मसूर : लग्नकार्याचे देवदर्शन आटोपून परतत असताना शामगाव घाटातील पोलिस चेक नाक्यासमोरील वळणावर एस. टी. व मोटारसायकल यांची धडक होऊन झालेल्या अपघातात दुचाकीवरील तिघेजण गंभीर जखमी झाले. त्यांच्यावर कराड येथील खासगी रुग्णालयात उपचार सुरू असताना उपचारादरम्यान दोन अल्पवयीन मुलींचा मृत्यू झाला. बुधवार दि. 16 रोजी सकाळी 11.30 वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली. कु. भूमी प्रकाश तुपे (वय 12), कु. संचिता विजय तुपे (वय 10, सध्या रा. कोपर्डे हवेली, ता. कराड) असे अपघातात ठार झालेल्या मुलींची नावे आहेत.
याबाबत मिळालेली माहिती अशी की, शामगावहून लग्नकार्याचे देवदर्शन आटोपून दुचाकी (क्र. एम.एच.05 एए 4377) वरून दुचाकीचालक प्रशांत बाळासाहेब थोरात (मूळ गाव सवादे, ता. कराड) व त्याच्या मामाच्या दोन मुली कु.भूमी तुपे व कु. संचिता तुपे या प्रशांतच्या मावसभावाचे 19 मे रोजी होणार्या लग्नकार्याच्या देवदर्शनासाठी आले होते. ते आटोपून कोपर्डेला परतत होते. त्याचवेळी वडूज डेपोची कराड-वडूज एस. टी. (क्र.एम.एच.06 एस 8057) ही वडूजकडे जात असताना शामगाव घाटातील पोलिस चेकनाक्यासमोरील वळणावर एस.टी.च्या पाठीमागील बाजूस मोटरसायकलची जोरदार धडक बसली. यामध्ये मोटरसायकल चालक प्रशांत बाजुला पडला तर दोघी मुलींचे डोके एस.टी.च्या पाठीमागील बाजूस जोराने आपटले. त्या गंभीर जखमी झाल्या. दरम्यान, जखमींचे नातेवाईक पाठीमागून कारमधून येत होते. त्यांनी तातडीने कारमधून जखमींना कराडला खासगी हॉस्पिटलमध्ये हलविले.
अपघातात प्रशांत यांच्या पायाला मार लागला आहे. तर दोन्ही मुलींच्या डोक्याला गंभीर मार लागल्याने त्यांना अत्यवस्थ अवस्थेत दवाखान्यात दाखल करण्यात आले. त्यापैकी कु.भूमी तुपे व संचिता तुपे हिचे उपचारादरम्यान मृत्यू झाला. अपघाताची खबर प्रशांत थोरात यांनी उंब्रज पोलिस ठाण्यात दिली असून एस.टी.चालकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अधिक तपास स.पो.नि.बजरंग कापसे करत आहेत.
सातारा पोलीस मुख्यालयात उपनिरीक्षकाला धमकी |
बिग बॉस फेम अभिजीत बिचुकले यांचा अर्ज दाखल |
महाविकास आघाडीच्या उमेदवाराचा पूर्ण ताकतीने प्रचार करणार |
माढयात अभय जगताप यांचे बंड शमले |
सातारा लोकसभा प्रबंधन समितीचे कार्य उत्कृष्ठ |
उदयनराजे भोसले यांची संपत्ती 251 कोटीची |
वादळी वाऱ्यात स्पीड बोट उलटून एकाचा मृत्यू |
निवडणूक स्थिर सर्वेक्षण पथकातील कर्मचाऱ्याला पोलिसाकडून मारहाण |
येणके येथील कुंभार वस्तीतील जल जीवन मिशनअंतर्गतचे काम प्रगतीपथावर |
निवडणुक निरिक्षक आर. अर्जुन व पोलिस निवडणुक निरिक्षक प्रदीप शर्मा यांचे जिल्ह्यात आगमन |
उदयनराजेंना विक्रमी मताधिक्याने निवडून आणण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करणार |
श्री क्षेत्र निनाम येथील सासनकाठीला यात्रेत महत्वाचे स्थान |
मंदार कोल्हटकर, धिरज पाटील यांचे अपघाती निधन |
ट्रकच्या धडकेत दुचाकीस्वाराचा मृत्यू |
राजवाडा परिसरातून सव्वा लाखांच्या सोन्याच्या चैनची चोरी |

मारहाण प्रकरणी चौघांवर गुन्हा |
ट्रक चालकाला लुटल्याप्रकरणी तीन अज्ञातांवर गुन्हा |
महिलेचा विनयभंग केल्याप्रकरणी एकावर गुन्हा |
सराईत गुन्हेगाराने दिली तीन घरफोड्यांची कबुली |
उदयनराजे यांच्या समर्थनार्थ सातार्यात लोटला जनसागर |