सातारा : वैद्यकीय औषधे विकण्याचा परवाना नसतानाही गर्भपातासाठी आवश्यक असणार्या गोळ्या आणि त्याच्या किटचा साठा कोंडवे ता.सातारा सापडल्याप्रकरणात स्थानिक गुन्हे अन्वेषन विभागाने प्रवीण उर्फ बाळासाहेब तुकाराम देशमुख (वय 39, रा.मंगळवार) याला अटक केली असून न्यायालयात हजर केले असता त्याला 2 तारखेपर्यंत पोलिस कोठडी मिळाली आहे.
गेल्या आठवड्यात दि. 23 रोजी विजय प्रकाश संकपाळ, अमिर महमूद खान (दोघे हिरापूर, कोंडवे), प्रशांत नामदेव शिंदे (रा.अंबेदरे रोड) व विलास पांडूरंग देशमुख (मलकापूर ता.कराड) या चौघांवर बेकायदा गर्भपात औषधाचा साठा केल्याप्रकरणी सातारा तालुका पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. अन्न व औषध प्रशासनाच्या पथकाने कोंडवे येथे छापा टाकल्यानंतर हा पर्दाफाश झाला. याठिकाणी एमटीपी किटसह गोळ्यांचा साठा सापडल्याने खळबळ उडाली.
स्त्री भ्रूण हत्या, गर्भलिंग निदानाबाबत गंभीर कायदे असतानाही त्याबाबतच्या गोळ्या, किट सापडल्यानंतरही कारवाईचे घोडे अडकल्याने सातारा तालुका पोलिस ठाणे व अन्न, औषध विभाग संशयाच्या भोवर्यात सापडले. अन्न व औषध विभागाने कारवाई केल्यानंतर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यासाठी ते आठ दिवस हेलपाटे मारत होते. याच दरम्यान, गुन्हा दाखल झालेल्या चौघांना तालुका पोलिस ठाण्यात नेण्यात आले होते मात्र पोलिसांनी संशयितांना चक्क सोडून दिले असल्याची चर्चा आहे.
तालुका पोलिसांच्या या कामगिरीचा बभ्रा झाल्यानंतर अखेर हे प्रकरण स्थानिक गुन्हे अन्वेषन विभागाकडे वर्ग करण्यात आले. बुधवारी या प्रकरणाचा तपास आल्यानंतर एलसीबीचे फौजदार प्रसन्न जर्हाड यांनी तपासाची चक्रे गतीमान केली. तपासामध्ये प्रवीण उर्फ बाळासाहेब देशमुख याचे नाव समोर आल्यानंतर पोलिसांनी त्याला गुरुवारी ताब्यात घेतले. प्रवीण देशमुख हा सातार्यातील मेडीकलमध्ये कामाला असल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. प्राथमिक चौकशी केल्यानंतर त्याला रात्रीच अटक करुन शुक्रवारी सकाळी सातारा जिल्हा न्यायालयात हजर केले. यावेळी पोलिसांचा युक्तिवाद ग्राह्य धरुन न्यायाधिशांनी संशयिताला दि. 2 एप्रिलपर्यंत पोलिस कोठडी दिली.
सुरुवातीला ज्या चौघांवर गुन्हा दाखल झाला आहे ते संशयित पसार असून पोलिस त्यांचा शोध घेत आहेत. यामुळे या साखळीत आणखी कोणा कोणाचा समावेश आहे? हे येत्या दिवसात स्पष्ट होणार आहे.
शाहूपुरी पोलिस ठाण्याच्या हद्दीत आढळला अनोळखी पुरुषाचा मृतदेह |
सातारा शहरातून दोनजणी बेपत्ता |
डॉ आंबेडकर जयंती समारोह अध्यक्षपदी संजय गाडे यांची निवड |
शरद पवारांच्या डावपेचाकडे महाराष्ट्राचे लक्ष |
कराडला रविवारी इंडिया आघाडीचा मेळावा |
पश्चिम महाराष्ट्रात दि. २९ ते ३१ पर्यंत महावितरणचे वीजबिल भरणा केंद्र सुरू |
करंजे पेठतील थकबाकीदाराची पालिकेकडून मालमत्ता केली सील |
साताऱ्यात लोकसभेबाबत शुक्रवारी शरद पवारांची बैठक |
जमिनीच्या वादातून धारदार शस्त्राने एकाचा खून |
लोकसभा सार्वत्रिक निवडणूक-2024 |
कोल्हापूरला निघालेली खासगी ट्रॅव्हल्स झाली पलटी |
पुण्यातील पीएमटीच्या बसचालकाची सोनगाव येथे आत्महत्या |
झाड मारल्याप्रकरणी सातार्यात दोन गुन्हे दाखल |
अदानी ग्रुपचा वीज प्रकल्प रद्द करण्याठी प्रकल्पग्रस्त जिल्हाधिकारी कार्यालयावर काढणार मोर्चा |
प्रतापसिंह नगरात अतिक्रमणांसह लल्लन आणि युवराजच्या दहशतीवर जिल्हा प्रशासनाचा बुलडोझर |

पाच नॅशनल पुरस्कार मिळवून श्लोक घोरपडे कोल्हापूर येथील स्पर्धेत मारणार बाजी |
'आयडियल' मतदारसंघाचे 'आयडॉल' आमदार |
आचारसंहिता काळात लोकशाही दिनाचे आयोजन होणार नाही : नागेश पाटील |
पोक्सोंतर्गत एकावर गुन्हा |
कुऱ्हाडीने वार केल्या प्रकरणी एकावर गुन्हा |