सातारा : लग्नाच्या गाठी स्वर्गात बांधल्या जातात, पण सध्या रस्त्यावरील हुल्लडबाजीमुळे या गाठीसुद्धा विभक्त होवू लागल्या आहेत. कडक उन्हाळा, त्यातच वाद्याचा कर्णकर्कश आवाज यामुळे अगोदरच वैतागलेल्या वर्हाडी मंडळींच्या विनंत्या धुडकावून नाचगाणे करणार्या हुल्लडबाज टोळक्यांमुळे वरातच ठरत आहे भांडणाचे मूळ, असे म्हणण्याची वेळ आली आहे. यामुळे सातारा पोलिसांची डोकेदुखी मात्र वाढली असून वधू-वरांच्या पालकांना मनस्ताप सहन करावा लागत आहे. त्यामुळे सामुदायिक विवाह चळवळ आशेचे किरण ठरु लागली आहे.
पूर्वी लग्नसराई म्हटली की, नातेवाईक, भावकी आणि मोजक्याच मित्रपरिवाराची लगबग सुरु असायची. घरोघरी उत्साह संचारला जात होता. बाल चिमुकल्यांना त्याचे कौतुक वाटत असे. दारातील शुभविवाह आणि मंडप खर्या अर्थाने दोन कुटूंबांना जोडणारी झालर होती. अगदी गोरज मुहूर्तावरच लग्न लागत होती. त्यामुळे वेळेचे काटेकोर पालन करुन वर्हाडी मंडळी लग्न लागल्यावर सुखरुप आपापल्या घरी जात होती. आता काळ बदलला असून मंगल कार्यालयाच्या आवारात लग्न होवू लागल्यामुळे मुहूर्त टळला तरी नवरा-नवरी मंचकावर उपस्थित राहत नाहीत. त्यातच वरातीमुळे मुलींची छेडछाड, अश्लील टोमणे, वेडेवाकडे अंगविक्षेप करीत केलेला हिडीस नाच यामुळे आता भांडणाचे प्रमाण वाढू लागले आहे. पूर्वी मानपानामुळे रुसवे-फुगवे आपापसात होत होते. आता एकमेकांकडे बघण्यावरुन सुद्धा भांडणे होवू लागली आहेत. त्यातून युवापिढीला पोलीस ठाण्याची कोठडी बघावी लागत आहे. त्यांच्या पालकांना जामीनदार शोधताना झक मारली आणि लग्नाला उपस्थित राहिलो, असे म्हणावे लागत आहे.
सध्या वरातीसाठी घोडे-बॅन्जो व अन्य वाद्य तसेच फटाक्यांची आतषबाजी यासाठी किमान लाखभर रुपये मोजावे लागत आहेत. त्यातून फायदा होण्याऐवजी तोटा होत असल्याचे पुढे आले आहे. अन्न हे पूर्णब्रह्म, असे मानले तरी तांदुळाच्या अक्षतांमध्ये दगड मिक्स करुन त्या अक्षता मुलींच्या घोळक्यात भिरकावणे, असा प्रकारही उघडकीस येत आहे. मद्यपी मंडळींबद्दल न बोलणेच बरे. कारण चार-दोन मंडळी रंगाचा बेरंग करीत आहेत. खरेतर सामाजिक ऐक्य व शांतता बिघडविण्याबद्दल अशा लोकांवर गुन्हा दाखल करण्यासाठी लग्न मालकांनीच पुढाकार घेतला तर पुढचा अनर्थ टळणार आहे, असे सांगण्याची वेळ आली आहे. सातारा जिल्ह्यात लग्नकार्यात भांडण होण्याचे प्रकार वाढू लागल्याने काही विवाह क्षणातच मोडलेले आहेत. याची आता गांभीर्याने नोंद घेवून पोलीस ठाण्यातून ना हरकत दाखला घेतल्याशिवाय अशा विवाहांना परवानगी देवू नये, अशी मागणी पुढे येवू लागली आहे. सध्या वाहनांची संख्या वाढली असून अशा वरातींमुळे वाहतुकीची कोंडी होवून या विवाहाशी संबंधित नसणारे वाहनचालक शुभाशिर्वाद देण्याऐवजी शिव्या हासडत आपले वाहन पुढे घेवून जात आहेत, हेही प्रकर्षाने जाणवू लागले आहे. त्यातच वरातीमध्ये माझ्या आवडीचे गाणे वाजव या दुराग्रहासाठी वाजंत्रीवाल्यांनासुद्धा प्रसंगी मारहाण होवू लागली आहे. दरम्यान, इतर बंदोबस्त व गुन्ह्यांचा तपास करण्यात पोलीस यंत्रणा व्यस्त असताना अशा भांडणांमुळे पोलिसांची डोकेदुखी वाढली आहे.
शाहूपुरी पोलिस ठाण्याच्या हद्दीत आढळला अनोळखी पुरुषाचा मृतदेह |
सातारा शहरातून दोनजणी बेपत्ता |
डॉ आंबेडकर जयंती समारोह अध्यक्षपदी संजय गाडे यांची निवड |
शरद पवारांच्या डावपेचाकडे महाराष्ट्राचे लक्ष |
कराडला रविवारी इंडिया आघाडीचा मेळावा |
पश्चिम महाराष्ट्रात दि. २९ ते ३१ पर्यंत महावितरणचे वीजबिल भरणा केंद्र सुरू |
करंजे पेठतील थकबाकीदाराची पालिकेकडून मालमत्ता केली सील |
साताऱ्यात लोकसभेबाबत शुक्रवारी शरद पवारांची बैठक |
जमिनीच्या वादातून धारदार शस्त्राने एकाचा खून |
लोकसभा सार्वत्रिक निवडणूक-2024 |
कोल्हापूरला निघालेली खासगी ट्रॅव्हल्स झाली पलटी |
पुण्यातील पीएमटीच्या बसचालकाची सोनगाव येथे आत्महत्या |
झाड मारल्याप्रकरणी सातार्यात दोन गुन्हे दाखल |
अदानी ग्रुपचा वीज प्रकल्प रद्द करण्याठी प्रकल्पग्रस्त जिल्हाधिकारी कार्यालयावर काढणार मोर्चा |
प्रतापसिंह नगरात अतिक्रमणांसह लल्लन आणि युवराजच्या दहशतीवर जिल्हा प्रशासनाचा बुलडोझर |
पश्चिम महाराष्ट्रात दि. २९ ते ३१ पर्यंत महावितरणचे वीजबिल भरणा केंद्र सुरू |
करंजे पेठतील थकबाकीदाराची पालिकेकडून मालमत्ता केली सील |
साताऱ्यात लोकसभेबाबत शुक्रवारी शरद पवारांची बैठक |
जमिनीच्या वादातून धारदार शस्त्राने एकाचा खून |
लोकसभा सार्वत्रिक निवडणूक-2024 |
कोल्हापूरला निघालेली खासगी ट्रॅव्हल्स झाली पलटी |
पुण्यातील पीएमटीच्या बसचालकाची सोनगाव येथे आत्महत्या |
झाड मारल्याप्रकरणी सातार्यात दोन गुन्हे दाखल |
अदानी ग्रुपचा वीज प्रकल्प रद्द करण्याठी प्रकल्पग्रस्त जिल्हाधिकारी कार्यालयावर काढणार मोर्चा |
प्रतापसिंह नगरात अतिक्रमणांसह लल्लन आणि युवराजच्या दहशतीवर जिल्हा प्रशासनाचा बुलडोझर |
पाच नॅशनल पुरस्कार मिळवून श्लोक घोरपडे कोल्हापूर येथील स्पर्धेत मारणार बाजी |
'आयडियल' मतदारसंघाचे 'आयडॉल' आमदार |
आचारसंहिता काळात लोकशाही दिनाचे आयोजन होणार नाही : नागेश पाटील |
पोक्सोंतर्गत एकावर गुन्हा |
कुऱ्हाडीने वार केल्या प्रकरणी एकावर गुन्हा |