सातारा : मला जाणता राजा म्हणा असे मी काही कुठे म्हणालो नाही. पण शिवाजी महाराजांचा इतिहास प्रामाणिकपणे अभ्यासला, तर छत्रपती यांची उपाधी शिवछत्रपती हीच होती. जाणता राजा ही नव्हती. छत्रपती हे जन्माने, कर्तृत्वाने लोकांच्या अंत:करणामध्ये छत्रपतीच राहतील. तिथे दुसरे कोणी काही म्हणण्याची गरज नाही, अशा शब्दात राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी माजी खासदार उदयनराजे भोसले यांच्या टीकेला चोवीस तासातच सातारा जिल्ह्यात येऊन चोख प्रत्त्युत्तर दिले. समर्थ रामदास स्वामी हे शिवाजी महाराजांचे गुरू नव्हते, तर राजमाता जिजामाताच गुरू होत्या, असे सांगत पवार यांनी वातावरण ढवळून काढले.
उदयनराजे यांनी मंगळवारी पुण्यात 'जाणता राजा' उपाधीवरून केलेल्या टीकेवर आज सातारा जिल्ह्याच्या दौNयावर आलेले पवार काय बोलतात याकडे सर्वांचे लक्ष होते. खटाव तालुक्यातील पडळ येथे खटाव - माण अॅग्रो लि. या साखर कारखान्यात उत्पादित साखर पोत्यांच्या पूजन कार्यक्रमाच्या निमित्ताने आयोजित सभेत ते बोलत होते.
जाणता राजा हा शब्द रामदासांनी आणलेला आहे, असे सांगून त्यांनी इतिहासाची पाने खुली केली. जे लोक सांगतात की समर्थ रामदास स्वामी हे शिवाजी महाराजांचे गुरू होते, ते खोटे आहे. समर्थ रामदास स्वामी शिवाजी महाराजांचे गुरू नव्हते, तर शिवाजी महाराजांच्या गुरू राजमाता जिजामाताच होत्या. शिवाजी महाराजांचे व्यक्तिमत्व जिजामाता यांच्या संस्कारातून घडले, असे त्यांनी सांगितले.
शिवाजी महाराजांचा कालखंड नीट अभ्यासला, तर त्या कालखंडामध्ये समर्थ रामदास स्वामी नव्हते. पण काही लोकांच्या हातात लेखणी होती. त्यामुळे या कर्तृत्वसंपन्न महामानवाला घडवण्याचे काम कुणीतरी रामदासांनी केले अशी लेखणीची कमाल कुणीतरी केली आणि आम्ही लोक मानू लागलो की महाराजांचे सगळे जे कर्तृत्व आहे, ते रामदासांच्यामुळं आहे, हे खरे नव्हे. महाराजांचे कर्तृत्व हे स्वकर्तृत्व होते. मार्गदर्शन आणि संस्कार मातेचे होते. म्हणून हे महान व्यक्तिमत्व या देशाला मिळाले. त्यांना जाणता राजा म्हणायची गरज नाही. छत्रपती हे जन्माने, कर्तृत्वाने लोकांच्या अंत:करणामध्ये छत्रपतीच राहतील. तिथे दुसरे कोणी काही म्हणण्याची गरज नाही, असे त्यांनी सांगितले.
महाभकास आघाडीला निवडणुकीत जागा दाखवा |
साताऱ्यात मेघगर्जनेसह बरसल्या पावसाच्या सरी |
जनता बँकेत पुर्नगठीत बोर्ड ऑफ मॅनेजमेंटच्या चेअरमनपदी विनोद कुलकर्णी |
बोंडारवाडीसह धरणांची कामे मार्गी लावणार उदयनराजेंचे आश्वासन |
दलित महासंघ,पॅंथरचा उदयनराजेंना जाहीर पाठींबा |
सातारकरांना बाहेरच्यांनी स्वाभिमान शिकवू नये |
साताऱ्यात कोट्यावधीची कामे हीच आपली जमेची बाजू |
जुगार प्रकरणी एकावर कारवाई |
नोकरीच्या अमिषाने सुमारे पावणे सहा लाखांची फसवणूक |
शहरातील दोन वेगवेगळ्या घटनांमध्ये दोनजण बेपत्ता |
विवाहितेला आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी पती विरुध्द गुन्हा |
शाहूनगर येथे घरफोडी |
पंतप्रधान मोदी यांची सभा म्हणजे उदयनराजे यांच्या विजयाची नांदी |
वाट कशाची पाहता? कामाला लागा |
साताऱ्यात आरटीई प्रवेशासाठी पालकांचा कमी प्रतिसाद |
सातारकरांना बाहेरच्यांनी स्वाभिमान शिकवू नये |
साताऱ्यात कोट्यावधीची कामे हीच आपली जमेची बाजू |
जुगार प्रकरणी एकावर कारवाई |
नोकरीच्या अमिषाने सुमारे पावणे सहा लाखांची फसवणूक |
शहरातील दोन वेगवेगळ्या घटनांमध्ये दोनजण बेपत्ता |
विवाहितेला आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी पती विरुध्द गुन्हा |
शाहूनगर येथे घरफोडी |
पंतप्रधान मोदी यांची सभा म्हणजे उदयनराजे यांच्या विजयाची नांदी |
वाट कशाची पाहता? कामाला लागा |
साताऱ्यात आरटीई प्रवेशासाठी पालकांचा कमी प्रतिसाद |
अफवांवर नाही, हवामान खात्यावर विश्वास ठेवा : हवामान खात्याचे प्रमुख सुनील कांबळे |
घोटाळेबाजांशी कायम लढत राहणार उदयनराजे गरजले |
साताऱ्यातील सुप्रसिद्ध डॉ. रविंद्र हर्षे यांचे दुःखद निधन |
भाजप देशाचे भविष्य तर काँग्रेस भूतकाळ उदयनराजे भोसले यांचा टोला |
कृष्णाबाई यात्रा महोत्सवाचा पालखी मिरवणुकीने शुभारंभ |