RNI REG.NO. MAHMAR/2014/56135

What are you looking for?

Contact Us

Address:

Email:

Tel:

Sadar Bazar, Satara, Maharashtra 415001

contact@tmnnews.com

02162 237 474

What are you looking for?

×

वडजलमधील बोगस व्यसनमुक्ती केंद्रात युवकाचा संशयास्पद मृत्यू

04 April 2018 at 23:57

फलटण : व्यसनाच्या आहारी गेलेल्या युवकाचे व्यसन सोडविण्यासाठी फलटण तालक्यातील वडजल येथील खासगी व्यसनमुक्ती केंद्रात दाखल केलेल्या 'त्या' युवकाचा आज संशयास्पदरित्या मृत्यू झाला आहे. याबाबत पोलिसात आकस्मात मृत्यु म्हणून नोंद असून व्हिसेरा राखूंन ठेवला आहे. मात्र युवकाच्या नातेवाईकांनी याबाबत संशय व्यक्त केला आहे.

फलटण ग्रामीण पोलीस ठाण्यातून मिळालेल्या माहितीनुसार, वडजल (ता फलटण) येथील दारू व्यसनमुक्ती केंद्रात योगेश किसन चांदोरकर  (वय ३२, रा. अशोकनगर किल्लाघाटाव , रोहा, ता रोहा जि रायगड) यांना दारुचे व्यसन असल्याने दारु सोडविन्यासाठी सोमवार, दि. २ रोजी सकाळी अकरा वाजता योगेश नातेवाइकानी वडजल येथील भोलेनाथ व्यसनमुक्ति केंद्रात दाखल केले होते.दाखल करून नातेवाईक निघुन गेले होते  मंगळवारी दि 3 रोजी सायं 5 च्या सुमारास योगेश यांच्या म्हेवने राजेश खामगावकर(रा खामगावकर,ता म्हसळा जि रायगड) यांना व्यसनमुक्ति केंद्रातून योगेशचा मृत्यु झाल्याचा फोन आला यानंतर योगेशचे वडील आणि इतर नातेवाईक मध्यरात्री एक वाजता फलटणला पोलिसाकड़े आले, त्यांना घेऊन वडजलला गेले तेथे योगेशचा मृतदेह एका शेड मध्ये  ठेवला होता.  योगेशच्या अंगावर जखमा आणि शरीरातुन रक्त येत होते त्यानंतर मृतदेह येथील उपजिल्हा रुग्णालयात उत्तरीय तपासणीसाठी आणण्यात आला. 

यावेळी  अघोरी उपचार झाल्याचा आरोप नातेवाईकांनी केल्याने फलटण उपरुग्णालयात तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. या प्रकरणाची संपूर्ण चौकशी आणि तपास करावा. तोपर्यंत आम्ही योगेशचा मृतदेह ताब्यात घेणार नाही, अशी भूमिका नातेवाईकांनी घेतली. पोलिसांनी सर्वांची समजूत घालून व्हिसेरा राखुंन ठेवला असून त्याचा रिपोर्ट आल्यावर आणि तपास पूर्ण झाल्यावर याबाबतचा गुन्हा नोंद होईल असे समजून सांगितल्यावर नातेवाइकानी मृतदेह ताब्यात घेतला. 

 या बाबतची फिर्याद फलटण ग्रामीण पोलिस ठाण्यात मृताचे नातेवाईक विजय विठ्ठलआम्बेत्कर (रा वायशेत ता अलिबाग, जि. रायगड) यांनी दिली आहे पोलिसांनी अकस्मात मृत्यु म्हणून नोंद केली असून अधिक तपास हवालदार रामदास लिमन करीत आहेत दरम्यान व्यसनमुक्ति केंद्र चालकांनी योगेशचा मृत्यु झाल्यानंतर  पोलिसांना त्वरीत कळवायला पाहिजे होते मात्र त्यांनी न कळविल्याने त्यांचीही भूमिका संशयास्पद वाटू लागल्याचा आरोप नातेवाईकांनी  केला आहे. 

 

जावली तालुक्यातील अवैद्य दारू विक्रेत्यांवर मोक्का अंतर्गत कारवाई करावी

गेली ११ वर्ष जावली तालुक्यात सुरु असलेली १३ दारू दुकाने महिलांनी व व्यसनमुक्ती संघटनांनी ऐतिहासिक पाऊल उचलून बंद केली होती.

4 hours before

एकावर पोस्को अंतर्गत गुन्हा

कराड जवळील एका गावात नऊ वर्षीय मुलीवर अत्याचार केल्याप्रकरणी एकावर पोस्को अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

4 hours before

तलावात बुडून युवकाचा मृत्यू

बामणवाडी (ता.कराड) येथे जांभळा नावच्या शिवारात असलेल्या कृषि विभागाच्या पाजर तलावात युवकाचा बुडून मृत्यू झाला.

4 hours before

सातार्‍यातून ट्रॅक्टर, दोन दुचाकी चोरी

सातारा शहर परिसरातून अज्ञात चोरट्यांनी तीन ठिकठिकाणाहून ट्रॅक्टर व दोन दुचाकी चोरुन नेला असून याप्रकरणी शहर पोलिस ठाण्यात तीन गुन्हे दाखल झाले आहेत.

4 hours before