्यरत होते. जेलमधील स्वच्छतागृहाकडे गेल्यानंतर त्यांना दोन व्यक्ती बोलत असल्याचे निदर्शनास आले. संबंधित संभाषण कुठे सुरु आहे? हे पाहण्याचा पोलिसाने प्रयत्न केला असता संशयित आरोपी संजय जाधव हा फोनवर बोलत होता. या घटनेची माहिती वरिष्ठांना दिल्यानंतर जाधव याची झाडाझडती घेतली असता त्याच्या मोबाईल त्यामध्ये सीमकार्ड, बॅटरी व मोबाईल चार्जरही आढळला. संशयिताकडे पोलिसांनी चौकशी केली असता त्याच्या मुलाने चार दिवसांपूर्वी भेटायला आल्यानंतर भिंतीवरुन मोबाईल टाकल्यानंतर तो घेतला असल्याचा जबाब संशयिताने दिला आहे. या सर्व प्रकारामुळे कारागृहात एकच खळबळ उडाली आहे. अनधिकृतरीत्या मोबाईल सापडल्याने कारागृह पोलिसांनी सातारा शहर पोलिस ठाण्यात धाव घेतली व कारागृह पोलिस हवालदार दत्तात्रय चव्हाण यांनी तक्रार दिली.
दरम्यान, मोबाईल भिंतीवरुन टाकणे, चार दिवस संशयित आरोपी मोबाईल वापरणे यामुळे कारागृहाची सुरक्षितता धोक्यात आली असून सीसीटीव्हीमध्ये याबाबत कशा काय कैद झाल्या नाहीत? अशी चर्चा सुरु झाली आहे.
शाहूपुरी पोलिस ठाण्याच्या हद्दीत आढळला अनोळखी पुरुषाचा मृतदेह |
सातारा शहरातून दोनजणी बेपत्ता |
डॉ आंबेडकर जयंती समारोह अध्यक्षपदी संजय गाडे यांची निवड |
शरद पवारांच्या डावपेचाकडे महाराष्ट्राचे लक्ष |
कराडला रविवारी इंडिया आघाडीचा मेळावा |
पश्चिम महाराष्ट्रात दि. २९ ते ३१ पर्यंत महावितरणचे वीजबिल भरणा केंद्र सुरू |
करंजे पेठतील थकबाकीदाराची पालिकेकडून मालमत्ता केली सील |
साताऱ्यात लोकसभेबाबत शुक्रवारी शरद पवारांची बैठक |
जमिनीच्या वादातून धारदार शस्त्राने एकाचा खून |
लोकसभा सार्वत्रिक निवडणूक-2024 |
कोल्हापूरला निघालेली खासगी ट्रॅव्हल्स झाली पलटी |
पुण्यातील पीएमटीच्या बसचालकाची सोनगाव येथे आत्महत्या |
झाड मारल्याप्रकरणी सातार्यात दोन गुन्हे दाखल |
अदानी ग्रुपचा वीज प्रकल्प रद्द करण्याठी प्रकल्पग्रस्त जिल्हाधिकारी कार्यालयावर काढणार मोर्चा |
प्रतापसिंह नगरात अतिक्रमणांसह लल्लन आणि युवराजच्या दहशतीवर जिल्हा प्रशासनाचा बुलडोझर |

पाच नॅशनल पुरस्कार मिळवून श्लोक घोरपडे कोल्हापूर येथील स्पर्धेत मारणार बाजी |
'आयडियल' मतदारसंघाचे 'आयडॉल' आमदार |
आचारसंहिता काळात लोकशाही दिनाचे आयोजन होणार नाही : नागेश पाटील |
पोक्सोंतर्गत एकावर गुन्हा |
कुऱ्हाडीने वार केल्या प्रकरणी एकावर गुन्हा |