सातारा : हिरापूर ता. सातारा येथे सापडलेल्या बेकायदा गर्भपात किटप्रकरणी सातारा स्थानिक गुन्हे अन्वेषन विभागाने उर्वरीत तिन्ही संशयितांना अखेर अटक केली असून न्यायालयात त्यांना हजर केले असता तीन दिवसांची पोलिस कोठडी मिळाली आहे. दरम्यान, आतापर्यंत याप्रकरणी पाचजणांना अटक झाली असून त्या पुढे तपास सरकलेला नाही.
अजय प्रकाश संकपाळ, अमिर महमूद खान (दोघे रा.हिरापूर), प्रशांत नामदेव शिंदे (रा.अंबेदरे रोड) अशी अटक केलेल्यांची नावे आहेत. दरम्यान, एलसीबीच्या पथकाने यापूर्वी प्रवीण उर्फ बाळासाहेब देशमुख (रा.सातारा) व विलास पांडूरंग देशमुख (रा.मलकापूर ता.कराड) यांना अटक केलेली होती. जिल्हा न्यायालयात त्यांच्या जामीनासाठी अॅड.चंद्रकांत बेबले, अॅड.अमोल चिकणे यांनी काम पाहिले व नुकताच या दोघांचा जामीनही झालेला आहे.
याबाबत अधिक माहिती अशी, तालुक्यातील हिरापूर येथे गर्भपात औषधाचा साठा असल्याची माहिती अन्न व औषध विभागाला मिळाल्यानंतर सातारा तालुका पोलिसांच्या सहकार्याने दीड महिन्यापूर्वी छापा टाकण्यात आला. या छाप्यात एमटीपी किटच्या गोळ्या सापडल्यानंतर सातार्यात खळबळ उडाली. दुर्देवाने मात्र कारवाई कशी करायची, कलमे कोणती लावायची हेच तालुका पोलिसांना समजले नाही व त्या गोंधळात पकडलेले चारही संशयित आरोपी पळून गेले. या घटनेचे समाजमनात तीव्र पडसाद उमटल्यानंतर अखेर या प्रकरणाचा तपास एलसीबीकडे वर्ग करण्यात आला.
एलसीबीकडे तपास आल्यानंतर या विभागाने कलमे वाढवून लगेचच प्रवीण उर्फ बाळासाहेब देशमुख याला व नंतर विलास देशमुख या दोघांना अटक करुन खळबळ उडवून दिली. एलसीबीचा तपास सुरु असताना उर्वरीत संशयित मात्र पसार झाल्याने ते आढळून येत नव्हते. तपासादरम्यान, सापडलेली औषधेच बनावट असल्याचा अहवाल आल्याने एलसीबी विभागाने दुसर्या टप्प्यात पुन्हा कलमे वाढवली. दुसरीकडे अन्न व औषध विभागानेही कारवाईचा फास आवळून सातार्यातील मेडीकलचे परवाने निलंबीत केले. या सर्व घटनांमुळे वैद्यकीय क्षेत्रात खळबळ उडाली होती.
गर्भपात औषधांचा साठा सापडल्याने व त्यातील आणखी तीन संशयित आरोपी सापडत नसल्याने एलसीबीसमोर आव्हान निर्माण झाले होते. पोनि पद्माकर घनवट यांच्या मार्गदर्शनाखाली फौजदार प्रसन्न जर्हाड, पोलिस हवालदार, सुरेंद्र पानसांडे, पृथ्वीराज घोरपडे, विजय कांबळे, शरद बेबले, मुबीन मुलाणी, संजय जाधव हे तपास करत असताना मंगळवारी उर्वरीत तिन्ही संशयितांची त्यांना माहिती मिळाली. पोलिसांचे पथक तयार करुन छापा टाकला असता तिघांना ताब्यात घेण्यात आले. संशयितांना अटक करुन न्यायालात हजर केले असता त्यांना तीन दिवसांची पोलिस कोठडी मिळाली.
महिलेचा विनयभंग केल्याप्रकरणी एकावर गुन्हा |
सराईत गुन्हेगाराने दिली तीन घरफोड्यांची कबुली |
उदयनराजे यांच्या समर्थनार्थ सातार्यात लोटला जनसागर |
शिक्षक हेच सुसंस्कृत समाजनिर्मितीचे जनक |
अजिंक्यतारा कारखान्यावर वादातून झाला गोळीबार |
जनता बँक साताराच्या तज्ज्ञ संचालकपदी सौरभ रायरीकर, राजेंद्र जाधव यांची निवड |
महिलेची गळफास घेवून आत्महत्या |
एकाच्या मृत्यूप्रकरणी कार चालकावर गुन्हा |
संशयित माल जवळ बाळगल्याप्रकरणी एकावर गुन्हा |
राहत्या घरातून युवती बेपत्ता |
वाई, जावळी परिसरात जोरदार अवकाळी पाऊस |
विरोधकांच्या रडीच्या डावाला जनता भुलणार नाही |
महायुतीचे आज सातार्यात जोरदार शक्ती प्रदर्शन |
सातारा जिल्ह्यात राम लल्लाच्या गजराने रामनवमी साजरी |
उदयनराजे यांच्या शक्तीप्रदर्शनासाठी आमदार शिवेंद्रसिंहराजे सज्ज |
जनता बँक साताराच्या तज्ज्ञ संचालकपदी सौरभ रायरीकर, राजेंद्र जाधव यांची निवड |
महिलेची गळफास घेवून आत्महत्या |
एकाच्या मृत्यूप्रकरणी कार चालकावर गुन्हा |
संशयित माल जवळ बाळगल्याप्रकरणी एकावर गुन्हा |
राहत्या घरातून युवती बेपत्ता |
वाई, जावळी परिसरात जोरदार अवकाळी पाऊस |
विरोधकांच्या रडीच्या डावाला जनता भुलणार नाही |
महायुतीचे आज सातार्यात जोरदार शक्ती प्रदर्शन |
सातारा जिल्ह्यात राम लल्लाच्या गजराने रामनवमी साजरी |
उदयनराजे यांच्या शक्तीप्रदर्शनासाठी आमदार शिवेंद्रसिंहराजे सज्ज |
सातारा जिल्ह्यात रामनवमी उत्साहात साजरी |
उष्माघातावरील उपचारासाठी सर्व शासकीय रुग्णालयांमध्ये कक्ष स्थापन |
आदर्श आचारसंहितेच्या काटेकोरपणे अंमलबजावणीस सर्वोच्च प्राधान्य : जिल्हाधिकारी डुडी |
श्रीराम नवमी निमित्त राम ध्यान मंदिरात अर्पित कथक नृत्यलयाचा कार्यक्रम |
निवृत्तीवेतनधारक/कुटुंबनिवृत्तीवेतन धारकांना आवाहन |