01:37am | Oct 17, 2018 |
कराड : विद्यमान लोकप्रतिनिधींची नावे नसलेली स्वागत कमानीवरील कोनशिला वीस दिवसांनंतर एका रात्रीत बदलण्यात आली. त्यासंदर्भात प्रसिध्द झालेल्या वृत्तांचे खंडण करत कोनशिला जुनीच असल्याचा खुलासा मुख्याधिकार्यांनी केला. दरम्यान, महाबळेश्वर आणि पाचगणीमधील स्वच्छता अभियानाची पाहणी करण्यासाठी एक टीम गेली होती. परंतु या दौर्याची माहिती सर्व नगरसेविका आणि नगराध्यक्षांनाही दिली नसल्याचा आणि सत्ताधारी आघाडीकडून नगराध्यक्षांना मान देण्याबाबतचा प्रोटोकॉल पाळला जात नसल्याचा आरोप करण्यात आला. यामुळे प्रोटोकॉलवरून सर्वसाधारण सभेत जोरदार चर्चा झाली. दरम्यान, सभेपुढील 53 विषयांना चर्चेनंतर मंजुरी देण्यात आली. अध्यक्षस्थानी नगराध्यक्षा रोहिणी शिंदे होत्या.
सभेच्या प्रारंभी जनशक्ती आघाडीचे नगरसेवक राजेंद्र माने यांनी स्वागत कमानीवरील कोनशिला बदलण्यात आल्याच्या बातम्यांच्या आधारे कोणाच्या सांगण्यावरून कोनशिला बदलली, असा प्रश्न मुख्याधिकार्यांना केला. त्यावर कोनशिला जुनीच आहे. बदललेली नाही, असा खुलासा मुख्याधिकार्यांनी केला. मात्र, त्या खुलाशाने लोकशाही आघाडीच्या नगरसेवकांचे समाधान झाले नाही. मुख्याधिकारी रेटून खोटे बोलत असल्याचा आरोप नगरसेवकांनी केला.
स्वच्छता सर्वेक्षण अंतर्गत काही महिन्यांपूर्वी करण्यात आलेल्या कामांचा नवीन सर्वेक्षण मोहिमेत समावेश का केला आहे, असा प्रश्न विनायक पावसकर यांनी केला. त्यावर मुख्याधिकार्यांनी स्वच्छतेबाबत बदलत असलेल्या शासनाच्या निकषाप्रमाणे कामात सुधारणा करण्यासाठी तसे करणे आवश्यक असल्याचे सांगितले. काही दिवसांपूर्वी महाबळेश्वर आणि पाचगणीमधील स्वच्छता अभियानाची पाहणी करण्यासाठी एक टीम गेली होती. परंतु या दौर्याची माहिती सर्व नगरसेविकांनाच तर नव्हती. परंतु, नगराध्यक्षांनाही माहिती दिली नसल्याचा आरोप विनायक पावसकर यांनी केला. याच मुद्याला अनुसरुन बोलताना फारुक पटवेगार यांनी सत्ताधारी आघाडीकडून नगराध्यक्षांना मान देण्याबाबतचा प्रोटोकॉल पाळला जात नसल्याचा आणि त्यांना अनेक गोष्टींची माहिती दिली जात नसल्याचा आरोप केला.
महिलांसाठी स्वच्छतागृहे बांधण्याबाबत सभागृहात यापुर्वी अनेकवेळा चर्चा झाली आहे. परंतु त्याबाबत प्रत्यक्षात काहीही अंमलबजावणी नसल्याचा मुद्दा सौरभ पाटील यांनी उपस्थित केला. त्यावर मुख्याधिकारी तसेच उपनगराध्यक्ष जयवंत पाटील यांनी महिला स्वच्छतागृहे बांधण्याबाबत नगरपालिका सकारात्मक असली तरी त्यासाठी जागा उपलब्ध होत नसल्याची माहिती दिली. पावसाळ्यात शहरातील बहुतेक रस्त्यांची दुरवस्था झाली आहे. काही महिन्यांपूर्वी झालेल्या सभेत संबंधित ठेकेदारांकडून रस्त्यांची दुरुस्ती करुन घेण्याचे ठरले होते. आता पावसाळा संपल्यामुळे दुरुस्तीची कामे हाती घ्यावीत, अशी मागणी विनायक पावसकर यांनी केली. चौकांचे खासगी संस्थांकडून सुशोभीकरण करताना मर्यादेबाहेर जाहिरातबाजी केली जाऊ नये, अशी सूचना केली. दरम्यान, विषय पत्रिकेवरील 53 विषयांवर चर्चा होऊन त्यांना मंजुरी देण्यात आली.
सातारा शहरातील लल्लन टोळीवर मोक्का कारवाई |
कृष्णा खोरे महामंडळामुळे दुष्काळी भागात पाणी : उदयनराजे भोसले |
लोकसभा निवडणुकीच्या मतदानाची वेळ वाढवून मिळावी |
सूर्योदयाच्या मुहूर्तावर हनुमान जन्मोत्सव साजरा |
सणबूरच्या यात्रेत कुस्तीच्या फडात आग्या मोहोळाचा हल्ला |
उदयनराजेंच्या पत्नी दमयंतीराजेंचा काँग्रेसवर गंभीर आरोप |
वाई, जावळी तालुक्यात अवकाळी पाऊस |
अल्पवयीन मुलीवर अत्याचार करणाऱ्या युवकाला सश्रम कारावास |
उदयनराजे यांनी घेतले वाईच्या महागणपतीचे दर्शन |
तरुणांच्या भवितव्यासाठी मोदींच्या नेतृत्वाखाली स्थिर सरकार निवडून देऊया उदयनराजे यांचे आवाहन |
पाण्याच्या मोटरची चोरी |
सिव्हिल हॉस्पिटलच्या पार्किंगमधून दुचाकीची चोरी |
चैन स्नॅचिंग प्रकरणी दोन अज्ञातांवर गुन्हा |
अपघातात जखमी केल्याप्रकरणी एकावर गुन्हा |
अवैध दारु प्रकरणी दोघांवर कारवाई |
उदयनराजेंच्या पत्नी दमयंतीराजेंचा काँग्रेसवर गंभीर आरोप |
वाई, जावळी तालुक्यात अवकाळी पाऊस |
अल्पवयीन मुलीवर अत्याचार करणाऱ्या युवकाला सश्रम कारावास |
उदयनराजे यांनी घेतले वाईच्या महागणपतीचे दर्शन |
तरुणांच्या भवितव्यासाठी मोदींच्या नेतृत्वाखाली स्थिर सरकार निवडून देऊया उदयनराजे यांचे आवाहन |
पाण्याच्या मोटरची चोरी |
सिव्हिल हॉस्पिटलच्या पार्किंगमधून दुचाकीची चोरी |
चैन स्नॅचिंग प्रकरणी दोन अज्ञातांवर गुन्हा |
अपघातात जखमी केल्याप्रकरणी एकावर गुन्हा |
अवैध दारु प्रकरणी दोघांवर कारवाई |
वाहनावर विनापरवाना स्पिकर लावल्याप्रकरणी एकावर कारवाई |
सातारा लोकसभेसाठी एकूण १६ उमेदवार रिंगणात |
उमेदवारांच्या निवडणुक खर्चाची नोंदवही तपासण्याचे वेळापत्रक जाहीर ; जिल्हा निवडणूक निर्णय अधिकारी डुडी |
छत्रपती संभाजी महाराज शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयतर्फे विविध आरोग्यविषयक उपक्रमांचे आयोजन |
प्लास्टिक पाईपने बेदम मारहाण करून युवकाचा केला निर्घृण खून |