पुणे : आपल्या बहारदार अभिनयाने जवळ जवळ ५ दशकांचा काळ गाजवत रंगभूमीवर आपला आगळा ठसा उमटवणाऱ्या बंडखोर ज्येष्ठ अभिनेत्री लालन सारंग (७९ वर्षे) यांचे वृद्धापकाळाने निधन झाले. आज सकाळी पुण्यातील एका खासगी रुग्णालयात त्यांनी अखेरचा श्वास घेतला. त्या ७९ वर्षांच्या होत्या. त्यांच्या निधनामुळे मराठी रंगभूमी आणि चित्रपटसृष्टीवर शोककळा पसरली आहे. 'कमला', 'गिधाडे', 'सखाराम बाइंडर', 'रथचक्र' यांसारख्या नाट्य परंपरांना छेद देणाऱ्या नाटकांत त्यांनी साकारलेल्या भूमिका प्रचंड गाजल्या.
लालन सारंग यांचा जन्म २६ डिसेंबर १९४१ रोजी गोव्यात झाला. लालन सारंग यांना रंगभूमीवरील बंडखोर अभिनेत्री म्हणून ओळखले जाते. मुंबई मराठी साहित्य संघ, अत्रे थिएटर्सच्या नाटकांमधून अभिनय प्रवासाला सुरुवात केली. ‘मी मंत्री झालो’, ‘बुवा तेथे बाया’, ‘मोरूची मावशी’, उद्याचा संसार' आदी नाटकांचा यात समावेश होता. विजय तेंडूलकर यांच्या 'सखाराम बाइंडर' या नाटकात त्यांनी साकारलेली चंपाची भूमिका वादळी ठरली. ‘रथचक्र’, ‘कमला’, ‘गिधाडे’, ‘जंगली कबुतर’, ‘खोल खोल पाणी’, ‘घरटे आपुले छान’, ‘बेबी’, ‘सूर्यास्त’, ‘कालचक्र’ आदी नाटकातल्या भूमिका गाजल्या. ‘सामना’, ‘हा खेळ सावल्यांचा’या चित्रपटांत तसेच ‘रथचक्र’या हिंदी मालिकेतही त्यांनी काम केले. नाटकांच्या माध्यमातून साकारलेल्या भुमिकांमधून त्यांनी केवळ मनोरंजन न करता सामाजिक संदेश देण्यावर त्यांचा नेहमी कटाक्ष होता. लालन सारंग यांनी २०१२ मध्ये तब्बल एका तपानंतर जयवंत दळवी लिखित 'कालचक्र' या नाटकाच्या माध्यमातून व्यावसायिक रंगभूमीवर पुनरागमन केले होते.
‘नाटकांमागील नाटय़’, ‘मी आणि माझ्या भूमिका’, ‘जगले जशी’, ‘बहारदार किस्से आणि चटकदार पाककृती’आदि पुस्तकेदेखील त्यांनी लिहीली. कणकवली येथे झालेल्या ८७ व्या मराठी नाट्यसंमेलनाचे त्यांनी अध्यक्षपद भूषवले होते.
कोल्हापूरला निघालेली खासगी ट्रॅव्हल्स झाली पलटी |
पुण्यातील पीएमटीच्या बसचालकाची सोनगाव येथे आत्महत्या |
झाड मारल्याप्रकरणी सातार्यात दोन गुन्हे दाखल |
अदानी ग्रुपचा वीज प्रकल्प रद्द करण्याठी प्रकल्पग्रस्त जिल्हाधिकारी कार्यालयावर काढणार मोर्चा |
प्रतापसिंह नगरात अतिक्रमणांसह लल्लन आणि युवराजच्या दहशतीवर जिल्हा प्रशासनाचा बुलडोझर |
पाच नॅशनल पुरस्कार मिळवून श्लोक घोरपडे कोल्हापूर येथील स्पर्धेत मारणार बाजी |
'आयडियल' मतदारसंघाचे 'आयडॉल' आमदार |
आचारसंहिता काळात लोकशाही दिनाचे आयोजन होणार नाही : नागेश पाटील |
पोक्सोंतर्गत एकावर गुन्हा |
कुऱ्हाडीने वार केल्या प्रकरणी एकावर गुन्हा |
अवैधरित्या दारू विक्री प्रकरणी एकावर कारवाई |
अंमली पदार्थाचे सेवन केल्याप्रकरणी एकावर गुन्हा |
राहत्या घरातून युवक बेपत्ता |
वडूज येथे बांधकाम विभागाचा अभियंता लाचलुचपतच्या जाळ्यात |
मल्हारपेठेत शाहूपुरी पोलिसांनी पकडला पावणेदोन लाखाचा गुटखा |
पाच नॅशनल पुरस्कार मिळवून श्लोक घोरपडे कोल्हापूर येथील स्पर्धेत मारणार बाजी |
'आयडियल' मतदारसंघाचे 'आयडॉल' आमदार |
आचारसंहिता काळात लोकशाही दिनाचे आयोजन होणार नाही : नागेश पाटील |
पोक्सोंतर्गत एकावर गुन्हा |
कुऱ्हाडीने वार केल्या प्रकरणी एकावर गुन्हा |
अवैधरित्या दारू विक्री प्रकरणी एकावर कारवाई |
अंमली पदार्थाचे सेवन केल्याप्रकरणी एकावर गुन्हा |
राहत्या घरातून युवक बेपत्ता |
वडूज येथे बांधकाम विभागाचा अभियंता लाचलुचपतच्या जाळ्यात |
मल्हारपेठेत शाहूपुरी पोलिसांनी पकडला पावणेदोन लाखाचा गुटखा |
आज जिल्ह्यात उदयनराजेंची होणार ग्रँड एन्ट्री |
सातारा लोकसभेवर अजितदादांच्या राष्ट्रवादीचा दावा कायम |
पाटखळ येथील नूतन तलाठी कार्यालयाचे अतिक्रमण |
मेक इन इंडिया पॉलिसीमुळे ‘मॅक्सिको’ होण्याची भीती? |
चक्क अप्पर जिल्हाधिकारी निवासस्थाना बाहेरचे झाड जाळण्याचा प्रयत्न |