01:25am | Nov 24, 2018 |
कराड: पक्षीमित्र संमेलनाच्या माध्यमातून निसर्गाचा मूळ गाभा असलेला पक्षी सुरक्षित ठेवला पाहिजे. या कार्यामध्ये लहान मुले विद्यार्थ्यांना आकृष्ट करण्यासाठी पक्षांवर आधारित कार्टून फिल्म डॉक्युमेंटरी होणे आवश्यक आहे. त्यासाठी कराडला पक्षीमित्र संशोधन केंद्र उभारण्याचा संकल्प या संमेलनाच्या माध्यमातून करूया, असे आवाहन सहकार परिषदेचे अध्यक्ष शेखर चरेगावकर यांनी केले. दरम्यान, पक्षीमित्र संमेलनाच्या जागृतीसाठी संमेलनामध्ये नवनवीन उपक्रम राबविने गरजेचे आहे. त्यासाठी आर्थिक व शासकीय सहकार्याची आवश्यकता आहे. मात्र, भविष्यातीत महाराष्ट्र पक्षीमित्र संमेलनामध्ये निवडणुका, राजकीय हस्तक्षेप, वादविवाद निर्माण होऊन होऊ नयेत, असे सूचक वक्तव्य संमेलनाचे समेलनाध्यक्ष किशोर रिठे यांनी केले.
कराड येथे दुसऱ्या अखिल भारतीय व ३२ व्या महाराष्ट्र पक्षीमित्र संमेलनाच्या उद्घाटन प्रसंगी ते बोलत होते.यावेळी महाराष्ट्र निसर्ग पर्यटन विकास मंडळाचे अप्पर प्रधान मुख्य वन संरक्षक सुनील लिमये, सह्याद्री व्याघ्र राखीवचे क्षेत्र संचालक व्ही. सी. बेन, कोल्हापूरचे प्रादेशिक वन संरक्षक अरविंद पाटील, महाराष्ट्र पक्षीमित्र संमेलन अध्यक्ष जयंत वडतकर, माजी संमेलनाध्यक्ष दत्ता उगावकर, संमेलनाचे महासचिव सुधीर एकांडे, कार्याध्यक्ष मानद रोहन भाटे, नाना खामकर, जयेश शहा यांची उपस्थित होते.
शेखर चारेगावकर म्हणाले, पक्षीमित्र संमेलनाच्या माध्यमातून लोकांमध्ये जनजागृती होणे आवश्यक आहे. देशातील विविध ग्रंथांमध्ये
पक्षांना सन्मानाचे स्थान दिले आहे. त्यामुळे निसर्गाचा मूळ गाभा असणारा पक्षी सुरक्षित ठेवणे काळाची गरज आहे. त्यामुळे अशा
संमेलनाचा दर्जा खालावून नये याची काळजी घेणे अपेक्षित आहे. कोणताही उपक्रम यशस्वी करायचा असेलतर त्यामध्ये लोक सहभाग आवश्यक आहे. शिवाय लहान मुले, शालेय विद्यार्थ्यांना अशा संमेलनांकडे वळवण्यासाठी पक्षांवर आधारित कार्टून फिल्म डॉक्युमेंटरी होणे आवश्यक आहे. त्यासाठी कराडला पक्षीमित्र संशोधन केंद्र उभारण्याकामी आवश्यक ते प्रयत्न करणार आहे.
किशोर रिठे म्हणाले, पक्षी मानवी जीवनाचा अविभाज्य घटक आहे. त्यांचे संवर्धन व संरक्षण होणे येत्या काळात गरजेचे आहे. राज्यातील वाढत्या पक्षीमित्रांची संख्या पाहिल्यानंतर पक्षीमित्रांच्या संघटनेची संकल्पना उदयास आली आहे. त्या माध्यमातून पक्षी संवर्धन संरक्षण व त्यांच्याबद्दलचे फायदे याबाबत जनमाणसात प्रबोधन करण्यास सुरुवात केली. ही चळवळ पुढे चालवण्यासाठी अशी संमेलने व विविध पक्षी संवर्धन संस्थांच्या माध्यमातून मार्गदर्शन मिळणे आवश्यक आहे. दरम्यान,या संमेलनासाठी वर्धा ते कराड येथून सायकल रॅलीने पक्षी संवर्धनाचा संदेश देत आलेल्या पक्षीमित्रांचे करडकरांचे स्वागत, आदरातिथ्य व प्रतिसाद पाहून आपण भारावून गेल्याचेही त्यांनी आवर्जून नमूद केले.
सुनील लिमये म्हणाले, कोणताही कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी तन मन आणि धन यांच्या या तीन गोष्टी आवश्यक असते. त्याचा प्रत्यय या संमेलनाच्या निमित्ताने आला आहे. पक्षांचा काय फायदा मानवी जीवनाला होणारा आहे हे लोकांना पटवून देणे आवश्यक आहे. प्रास्ताविक जयंत वडतकर यांनी केले. तर आभार सुधीर एकांडे यांनी मानले.
सातारा शहरातील लल्लन टोळीवर मोक्का कारवाई |
कृष्णा खोरे महामंडळामुळे दुष्काळी भागात पाणी : उदयनराजे भोसले |
लोकसभा निवडणुकीच्या मतदानाची वेळ वाढवून मिळावी |
सूर्योदयाच्या मुहूर्तावर हनुमान जन्मोत्सव साजरा |
सणबूरच्या यात्रेत कुस्तीच्या फडात आग्या मोहोळाचा हल्ला |
उदयनराजेंच्या पत्नी दमयंतीराजेंचा काँग्रेसवर गंभीर आरोप |
वाई, जावळी तालुक्यात अवकाळी पाऊस |
अल्पवयीन मुलीवर अत्याचार करणाऱ्या युवकाला सश्रम कारावास |
उदयनराजे यांनी घेतले वाईच्या महागणपतीचे दर्शन |
तरुणांच्या भवितव्यासाठी मोदींच्या नेतृत्वाखाली स्थिर सरकार निवडून देऊया उदयनराजे यांचे आवाहन |
पाण्याच्या मोटरची चोरी |
सिव्हिल हॉस्पिटलच्या पार्किंगमधून दुचाकीची चोरी |
चैन स्नॅचिंग प्रकरणी दोन अज्ञातांवर गुन्हा |
अपघातात जखमी केल्याप्रकरणी एकावर गुन्हा |
अवैध दारु प्रकरणी दोघांवर कारवाई |
उदयनराजेंच्या पत्नी दमयंतीराजेंचा काँग्रेसवर गंभीर आरोप |
वाई, जावळी तालुक्यात अवकाळी पाऊस |
अल्पवयीन मुलीवर अत्याचार करणाऱ्या युवकाला सश्रम कारावास |
उदयनराजे यांनी घेतले वाईच्या महागणपतीचे दर्शन |
तरुणांच्या भवितव्यासाठी मोदींच्या नेतृत्वाखाली स्थिर सरकार निवडून देऊया उदयनराजे यांचे आवाहन |
पाण्याच्या मोटरची चोरी |
सिव्हिल हॉस्पिटलच्या पार्किंगमधून दुचाकीची चोरी |
चैन स्नॅचिंग प्रकरणी दोन अज्ञातांवर गुन्हा |
अपघातात जखमी केल्याप्रकरणी एकावर गुन्हा |
अवैध दारु प्रकरणी दोघांवर कारवाई |
वाहनावर विनापरवाना स्पिकर लावल्याप्रकरणी एकावर कारवाई |
सातारा लोकसभेसाठी एकूण १६ उमेदवार रिंगणात |
उमेदवारांच्या निवडणुक खर्चाची नोंदवही तपासण्याचे वेळापत्रक जाहीर ; जिल्हा निवडणूक निर्णय अधिकारी डुडी |
छत्रपती संभाजी महाराज शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयतर्फे विविध आरोग्यविषयक उपक्रमांचे आयोजन |
प्लास्टिक पाईपने बेदम मारहाण करून युवकाचा केला निर्घृण खून |