02:44am | Sep 22, 2019 |
मसूर : सवंग लोकप्रियतेसाठी घोषणा करून शासनाने जनतेला वेठीस धरले आहे. हुकूमशाही पध्दतीने नोटबंदीसह जीएसटीची अंमलबजावणी करण्यता आली. हणबरवाडी-धनगरवाडी योजनेला राज्य शासनाने मागील चार वर्षात पुरेसा निधी दिला नाही. त्यामुळेच या योजना रखडल्याचे प्रतिपादन आ. बाळासाहेेब पाटील यांनी केले.
कवठे (ता.कराड) येथील कार्यक्रमात ते बोलत होते. जिल्हा परिषद सदस्य मानसिंगराव जगदाळे, माजी सभापती देवराज पाटील, वनिता पलंगे, शालन माळी, रमेश चव्हाण यांच्यासह मान्यवर उपस्थित होते. आ. बाळासाहेब पाटील म्हणाले, मसूर परिसरातील पूर्वेकडील गावांना जीवनदायी ठरणार्या हणबरवाडी-धनगरवाडी या महत्वकांक्षी उपसा जलसिंचन योजनेसाठी आघाडी सरकारच्या काळात माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या पुढाकाराने निधीची उपलब्धता झाली होती. त्यानंतर या योजनेचे काम सुरू झाले. दुदैवाने सत्तेत युती शासनाने या योजनांना पुरेसा निधी दिला नसल्याने या योजनेचे काम रखडले. त्यामुळे शेतकर्यांच्या शेतीला शाश्वत पाणी पुरवठा झाला नाही. पर्यायाने शेतकर्याची कुचंबणा झाली असून शासनाकडून पश्चिम महाराष्ट्राकडे दुर्लक्ष केलं जात असल्याचे मत आ. बाळासाहेब पाटील यांनी व्यक्त केले.
अतिवृष्टीमुळे महापूर आला. त्यामध्ये शासनाकडून वेळेत मतद देण्याऐवजी शासन यात्रा काढण्यात मश्गुल होते. सरकारचा नाकर्तेपणा पाहून गावागावातील ग्रामस्थांनी पूरग्रस्तासाठी मदत गोळा करून पूरग्रस्त लोकांचे संसार उभे केल्याचे आ. पाटील यांनी सांगितले. यावेळी देवराज पाटील, मानसिंगराव जगदाळे, रमेश चव्हाण, विजयकुमार पाटणकर, ज्ञानेश्वर साळुंखे यांची भाषणे झाली. ग्रामस्थांसह कार्यकर्ते यावेळी उपस्थित होते. प्रास्ताविक सरपंच लालासाहेब पाटील यांनी केेले. सूत्रसंचालन साहेबराव साळुंखे यांनी केले. आभार शशिकांत यादव यांनी मानले.
शाहूपुरी पोलिस ठाण्याच्या हद्दीत आढळला अनोळखी पुरुषाचा मृतदेह |
सातारा शहरातून दोनजणी बेपत्ता |
डॉ आंबेडकर जयंती समारोह अध्यक्षपदी संजय गाडे यांची निवड |
शरद पवारांच्या डावपेचाकडे महाराष्ट्राचे लक्ष |
कराडला रविवारी इंडिया आघाडीचा मेळावा |
पश्चिम महाराष्ट्रात दि. २९ ते ३१ पर्यंत महावितरणचे वीजबिल भरणा केंद्र सुरू |
करंजे पेठतील थकबाकीदाराची पालिकेकडून मालमत्ता केली सील |
साताऱ्यात लोकसभेबाबत शुक्रवारी शरद पवारांची बैठक |
जमिनीच्या वादातून धारदार शस्त्राने एकाचा खून |
लोकसभा सार्वत्रिक निवडणूक-2024 |
कोल्हापूरला निघालेली खासगी ट्रॅव्हल्स झाली पलटी |
पुण्यातील पीएमटीच्या बसचालकाची सोनगाव येथे आत्महत्या |
झाड मारल्याप्रकरणी सातार्यात दोन गुन्हे दाखल |
अदानी ग्रुपचा वीज प्रकल्प रद्द करण्याठी प्रकल्पग्रस्त जिल्हाधिकारी कार्यालयावर काढणार मोर्चा |
प्रतापसिंह नगरात अतिक्रमणांसह लल्लन आणि युवराजच्या दहशतीवर जिल्हा प्रशासनाचा बुलडोझर |

पाच नॅशनल पुरस्कार मिळवून श्लोक घोरपडे कोल्हापूर येथील स्पर्धेत मारणार बाजी |
'आयडियल' मतदारसंघाचे 'आयडॉल' आमदार |
आचारसंहिता काळात लोकशाही दिनाचे आयोजन होणार नाही : नागेश पाटील |
पोक्सोंतर्गत एकावर गुन्हा |
कुऱ्हाडीने वार केल्या प्रकरणी एकावर गुन्हा |