RNI REG.NO. MAHMAR/2014/56135

What are you looking for?

Contact Us

Address:

Email:

Tel:

Sadar Bazar, Satara, Maharashtra 415001

contact@tmnnews.com

02162 237 474

What are you looking for?

×

भारताचे तीन सुवर्णसह ११ पदके

09 October 2018 at 16:50

जकार्ता : भारताच्या भालाफेकपटू संदीप चौधरी, जलतरणपटू सुयश जाधव आणि धावपटू रक्षिताने पॅरा-एशियाड स्पर्धेत सुवर्णपदकाची कमाई केली. यात संदीपने जागतिक विक्रमाची नोंद केली. स्पर्धेच्या दुसऱ्या दिवसअखेर भारताने तीन सुवर्ण, सहा रौप्य, सात ब्राँझ अशी एकूण ११ पदके मिळवून पदकतक्त्यात सहावे स्थान मिळवले आहे. 

सोमवारी सकाळच्या सत्रात संदीपने भालाफेकमध्ये पुरुषांच्या एफ ४२-४४/६१-६४ गटातून अव्वल स्थान पटकावून भारताच्या खात्यात पहिले पदक जमा केले. मध्यमपल्ल्याची धावपटू रक्षिता (टी ११, १५०० मीटर) आणि जलतरणपटू सुयश नारायण जाधवने (एस ७, ५० मीटर बटरफ्लाय) यांनी आणखी दोन सुवर्णपदके जमा केली. संदीप चौधरीने ६०.०१ मीटर कामगिरी नोंदवली. त्याने तिसऱ्या प्रयत्नात आपली ही सर्वोत्तम कामगिरी नोंदवली. त्याने १९८०मधील चीनच्या मिंगजिए गावोचा ५९.८२ मीटरचा विक्रम मोडित काढला. संदीप चौधरी म्हणाला, 'पॅरा-एशियाडसाठी मी उत्तम तयारी केली होती. जागतिक विक्रमासह सुवर्णयश मिळवू शकलो, याचा आनंद आहे. मला या कामगिरीवर समाधान मानायचे नाही. आता माझे लक्ष दुबईत होणाऱ्या जागतिक अजिंक्यपद स्पर्धेवर असणार आहे. या कामगिरीत माझे प्रशिक्षक आणि पॅरालिंपिक समितीचा तेवढाच वाटा आहे.' 

यानंतर जलतरणमध्ये ५० मीटर बटरफ्लायमध्ये सुयश जाधवने ३२.७१ सेकंद वेळ नोंदवून सुवर्णपदकाची कमाई केली जलतरणमध्ये भारताने चार पदकांची कमाई केली. सुयशच्या सुवर्णपदकाव्यतिरिक्त यात तीन ब्राँझपदकांचा समावेश होता. महिलांच्या १५०० मीटर धावण्याच्या शर्यतीत रक्षिताने ५ मिनिटे ४०.६४ सेकंद वेळ नोंदवून अव्वल क्रमांक पटकावला. पॅरा-पॉवरलिफ्टिंगमध्ये भारताने रौप्यपदक मिळवले, तर शूटिंगमध्ये एक रौप्य आणि एक ब्राँझपदक पटकावले. 

समीरची कडवी झुंज मोडून काढत श्रीकांत उपांत्य फेरीत

जागतिक बॅडमिंटन क्रमवारीत सहाव्या स्थानावर असलेल्या कदम्बी श्रीकांतने डेन्मार्क ओपनच्या उपांत्य पूर्व फेरीत भारताच्याच समीर वर्माचा पराभव करत उपांत्य फेरीत प्रवेश केला.

20 October 2018 at 14:22

भारत ९५०वा एकदिवसीय सामना खेळणारा पहिलाच संघ!

वेस्टइंडिज विरुद्ध कसोटी मालिका आपल्या नावे केल्यानंतर भारतीय संघाच्या नजरा या २१ ऑक्टोबरपासून सुरु होणार्‍या पाच सामन्यांच्या एकदिवसीय मालिकेवर असणार आहे.

19 October 2018 at 18:38

तिरोड्याच्या सुपुत्राची आंतराष्ट्रीय स्पर्धेत ‘लांबउडी’!

मलेशिया येथे झालेल्या ओपन चॅम्पियनशीप स्पर्धेत लांबउडी या प्रकारात सावंतवाडी-तिरोडा गावचे रहिवासी चारुदत्त वामन शेणई यांनी सुवर्णपदक मिळवले आहे.

16 October 2018 at 14:28

भारतीय युवा हॉकीला चंदेरी यश

अर्जेंटिना येथे सुरु असलेल्या स्पर्धेत भारताच्या युवा हॉकीपटूंना रौप्यपदकावर समाधान मानावे लागले.

15 October 2018 at 17:58